Vietnam evacuates thousands of people as typhoon bualoi nears
Typhoon Bualoi update in marathi : दोन दिवसांपूर्वीच रागासा वादळाने (Tphoon Ragasa) हॉंगकॉंग, चीन, तैवान आणि फिलिपाइन्समध्ये प्रंचड हाहा:कार माजवला होता. आता आणखी एका वादळाचे संकट उभे राहिले आहे. जे व्हिएतनामच्या दिशेने सरकत आहे. यामुळे रविवारी (२८ सप्टेंबर) मध्य व्हिएतनाम आणि उत्तर व्हिएतनामधील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
बुआलोई वादळ तीव्र वेगाने व्हिएतनामच्या दिशेने सरकत आहे. हे वादळ जोरदार वाऱ्याच्या वेगाने धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. व्हिएतनामच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुआलोई वादळामुळे वारे १३३ किमी प्रतितास वेगाने वाहत आहे. यामुळे मुसळधार पाऊस आणि त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. तसेच पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती देखील निर्माण होण्याची शक्यता आहे.
शनिवारी(२७ सप्टेंबर) रात्रीपासून व्हिएतनामच्या मध्य प्रांतात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहे. एक व्यक्ती यामध्ये बेपत्ता झाला असल्याचेही सांगितले जात आहे. हवामान विभागाने १ ऑक्टोबरपर्यंत मूसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
आधी बेदम मारहाण, मग बोटे कापली अन्….; अर्जेंटिनात तीन तरुणींची हत्या थेट इंस्टाग्रामवर लाईव्ह
हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (२६ सप्टेंबर) या बुआलोई वादळाने फिलिपाइन्समध्ये कहर केला होता. यामध्ये फिलिपाइन्समधील २० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यामुळे २३ हजारांहून अधिक कुटुंबांना फटका बसला आहे. देशात विजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
व्हिएतनामच्या हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, वादळ पूर्वेला व्हिएतनामपासून २०० किलोमीटर अंतरावर होते. सध्या हे वादळ व्हिएनामच्या दिशेने वायव्येकडे सरत असून ते क्वांग ट्राय आणि न्घे अन प्रांताला धडकण्याची शक्यता आहे.
यामुळे उत्तर आणि मध्य प्रदेशातील किनाऱ्यांवर मासेमारीला बंदी घालण्यात आली आहे.लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. किमा २१०,००० हून अधिक लोकांना स्थलांतर करण्याची योजना सुरु आहे.
यामळे देशातील विमान वाहतूकवरही परिणाम झाला आहे. दा नांग आंतरराष्ट्रीय विमानतळासह आणखी चार विमानतळांवरील विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहे.
प्रश्न १. व्हिएतनामच्या दिशेने कोणते वादळ सरकत आहे?
व्हिएतनामच्या दिशेने बुआलोई वादळ सरकत आहे.
प्रश्न २. व्हिएतनामध्ये बुआलोई वादळामुळे कशाचा इशारा देण्यात आला आहे?
व्हिएतनामध्ये बुआलोई वादळामुळे मुसळधार पाऊस, किनाऱ्यावर उंच लाटा, पूर आणि भूस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे.
प्रश्न ३. आतापर्यंत किती लोकांचे स्थलांतर व्हिएतनामध्ये करण्यात आले आहे?
व्हिएतनामध्ये उत्तर आणि मध्य प्रांतातून आतापर्यंत २१ हजार लोकांचे स्थलांतर झाले असून, आणखी २१०,००० लोकांच्या स्थलांतराची योजना आहे.
प्रश्न ४. व्हिएतनाच्या दिशेने सरकरण्यापूर्वी बुआलोई वादळ कुठे धडकले होते?
व्हिएतनामच्या दिशेने जाण्यापूर्वी बुआलोई वादळाने फिलिपाइन्समध्ये कहर माजवला होता.
प्रश्न ५. फिलिपाइन्समध्ये बुआलोई वादळामुळे किती जीवीतहानी झाली?
फिलिपाइन्समध्ये बुआलोई वादळामुळे पूरात बुडून २० जणांचा मृत्यू झाला आहे.