
Iran Regime Change
१९७९ मध्ये इराणमध्ये इस्लामिक राजवटची सत्ता आली होती. यामुळे राजघराण्याला देश सोडावा लागला होता. परंतु आता पहलवींचे हे घराणे पुन्हा एकदा सत्तेला आव्हान देत आहे. विशेष म्हणजे फराह पहलवी यांचा मुलगा रझा पहलवी यांनी देखील खामेनेई सरकारला आव्हान दिले आहे. तसेच त्यांनी इराणच्या जनतेला देखील देशात सत्ताबदलाची आवश्यकता असल्याचा संदेश दिला आहे. परंतु अमेरिकेच्या CIA च्या अहवालानुसार, त्यांना इराणच्या जनतेकडून तेवढा प्रतिसाद न मिळाल्याने त्यांची आई फराह पहलवी आता मैदानात उतरल्या आहेत. शिवाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी देखील त्यांना भेटण्यास नकार दिला होता. मुलाची राजकीय पकड कमकुवत होत असल्याचे पाहून आता मात्र स्वत: फराह पहलवी मैदानात उतरल्या आहे.
फराह पहलवी यांना आजही इराणमधील जुन्या पिढीतील काही लोकांचा आणि विरोधकांचा पाठिंबा आहे. यामुळे या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवरच त्यांनी सत्तेत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा मुलगा फ्लॉप ठरला तर आई मैदानात उतरली अशा चर्चा सध्या जोरदार सुरु आहेत.यामुळे सध्या इराणमधील सत्तेत काय आणि कसा बदल होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अमेरिका-इराण तणाव
याच वेळी अमेरिका आणि इराणमध्ये देखील तणावाचे वातावरण आहे. ट्रम्प यांनी इराणवर संभाव्य हल्ल्याचे संकेत दिले आहेत, तर इराणने देखील प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे. सध्या या सर्व परिस्थितीमुळे इराणमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे.
I honor the memory of all the precious innocent lives
lost for freedom in Iran. The insufferable calamity that
has befallen our nation today has left a profound wound
on the soul of Iran. It calls upon us, more than ever, to
embrace solidarity and humanity. I extend my heartfelt… pic.twitter.com/ZU8jX8UVpA — FARAH PAHLAVI – فرح پهلوی (@ShahbanouFarah) January 24, 2026
Ans: फराह पहलवी या इराणचे शेवटचे राजा मोहम्मद रझा पहलवी यांच्या पत्नी आणि माजी महाराणी आहेत. सध्या इराणमधील इस्लामिक सत्तेच्या विरोधातत्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
Ans: रझा पहलवी हे इराणचे शेवटचे राजा मोहम्मद रझा पहलवी आणि माजी महाराणी फराह पहलवी यांचे पुत्र आहेत. ते लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष राज्याला समर्थन करतात, परंतु त्यांना जनतेकडून प्रतिसाद मिळत नाही. तसेच त्यांनी खामेनेई सरकारच्या इस्लामिक राजवटीला तीव्र विरोध केला आहे,
Ans: फराह पहलवी यांनी इराणमध्ये सत्ता बदलाची थेट मागणी केलेली नाही, परंतु त्यांच्या वक्तव्यातून त्या खामेनेई सरकाविरोधात अशल्याचे दिसून येते.