
vladimir putin and steve witkoff
Vladimir Putin यांच्या भेटीपूर्वी मोठा निर्णय! भारतासोबतच्या महत्त्वपूर्ण संरक्षण कराराला मंजुरी?
पाच तासांच्या चर्चेत काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार स्टीव्ह वीटकॉफ आणि पुतिन यांच्या पाच तासांची बैठक पार पडली. यावेळी ट्रम्प यांचे जावई कुशनर देखील उपस्थित होते. ही भेट रशिया आणि युक्रेन मधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आली होती. परंतु दोन्ही बांजून कोणत्या करार झालेला नाही. पुतिनच्या परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाने युक्रेन त्यांना जोपर्यंत डोनबास प्रदेश सोपवत नाही. तोपर्यंत कोणताही करार केला जाणार नाही हे स्पष्ट केले आहे.
तसेच पुतिन यांनी ट्रम्प यांचा २८ कलमी शांतता प्रस्तावातील काही अटी मान्य केल्या आहेत. परंतु काही मुद्यांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान याचा वेळी ट्रम्प आणि पुतिन यांच्या संभाव्य भेटीबाबतही प्रश्न उपस्थित होत होता. मात्र अशी कोणतीही बैठक नियोजित नसल्याचे पुतिनच्या परराष्ट्र सल्लागार उशाकोव्ह यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान स्टीव्ह वीटकॉफ आणि पुतिनच्या चर्चेवेळी सोशल मीडियावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी युक्रेन सध्या अमेरिकेच्या शिष्टमंडळाकडून युद्धबंदीच्या संकेताची वाट पाहत असल्याचे म्हटले आहे. अमेरिकन अधिकारी बैठकीतील निकालांची माहिती क्यांना देणार आहे. दरम्यान या बैठकीपूर्वी व्हाइट हाउसने चांगल्या चर्चेची आशा व्यक्त केली होती. परंतु यामध्ये कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. या बैठकीपूर्वी युक्रेनियन अधिकाऱ्यांनी देखील अमेरिकेला भेट दिली होती. यावेळी अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांच्या शांतता योजनेवर आक्षेप घेतला होता. कारण ट्रम्पच्या योजनेतील सर्व प्रस्ताव हे रशियाच्या हिताचे असून युक्रेनच्या सार्वभौमत्वावर आघात करणार आहेत.
याच वेळी युरोपीय देशांनी देखील ट्रम्पच्या योजनेला विरोध केला आहे. नुकतेच झेलेन्स्की यांनी पॅरिसमध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली होती. यावेळी युक्रेनने युरोपीय देशांकडून सुरक्षेची हमी व्यक्त केली आहे. तसेच मॅक्रॉन यांनी देखील याला समर्थन देत इतर मित्र युरोपियन राष्ट्रांना यु्क्रेनला ठोस सुरक्षा हमी देण्याचे आवाहन केले.
पुतिन आणि विटकॉफ यांची भेट भारतासाठी देखील अत्यंत महत्वाची आहे. या भेटीचा भारत आणि रशिया संबंधावर परिणाम होण्याची शक्यता आहे. रशिया आणि अमेरिकेतील तणावामुळे भारतावर सध्या अमेरिकेने ५०% कर लादला आहे. पण हा तणाव कमी झाल्यास भारतावरील कर कमी होण्याची शक्यता आहे. भारत आणि रशियामध्ये S-500 आणि सुखोई-५७ विमानांसाठी भारताच्या करारवर देखील अमेरिका दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थिती पुतिन आणि वीटकॉफ यांच्या भेटीचा भारत-रशियाच्या संरक्षण करारवर परिणाम होईल.
Vladimir Putin भारतात येण्यापूर्वी ट्रम्पच्या सल्लागारांची घेणार भेट; काय आहे कारण?