Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Winter Storm 2026: अमेरिकेत ‘हिम त्सुनामी’! -48 अंश तापमानाने 18 कोटी लोक घरांत कैद; 8000 विमानं रद्द, ट्रम्प यांचा अजब सवाल

US Extreme Cold : अमेरिकेतील १५ राज्यांमधील सुमारे १८ कोटी लोकांना तीव्र हिमवादळ आणि ध्रुवीय चक्रीवादळाचा फटका बसला आहे. अनेक राज्यांनी आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 24, 2026 | 02:20 PM
us winter storm fern extreme cold 48 degrees 180 million people affected 2026

us winter storm fern extreme cold 48 degrees 180 million people affected 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • उणे ४८ अंशांचा कहर
  • ८,००० उड्डाणे रद्द
  • ट्रम्प यांचा ‘क्लायमेट’ टोला

US Winter Storm : अमेरिका (America) सध्या शतकातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्तींपैकी एकाचा सामना करत आहे. ‘विंटर स्टॉर्म फर्न’ (Winter Storm Fern) नावाच्या या महाभयंकर हिमवादळाने अर्ध्याहून अधिक अमेरिकेला आपल्या कचाट्यात घेतले आहे. देशातील १५ हून अधिक राज्यांमध्ये राहणाऱ्या तब्बल १८ कोटी लोकांसाठी प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला आहे. आर्क्टिकमधील थंड वारे दक्षिण दिशेला सरकल्यामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीला हवामान तज्ज्ञ ‘हिम त्सुनामी’ असे संबोधत आहेत.

पाच मिनिटं बाहेर पडणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण!

नॅशनल वेदर सर्व्हिसने (NWS) अत्यंत गंभीर इशारा दिला आहे की, घराबाहेर ५ ते ६ मिनिटे उभे राहणे देखील जीवघेणे ठरू शकते. उणे ४८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेल्या तापमानामुळे शरीराचे उघडे भाग अवघ्या काही मिनिटांत गोठू शकतात (Frostbite). न्यू यॉर्कच्या गव्हर्नर कॅथी होचुल यांनी नागरिकांना विनंती केली आहे की, हायपोथर्मिया आणि हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी घरातच राहावे. ही थंडी इतकी प्रखर आहे की अनेक भागांत रस्ते पूर्णपणे बर्फाखाली गाडले गेले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Affairs: UN मध्ये भारताची गुगली! इराणविरोधी ठरावावर ‘No’ म्हणत पाश्चात्य देशांना दिले राजनैतिक पण कठोर प्रत्युत्तर

हवाई वाहतुकीचा खेळखंडोबा: ८००० उड्डाणे रद्द

या चक्रीवादळाचा सर्वात मोठा फटका विमान प्रवासाला बसला आहे. गेल्या २४ तासांत अमेरिकेत ८,००० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये डॅलस, शिकागो आणि अटलांटा यांसारख्या मोठ्या विमानतळांचा समावेश आहे. हजारो प्रवासी विमानतळांवर अडकून पडले आहेत. रेल्वे सेवा आणि महामार्गही बर्फाच्या थरामुळे बंद करण्यात आले असून, वीज वाहिन्या कोसळल्याने अनेक राज्यांत लाखो घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.

America, this could be The Big One™️ Winter Storm Fern, by the numbers:
• 40 states
• 2,300 miles
• 240 million people
Flight cancellations / delays (so far):
• Today — 846 / 14,260
• Saturday — 698 / 1,710
• Sunday — 43 / 212
Stay warm this weekend pic.twitter.com/ra51k8F5vt — Morning Brew ☕️ (@MorningBrew) January 23, 2026

credit – social media and Twitter

डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट आणि हवामान बदलाचा वाद

एककीकडे देश थंडीने कुडकुडत असताना, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा हवामान बदलाच्या मुद्यावरून चर्चेला तोंड फोडले आहे. त्यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशियल’ प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत विचारले, “रेकॉर्डब्रेक थंडी ४० राज्यांमध्ये धडकणार आहे… पर्यावरणासाठी ओरडणारे लोक आता सांगू शकतील का की ‘ग्लोबल वॉर्मिंग’चं काय झालं?” ट्रम्प यांच्या या विधानावर शास्त्रज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे. तज्ज्ञांच्या मते, आर्क्टिकमधील ‘पोलर व्होर्टेक्स’ (Polar Vortex) विस्कळीत होणे हे जागतिक तापमानवाढीचाच परिणाम आहे, ज्यामुळे तीव्र थंडीचे वारे जमिनीवर उतरतात.

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-UAE Friendship: मोदी-नाह्यान मैत्रीचा ‘ग्रँड’ निकाल! 900 भारतीय कैद्यांची सुटकेचा मेगा प्लॅन; स्वतः UAE सरकारने भरला दंड

प्रशासनाची युद्धपातळीवर तयारी

टेक्सास, लुईझियाना, आणि व्हर्जिनियासह अनेक राज्यांनी आधीच आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे. टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अ‍ॅबॉट यांनी सांगितले की, राज्याचे पॉवर ग्रिड यंदा अधिक सक्षम आहे, जेणेकरून ५ वर्षांपूर्वीसारखी वीज टंचाई निर्माण होणार नाही. नागरिकांना पुढील ७२ तासांसाठी पुरेसे अन्न, औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेत तापमान किती खाली घसरले आहे?

    Ans: अमेरिकेतील काही राज्यांमध्ये तापमान उणे ४८ अंश सेल्सिअस (-48°C) पर्यंत खाली आले असून सोसाट्याचे थंड वारे वाहत आहेत.

  • Que: किती विमाने आणि राज्ये या वादळाने प्रभावित झाली आहेत?

    Ans: सुमारे ८,००० उड्डाणे रद्द झाली असून १५ हून अधिक राज्यांमधील १८ कोटी जनतेवर याचा थेट परिणाम झाला आहे.

  • Que: 'पोलर व्होर्टेक्स' म्हणजे काय?

    Ans: ही आर्क्टिक प्रदेशातील अत्यंत थंड हवेची एक चक्रीय प्रणाली आहे, जी दिशा बदलल्यामुळे दक्षिण अमेरिकेत तीव्र थंडी घेऊन येते.

Web Title: Us winter storm fern extreme cold 48 degrees 180 million people affected 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • America
  • international news
  • Winter News

संबंधित बातम्या

India-UAE Friendship: मोदी-नाह्यान मैत्रीचा ‘ग्रँड’ निकाल! 900 भारतीय कैद्यांची सुटकेचा मेगा प्लॅन; स्वतः UAE सरकारने भरला दंड
1

India-UAE Friendship: मोदी-नाह्यान मैत्रीचा ‘ग्रँड’ निकाल! 900 भारतीय कैद्यांची सुटकेचा मेगा प्लॅन; स्वतः UAE सरकारने भरला दंड

ना रशिया, ना चीन… अमेरिकेच्या निशाण्यावर मित्रराष्ट्र; पेंटागॉनच्या सुरक्षा रणनीतीत मोठा बदल, जगाची उडाली झोप 
2

ना रशिया, ना चीन… अमेरिकेच्या निशाण्यावर मित्रराष्ट्र; पेंटागॉनच्या सुरक्षा रणनीतीत मोठा बदल, जगाची उडाली झोप 

अमेरिकेचा Cuba वर मोठा प्रहार! तेल पुरवठा कायमचा बंद होणार? ट्रम्पच्या रणनीतीमुळे रशिया-चीनची उडाली झोप
3

अमेरिकेचा Cuba वर मोठा प्रहार! तेल पुरवठा कायमचा बंद होणार? ट्रम्पच्या रणनीतीमुळे रशिया-चीनची उडाली झोप

Venezuela Oil: पुन्हा एकदा चीनसाठी अमेरिकेची आक्रमक भूमिका; व्हेनेझुएलाच्या तेलावर पूर्णपणे ‘कब्जा’ करून किमती 30% ने वाढवल्या
4

Venezuela Oil: पुन्हा एकदा चीनसाठी अमेरिकेची आक्रमक भूमिका; व्हेनेझुएलाच्या तेलावर पूर्णपणे ‘कब्जा’ करून किमती 30% ने वाढवल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.