नेपाळमध्ये अस्वस्थता! पंतप्रधानांनी केले भारतावर गंभीर आरोप; नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
काठमांडू: सध्या नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमध्ये राजेशाही समर्थनार्थ आंदोलने सुरु झाली आहेत. यामुळे नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांची चिंता वाढली आहे. नेपाळचे माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांच्या समर्थकांनी त्यांच्या स्वागतासाठी आणि राजेशाही समर्थनार्थ नेपाळची राजधानी काठमांडू येथे मोठ्या रॅलीचे आयोजन केले होते. याच वेळी सध्याच्या लोकशाही तंत्राचे पंतप्रधान ओली शर्मा यांनी मोठे विधान केले, यामुळे संपूर्ण नेपाळमध्ये गोंधळ उडाला आहे. शिवाय, शर्मा यांनी भारतावरही गंभीर आरोप केले आहेत.
इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळचे पंतप्रधान ओली शर्मा यांनी देशातील राजेशाही समर्थकांचे आंदोलनात भारताची भूमिका असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याने भारत आणि नेपाळमध्ये संबंध बिघडण्याची शक्यता आहे. दरम्यान ओलि शर्मा यांच्या पक्षाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान ओली शर्मा लवकरच संसदेत राजेशाही समर्थकांच्या आंदोलनाचा मुद्दा प्रस्थापित करणार आहेत. शिवाय, सत्ताधारी पक्ष नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या (UML) केंद्रीय पदाधिकाऱ्यांची तीन दिवसांपूर्वी बैठक झाली. या बैठकीत त्यांनी राजेशाही आंदोनलनाविरोधात आणि भारत्याच्या भूमिकबद्दल हे वक्तव्य केले.
तीन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीदरम्यान एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, पंतप्रधान ओली शर्मा यांनी माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांना अटक करण्याची मागणी केली. पक्षातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, बुधावरी (26 मार्च) संसदेत राजेशाही समर्थकांच्या आंदोलनात भारताच्या भूमिकेबद्दल पूरावे सादर करणार आहेत.
याच दरम्यान पंतप्रधान केपी शर्मा यांनी माजी राजाविरोधात तीन प्रमुख राजकीय पक्षांची संयुक्त आघाडी स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र त्यांच्या या प्रस्तावाला विरोध मिळाला. सत्ताधारी पक्षातील सर्वात मोठे भागीदार म्हणून असलेल्या कॉंग्रेसने संविधानाचा रक्षण करण्याचा निर्णय घेतला, परंतु केपी शर्मा यांच्या CPN-UML आणि CPN-माओवादी सेंटरसोबत आघाडी सत्ता स्थापन करण्यास नकार दिला. मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळी काँग्रेसचे प्रमुख शेर बहादूर देऊबा यांची निर्णय आणि पक्षाच्या कामगिरी मूल्यांकन समितीने रविवारी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचा प्रस्ताव फेटाळून लावला.
रविवारी 17 मार्च 2025 रोजी काठमांडू येथे महिला नेतृत्व शिखर परिषदेदरम्यान ओली शर्मा यांनी राजेशाही समर्थकांच्या गटावर निशाणा साधला. त्यांनी, राजेशीही समर्थकांच्या आंदोलनाबाबदत भाष्य केले. त्यांनी म्हटले की, “आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे, मागे वळून पाहणे नाही. आपल्यासमोर अनेक आव्हाने येतील, आपल्याला लोकशाहीच्याच मार्गावर चालायचे आहे, रस्त्यात कितीही काटे आले तरी त्यांना बाजूला करत आव्हानांना सामोरो जायचे आहे, लोकशाही हाच आपला एकमेव महामार्ग आहे.”