
india canada relations pm mark carney visit uranium deal trump tariffs impact 2026
Canada PM Mark Carney India visit 2026 : गेल्या दोन वर्षांपासून भारत आणि कॅनडा(India-Canada) यांच्यातील संबंधांवर जमा असलेले धुकं आता वेगाने विरताना दिसत आहे. एकेकाळी खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या मुद्द्यावरून आमनेसामने आलेल्या या दोन देशांमध्ये आता नव्या मैत्रीचे पर्व सुरू झाले आहे. कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी (Mark Carney) मार्च २०२६ च्या पहिल्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान ऊर्जेच्या क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा ‘युरेनियम करार’ होण्याची शक्यता आहे.
कॅनडाच्या या भूमिकेतील बदलामागे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आक्रमक धोरण कारणीभूत मानले जात आहे. ट्रम्प यांनी कॅनडावर १००% पर्यंत आयात शुल्क (Tariff) लावण्याची धमकी दिली आहे. इतकेच नाही तर, “कॅनडा हा अमेरिकेचा भाग व्हावा किंवा तो अमेरिकेचे ५१ वे राज्य बनावे,” अशा जिव्हारी लागणाऱ्या विधानांमुळे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी आता अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या ‘ट्रेड डायव्हर्सिफिकेशन’ (व्यापार विविधीकरण) धोरणांतर्गत भारतासारखी मोठी बाजारपेठ कॅनडासाठी संजीवनी ठरणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Xi Mingze : चीनची ‘राजकुमारी’ सांभाळणार सत्तासूत्रे? शी जिनपिंग यांच्या मुलीच्या राजकीय प्रवेशाची संपूर्ण जगभरात जोरदार चर्चा
पंतप्रधान कार्नी यांच्या दौऱ्यापूर्वी, कॅनडाचे ऊर्जा मंत्री टिम हॉजसन या आठवड्यात गोव्यात होणाऱ्या ‘इंडिया एनर्जी वीक’ (India Energy Week) मध्ये सहभागी होत आहेत. येथे ते भारताचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याशी युरेनियम आणि लिक्विफाइड नॅचरल गॅस (LNG) बाबत महत्त्वाच्या वाटाघाटी करतील. सूत्रांच्या माहितीनुसार, भारत आणि कॅनडामध्ये १० वर्षांसाठी युरेनियम पुरवठ्याचा ऐतिहासिक करार होऊ शकतो, ज्यामुळे भारताच्या अणुऊर्जा प्रकल्पांना मोठी गती मिळेल.
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी २०२६) भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांच्यात दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत दोन्ही नेत्यांनी ‘आर्थिक भागीदारी’ आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर दिला. अनिता आनंद या भारतीय वंशाच्या असून, त्यांच्या कार्यकाळात दोन्ही देशांमधील विश्वास पुन्हा निर्माण होत असल्याचे मानले जाते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China OIC : मध्य पूर्वेचा नवा ‘डॉन’? अमेरिकेला रोखण्यासाठी 57 मुस्लिम देशांना सोबत घेऊन बीजिंगची मोठी खेळी; ‘जंगली कायदा’ हेच कारण
माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या काळात हिंदू मंदिरांवर झालेले हल्ले आणि वाढलेला कट्टरवाद यामुळे भारत संतापला होता. मात्र, नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी या मुद्द्यावर मवाळ भूमिका घेतली आहे. ते सातत्याने हिंदू सणांना उपस्थित राहत असून, कॅनडातील हिंदू समुदायाला सुरक्षेचे आश्वासन देत आहेत. कार्नी यांच्या या ‘प्रॅग्मॅटिक एंगेजमेंट’ (व्यावहारिक सहभाग) धोरणामुळे भारताचा कॅनडावरील विश्वास पुन्हा एकदा वाढत आहे.
Ans: पंतप्रधान मार्क कार्नी मार्च २०२६ च्या पहिल्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येण्याची दाट शक्यता आहे.
Ans: या दौऱ्यात प्रामुख्याने युरेनियम पुरवठा, एलएनजी (LNG) आणि क्रिटिकल मिनरल्स (दुर्मिळ खनिजे) बाबत १० वर्षांचे दीर्घकालीन करार होऊ शकतात.
Ans: अमेरिकेने लावलेले टॅरिफ आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेमुळे कॅनडा आपले व्यापाराचे पर्याय शोधत असून भारत हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा भागीदार आहे.