pakistan master chef viral video
कूकिंग शोमध्ये सहभाग घ्यावा असं अनेकांना वाटत असतं. काही लोक कूकिंग शोमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रचंड मेहनत करत असतात. ज्यांची कूकिंग शोमध्ये सहभाग घेण्याची इच्छा असते ते लोक, विविध पदार्थ तयार करणे, चॉपिंग स्किल्स डेव्हलप करणे अशा गोष्टींचा सराव करत असतात.
पाकिस्तानमधील(Pakistan) एका कूकिंग शोमधील (Cooking Show Viral Video) भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कूकिंग शोमध्ये सहभागी होण्याची इच्छा असणारी महिला चक्क विकत आणलेला पदार्थ त्या कार्यक्रमाच्या परीक्षकांना देते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी पाकिस्तानला यावरून ट्रोल केलं आहे.
Pakistan Masterchef is another level ???? pic.twitter.com/A46vY7iWSZ
— Nandita Iyer (@saffrontrail) February 27, 2023
‘द किचन मास्टर’ (The Kitchen Master) या पाकिस्तानी कूकिंग शोमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. ‘द किचन मास्टर’ या कार्यक्रमात लोक त्यांनी तयार केलेले पदार्थ घेऊन येतात. हे पदार्थ कार्यक्रमाचे परीक्षक टेस्ट करतात. तो पदार्थ जर परीक्षकाला आवडला, तर त्या स्पर्धकाला निवडतात. ‘द किचन मास्टर’ मधील एका एपिसोडचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक महिला चक्क विकत आणलेला पदार्थ परीक्षकांना देत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
[read_also content=”सर्वसामान्यांवर महागाईचा आणखी एक वार,आता औषधांच्या दरवाढीची टांगती तलवार https://www.navarashtra.com/india/medicine-price-hike-due-to-raw-material-rates-increased-nrsr-373048/”]
‘द किचन मास्टर’ कार्यक्रमाच्या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय की एक महिला डब्यात बिर्याणी घेऊन आलेली आहे. या बिर्याणीबाबत ती म्हणते, “मला असं सांगण्यात आलं होतं की, एक पदार्थ आणायचा आहे. त्यामुळे मी आमच्या एरियामध्ये मिळणारी सर्वात चांगली बिर्याणी घेऊन आले आहे. मी वेगवेगळे पदार्थ बनवू शकते पण मला पदार्थ बनवून आणायचा आहे, हे सांगण्यात आलं नाही.” त्या महिलेचं बोलणं ऐकून परीक्षक भडकतात. एक परीक्षक त्या महिलेला बाहेर जाण्यास सांगतात. पण ती महिला बाहेर जाण्यास नकार देते. ‘द किचन मास्टर’ कार्यक्रमाचा हा व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही खळखळून हसाल.
हा व्हायरल व्हिडिओ नंदिता नायर यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत एक मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.