Vladimir Putin भारतात येण्यापूर्वी ट्रम्पच्या सल्लागारांची घेणार भेट; काय आहे कारण? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अमेरिकेच्या दबावानंतरही पुतिन भारत दौऱ्यावर; तारिखही झाली निश्चित, Su-57 वर होणार मोठा करार
पुतिन यांची स्टीव्ह वीटकॉफशी भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे. ही बैठक रशिया आणि युक्रेन मध्ये शांतता करार आणि ट्रम्प यांच्या २८ कलमी योजनेवर आधिरत असल्याची माहिती मिळाली आहे. रशियाचे अध्यक्ष प्रेस सचिव दिमित्री पेस्कोव्ह यांनी याची पुष्टी केली आहे. तसेच त्यांनी पुतिन ४ ते ५ डिसेंबरला भारताच्या दौऱ्यावर असणार असल्याचे म्हटले आहे.
सध्या रशिया युक्रेन युद्धाने भयंकर रुप धारण केले आहे. रशिया सातत्याने युक्रेनवर हल्ले करत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी व पायाभूत उर्जा सुविधांचे नुकसान झाले आहे. सध्या हे युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प यांनी २८ कलमी प्रस्ताव मांडला आहे. याच पार्श्वभूमीवर पुतिन भारत बेटीपूर्वी वीटकॉफ यांची क्रेमलिनमध्ये भेट घेणार आहेत.
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टीव्ही वीटकॉफ सोमवारी (१ डिसेंबर) मॉस्कोला जाणार आहे. येथे ते अध्यक्ष पुतिन यांची भेट घेतील. मंगळवारी (२ डिसेंबर) दोन्ही नेत्यांमध्ये रशिया युक्रेन शांतता कराराच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार आहे. विटकॉफ, कुशनर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी रविवारी (३० नोव्हेंबर) फ्लोरिडा येथे युक्रेनियनच्या प्रतिनीधींची भेटी घेतली होती. यावेळी देखील ट्रम्प यांच्या २८ कलमी शांतता योजनेवर चर्चा झाली.
दरम्यान पुतिन आणि विटकॉफ यांची भेट भारतासाठी देखील अत्यंत महत्वाची मानली जात आहे. कारण या भेटीचा भारत आणि रशिया संबंधावर परिणाम होण्याची शक्यता आहे. रशिया आणि अमेरिकेतील तणावामुळे भारतावर सध्या अमेरिकेने ५०% कर लादला आहे. पण दोन्ही देशांमधील तणाव कमी झाल्यास हा कर कमी होण्याची शक्यता आहे. भारत आणि रशियामध्ये S-500 आणि सुखोई-५७ विमानांसाठी भारताच्या करारवर देखील अमेरिका दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थिती पुतिन आणि वीटकॉफ यांच्या भेटीचा भारत-रशियाच्या संरक्षण करारवर परिणा होईल.






