Violent protests in support of monarchy in Nepal Former King Gyanendra Shah fined lakhs
काठमांडू: नेपाळची राजधानी काठमांडूत राजेशाही समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात हिंसक आंदोलने झाली आहेत. या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनांमुळे नेपाळचे माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांना दंड ठोठवण्याक आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी राजावर लाख 93 हजाराचा दंड ठोठवण्यात आला आहे. निदर्शनानंतर, शहराच्या पूर्वेकडील भागात कर्फ्यू लावण्यात आला आहे. सध्या नेपाळमध्ये परिस्थिती सामान्य राहिलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, तिनकुने-बानेश्वर भागांमध्ये राजेशाही समर्थकांनी आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे सध्या परिस्थिती बिघडली आहे. आंदोलादरम्यान दुकानांची लूट करण्यात आली, वाहनांना आग लावण्यात आली. तसेच एका राजकीय पक्षाच्या कार्यलयावरही हल्ला करण्यात आला. यामुळे सुरक्षा दल आणि निदर्शकांमध्ये झालेल्या झटापटीत दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण जखमी झाले आहेत.
स्थानिक प्रशासनाच्या मते, निदर्शनांचे आयोजन माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांच्या आदेशावर करण्यात आले होते. यामुळे काठमांडू महानगरपालिकेचे महापौर बालेंद्र शाह यांनी त्यांच्या महाराजगंज येथील निवसस्थानी पत्र पाठवून आंदोलनामुळे नुकसान झालेली भारपाई मागितली. ज्ञानेंद्रे शाह यांना 7 लाख 93 हजार नेपळी रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आंदोलनानंतर, शहरातील वातावरण बिघडले होते. दरम्यान शनिवारी सकाळी 7 वाजता संचार बंदी उठवण्यात आली. आणि नंतर हळूहळू वाहतूक आणि बाजारपेठा सुरु करण्यात आल्या. सध्या परिसरात भितीचे वातावरण पसरलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेंद्र शाह यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा संख्या कमी करण्यात आली आहे.
मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. या निदर्शनांचा उद्देश हिंदू राष्ट्र आणि राजेशाही पुनर्स्थापनेची मागणी होता. आंदोलन संयोजक दुर्गा प्रसाद यांनी माजी राजांची भेट घेतली होती. सध्या या हिंसक घटनेमुळे राजकीय वातावरणात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. ओली शर्मा सरकारने कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.
काही दिवसांपूर्वी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजेशाही समर्थनांच्या आंदोलनाचा आरोप भारतावार केला होता. ओली शर्मा यांनी देशातील राजेशाही समर्थकांचे आंदोलनात भारताची भूमिका असल्याचा दावा केला होता.