
Venezuela is not under the control of any external power Trump's warning angers Interim President Delcy Rodriguez
Delcy Rodriguez interim president Venezuela 2026 : दक्षिण अमेरिकेतील राजकीय वातावरण सध्या कमालीचे तापले आहे. अमेरिकन सैन्याने राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो (Nicolas Maduro) यांना अटक केल्यानंतर आता व्हेनेझुएलाच्या नव्या अंतरिम अध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज (Delcy Rodriguez) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. ट्रम्प यांनी “आता आम्हीच व्हेनेझुएला चालवत आहोत” असे विधान केल्यानंतर रॉड्रिग्ज यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “व्हेनेझुएला हा एक सार्वभौम देश असून तो कोणत्याही बाह्य शक्तीच्या नियंत्रणाखाली नाही,” असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
सोमवारी अधिकृतपणे अंतरिम अध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर रॉड्रिग्ज यांनी देशाला संबोधित केले. त्या म्हणाल्या, “हा हल्ला केवळ मादुरोवर नव्हता, तर व्हेनेझुएलाच्या स्वातंत्र्यावर होता. आम्ही युद्धात नाही आहोत, उलट आमच्यावर बेकायदेशीर हल्ला झाला आहे.” त्यांनी अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना तात्काळ सोडण्याची मागणी केली आहे. ट्रम्प यांनी रॉड्रिग्ज यांना सहकार्य करण्याची तंबी दिली होती, ज्याला त्यांनी “माझा नशिब वॉशिंग्टनमध्ये नाही तर देवाच्या हातात आहे,” असे म्हणत फेटाळून लावले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert: ‘Greenland विक्रीसाठी नाही!’ कॅनडियन परराष्ट्र मंत्री अनिता आनंद थेट राजधानीत उतरणार; अमेरिकेच्या विरोधात थोपटले दंड
कराकसमध्ये झालेल्या या लष्करी कारवाईत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे समोर येत आहे. क्युबा सरकारने अधिकृतपणे पुष्टी केली आहे की, मादुरो यांच्या रक्षणासाठी तैनात असलेले त्यांचे ३२ लष्करी आणि पोलीस अधिकारी या हल्ल्यात ठार झाले आहेत. या घटनेमुळे क्युबाने दोन दिवसांचा शोक जाहीर केला आहे, तर व्हेनेझुएलाच्या अंतरिम अध्यक्षांनी आपल्या वीर सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ ७ दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. या कारवाईत अमेरिकेचेही ६ सैनिक जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.
Venezuelan acting President Delcy Rodríguez denies that the US now controls Venezuela: “The government of Venezuela governs in our country. No one else! There is no external agent that governs Venezuela. It is Venezuela; it is its constitutional government.” pic.twitter.com/yvhVfBvGHd — Catch Up (@CatchUpFeed) January 7, 2026
credit : social media and Twitter
दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प यांनी एअर फोर्स वनवरून बोलताना अत्यंत वादग्रस्त विधान केले. “व्हेनेझुएला आता आमच्या ताब्यात आहे आणि आम्हीच ते चालवत आहोत,” असे ते म्हणाले. ट्रम्प यांनी सुचवले की जोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही, तोपर्यंत अमेरिका तिथे निवडणुका घेऊ देणार नाही. तसेच, व्हेनेझुएलाच्या तेल साठ्यांवर अमेरिकन कंपन्यांचे नियंत्रण असेल, असेही संकेत त्यांनी दिले आहेत. ट्रम्प यांनी रॉड्रिग्ज यांना इशारा दिला की, जर त्यांनी अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत, तर त्यांना मादुरोपेक्षाही ‘मोठी किंमत’ मोजावी लागेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Venezuela Crisis: ‘आमची नजर…’, व्हेनेझुएलातील US अटॅकनंतर भारताची मोठी प्रतिक्रिया; S Jaishankar यांनी स्पष्टच सांगितलं
मादुरो यांच्या अटकेनंतर अमेरिकेतही संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एका ताज्या सर्वेक्षणानुसार, ४०% अमेरिकन लोकांनी या कारवाईचे समर्थन केले आहे, तर ४५% लोकांनी ती चुकीची असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, न्यूयॉर्कमध्ये आणल्यानंतर मादुरो यांनी स्वतःला ‘अपहृत’ घोषित करत निर्दोष असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाची पुढील महत्त्वाची सुनावणी १७ मार्च २०२६ रोजी होणार आहे.
Ans: डेल्सी रॉड्रिग्ज या मादुरो सरकारच्या उपराष्ट्रपती होत्या. मादुरो यांच्या अटकेनंतर संवैधानिक तरतुदीनुसार त्यांनी अंतरिम अध्यक्षपदाची शपथ घेतली आहे.
Ans: क्युबा सरकारच्या अधिकृत माहितीनुसार, कराकसमध्ये झालेल्या अमेरिकन लष्करी हल्ल्यात क्युबाचे ३२ लष्करी आणि पोलीस अधिकारी मारले गेले आहेत.
Ans: मादुरो यांना न्यूयॉर्कमधील कोर्टात हजर करण्यात आले असून त्यांनी स्वतःला निर्दोष म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ मार्च २०२६ रोजी होणार आहे.