हनोई : व्हिएतमनाममध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. शनिवारी (१९ जुलै) व्हिएतनामध्ये पर्यटकांनी भरलेली बोट उलटली. यामध्ये ३४ जाणांचा मृत्यू झाला आहे. अचानक आलेल्या वादळामुळे बोट उलटली. लॉन्ग बे येथील वंडर सी बोट या प्रमुख पर्यटनस्थली ही घटना घडली. या बोटीत पाच क्रू मेंमबर्ससह ४८ प्रवासी होती.
सध्या बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. बचाव पथकाला ११ जणांना वाचवण्यात यश आहे आहे. तर ३४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, जोरदार वाऱ्यामुळे बोट अचानक उलटली. शनिवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी २ वाजता ही घटना घडली.
व्हिएतनामच्या सीमा रक्षक आणि नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, वंडर सीज नावाचे जहाज अचानक वादळाच्या तडाख्यात अडकले. यामुळे ५३ पर्यटकांनी भरलेली बोट उलटली. मिळालेल्या माहितीनुसार, बहुतेक प्रवासी व्हिएतनामची राजधानी हनोई मधून आलेल होते. यामध्ये २० मुलांचा समावेश होता.
लॉन्ग बे च्या भागाकडे एक वादळही सरकत असल्याची माहिती मिळाली आहे. व्हिएतनामच्या राष्ट्रीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हे वाद येत्या आठवड्यात लॉन्ग बेच्या किनाऱ्यावर मोठे आदळण्याची शक्यता आहे. याचा फटका उत्तर व्हिएतनामला देखील बसू शकतो असे सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बचाव पथकाला ११ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तसेच अजून २३ जण बेपत्ता असल्याचे वत्त समोर आली आहे. तर यामध्ये ३४ जमांचे मृतदेह घटनास्थळी सापडले आहे. यामध्ये एका १४ वर्षाच्या मुलाला वाचवण्यात आले. बोट उलटल्याच्या चार तासानंतर ही माहिती बचाव पथकाला मिळाली. त्यानंतर तातडीने बचाव कार्य सुरु करण्यात आले.
यापूर्वी देखील व्हिएतनाममध्ये बोट उलटल्याच्या अनेक घटना घडली आहे.यापूर्वी व्हिएतनामच्या उत्तरी भागाला यागी वादळाचा देखील जोरदार तडाखा बसला होता. यामुळे अनेक भागांमध्ये पूर आणि भूस्सखलनाची परिस्थिती निर्माण झाली होती. या वादळामुळे ५९ लोकांचा मृत्यू, तर २४७ बेपत्ता झाले होते. वादळामुळे व्हिएतनामच्या उत्तरेकडील फु थो प्रांतातील एक स्टील पूल आज सकाळी कोसळला होता. व्हिएतनाम हे जगभरातील लाखो पर्यटकांना आकर्षित करते. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी व्हिएतनामला ओळखले जाते.