Typhoon Ragasa : रगासा वादळाचा आशियामध्ये हाहा:कार ; हॉंगकॉंगपासून तैवान-फिलिपाइन्सपर्यंत प्रचंड विध्वंस (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Typhoon Hit in Asia : जगातील सर्वात शक्तीशाली वादळ रगासाने आशियामध्ये प्रचंड विध्वंस घडवून आला आहे. हे वादळ हॉंगकॉंग, दक्षिण चीन, तैवान आणि फिलिपाईन्समध्ये जोरदार धडकले आहे. हे वादळ बुधवारी (२४ सप्टेंबर) पहाटे हॉंगकॉंमध्ये १९५ किमी प्रतितास वेगाने धडकले. यामुळे वादळी वारे आणि मुसळधार पाऊस पडला. तर चीन, तैवान, फिलिपाइन्समध्ये मोठ्या प्रमाणावर जीवीतहानी व वित्तहानी घडवून आणले.
हाँगकाँग हवामान खात्याने याला “सुपर टायफून” घोषित केले आहे. १९५० नंतरच हे दक्षिण चीनमधील सर्वात दुसरे भीषण वादळ मानले जात आहे. या वादळामुळे हॉंगकॉंगमध्ये प्रचंड विध्वंस घडला असून रस्त्यांवर झाडे उखडून पडली आहे, अनेक पूल देखील पडले आहे. हॉंगकॉंगच्या रस्त्यांवर पाणी साठले आहे.
वादळ इतके जोरात धडकले होते की, जहाजेही धडकून तुटली आहे. अनेक रेस्टॉरंट, मोठ्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, ५० हून अधिक लोक जखमी झाले आहे. याचा परिणाम शाळांवर, दुकांना, आणि विमान उड्डाणांवरही झाले आहे. लोकांना स्थलांतर करण्याचे काम सुरु आहे.
This happened at the Fullerton Hotel Ocean Park in Hong Kong a couple hours ago. I have never seen anything like this before. I was up at 4 am taping my windows because water was just pouring in… Ragasa is indeed a super Typhoon 🌀… pic.twitter.com/O59FJbGLsE — Eric Yeung 👍🚀🌕 (@KingKong9888) September 24, 2025
मालामाल व्हायचंच तर जा जर्मनीला; एक लाख कमावले तरी भारतात व्हाल करोडपती, जाणून घ्या कसे?
रगासा वादळाने दक्षिण चीनच्या ग्वांगडोंग प्रदेशातही मोठे नुकसान घडडवून आणले आहे. बुधवारी संध्याकाळी हे वादळामुळे लॅंडफॉल झाला. यामुळे प्रचंड बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या ग्वांगडोंगमधील २० लाखाहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे कार्य सुर आहे.
तसेच शाळा, रेल्वे मार्ग, विमान सेवा, कारखाने बंद ठेवण्यात आले आहेत. अनेक भागांमध्ये रस्त्यावर पाणी साठले असून नदीसारखे रुप आले आहे. यामुळे विजेचा पुरवठाही बंद करण्यात आला आहे.सध्या दक्षिम चीनमध्ये वारे १४४ किमी प्रतितास वेगाने वाहत आहे.
Crazy scenes in China due to Typhoon Ragasa pic.twitter.com/iiNuu5r2TT — Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) September 24, 2025
तैवानमध्ये मंगळवारी (२३ सप्टेंबर) टायफून रगासा जोरदार धडकले. यामुळे मुसधार पाउस सुरु झाला. तैवानच्या हुआलियन काऊंटीमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. यामुळे १७ जणांचा मृत्यू तर ३२ लोक जखमी झाले असून १५ हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत.
या वादळाने फिलिपाइन्समध्येही हाहाकार माजवाला आहे. फिलिपाइन्सच्या उत्तरी प्रांतात ७ मच्छीमारांचा मृत्यू झाला आहे, तर ५ जण बेपत्ता आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, १० जणांचा मृत्यू तर ७ लाख लोक वादळामुळे बाधित झाले आहे. सध्या वादळ पश्चिमेकडे सरकत आहे. पण आशियामध्ये अजूनही धोका टळलेला नाही.
टायफून रगासा कुठे धडकले आणि त्याचा वेग किती होता?
टायफून रगासा आशियामध्ये हॉंगकॉंग, चीन, तैवान आणि फिलिपाइन्समध्ये धडकले आहे. हे वादळ प्रतितास १४४ किमी वेगाने वाहत असून, याचा वेग २४४ पर्यंत वाढण्याचा धोका आहे.
या वादळामुळे किती जीवितहानी झाली?
टायफून रगासा आशियामध्ये जोरदार धडकले असून तैवानमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर फिलिपाइन्समध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. चीन आणि हॉंगकॉंमधून कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही. परंतु ९० लाखाहून अधिक लोक बाधित झाले आहेत.