
Image
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि आयआयआयटी, अलाहाबाद अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आयईईई पुणे आणि उत्तर प्रदेशच्या पुणे विभागाच्या विशेष सहकार्याने दि. ३० ऑक्टोबर ते दि. १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित पाचव्या सीवीएमआय- २०२६ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आनंदराव पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
आनंदराव पाटील म्हणाले की, तंत्रज्ञानाचा वाढता वेग आणि झपाटा लक्षात घेता आगामी वर्षात तंत्रज्ञानात आणि पर्यायाने आपल्या जीवनात नेमके कोणते बदल होतील, हे आज आपण ठामपणे सांगू शकणार नाही. मात्र, या तंत्रज्ञानाचा वापर आपण न्याय्य पध्दतीने करणे, ही काळाची गरज आहे. तंत्रज्ञानाचा वापर मानवजातीच्या विनाशासाठी नव्हे, तर सजीवसृष्टीच्या मदतीसाठी करणे आवश्यक आहे.
प्रा. भीम सिंग यावेळी म्हणाले की तंत्रज्ञानाव्दारे उत्पादनांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणल्यास खऱ्या अर्थाने विकास होईल. तर विनायक पै यांनी तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी केवळ आकर्षक उद्योगजगतामध्ये न करता कृषी क्षेत्रासारख्या अगदी मुलभूत क्षेत्रात करण्यावर भर देण्याची आवश्यकता अधोरेखित केली. तसेच प्रा. श्रीनिवास सिंग यांनी तंत्रज्ञानावर पूर्णपणे अवलंबून न राहता, त्याचा वापर आपला मदतनीस म्हणून करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. कुलगुरू प्रा. सुनिल भिरुड यांनी या परिषदेसाठी देशभरातून एक हजार प्रबंध प्राप्त झाल्याचे आणि त्यातून सुमारे शंभर शोधनिबंधांची निवड करण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष विनायक पै, प्रयागराज येथील आयआयआयटीए अर्थात भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष प्रा. भीम सिंग, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुनिल भिरुड, प्रयागराज येथील आयआयआयटीए अर्थात भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थेचे संचालक प्रा. मुकुल एस. सुतावणे आणि ग्वाल्हेर येथील एबीव्ही – अटल बिहारी वाजपेयी भारतीय सूचना तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन संस्थेचे संचालक प्रा. श्रीनिवास सिंग उपस्थित होते.
CLAT 2027: लॉ प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत आज संपणार; ‘या’ तारखेला होणार परीक्षा
प्रयागराज येथील आयआयआयटीए अर्थात भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थेचे संचालक प्रा. मुकुल एस. सुतावणे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युगा कदम आणि प्रियांका मराठे यांनी केले. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या रील विभागाचे संचालक डॉ. श्रीनिवास पी. महाजन यांनी आभार मानले.
Ans: ही आंतरराष्ट्रीय परिषद सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ (पुणे) आणि आयआयआयटी अलाहाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने, आयईईई (IEEE) पुणे व उत्तर प्रदेश विभागाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे.
Ans: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयातील उच्च शिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यांनी तरुणांना तंत्रज्ञानाचा वापर राष्ट्रउभारणीसाठी व सजीवसृष्टीच्या मदतीसाठी करण्याचे आवाहन केले.
Ans: कुलगुरू प्रा. सुनील भिरूड यांच्या माहितीनुसार परिषदेसाठी देशभरातून १,००० प्रबंध प्राप्त झाले होते, ज्यातून १०० शोधनिबंधांची निवड करण्यात आली.