Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानच्या घशाला कोरड; शेरी रहमान यांचा शाहबाज सरकारवर जोरदार हल्लाबोल

Indus River drying : पाकिस्तानमध्ये वाढत्या जलसंकटावरून राजकीय वातावरण तापले आहे. पाकिस्तानच्या वरिष्ठ महिला खासदार शेरी रहमान यांनी सिंधू नदीतील पाण्याच्या पातळीत झालेल्या भीषण घटेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 12, 2025 | 10:22 PM
Water crisis worsens in Pakistan as Indus River dries up Sherry Rehman blames Shahbaz govt

Water crisis worsens in Pakistan as Indus River dries up Sherry Rehman blames Shahbaz govt

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये वाढत्या जलसंकटावरून राजकीय वातावरण तापले आहे. पाकिस्तानच्या वरिष्ठ महिला खासदार आणि माजी हवामान बदल मंत्री शेरी रहमान यांनी सिंधू नदीतील पाण्याच्या पातळीत झालेल्या भीषण घटेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी थेट पंतप्रधान शाहबाज शरीफ सरकारवर निशाणा साधत, झोपलेल्या सरकारला जागं करण्याची गरज असल्याचे स्पष्टपणे सांगितले. सिनेटमध्ये बोलताना सिनेटर शेरी रहमान म्हणाल्या, “सिंधू नदी आपल्या डोळ्यांसमोर कोरडी पडत आहे. ही वेळ आरोप-प्रत्यारोपांची नाही, तर एकत्रित उपाययोजनांची आहे. जर सरकार आता जागं नाही झालं, तर भविष्यात पाकिस्तानला अत्यंत गंभीर पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.”

सिंधू नदीतील पाणी 100 वर्षातील नीचांकी पातळीवर

शेरी रहमान यांनी निदर्शनास आणले की सिंधू नदीतील पाण्याची पातळी सध्या गेल्या 100 वर्षांतील सर्वात नीचांकी स्तरावर पोहोचली आहे. सिंधू नदी ही पाकिस्तानच्या शेती, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि पर्यावरणीय समतोलासाठी अत्यंत आवश्यक आहे. पण अलीकडील काळात हवामान बदल, पावसाच्या कमतरतेमुळे आणि चुकीच्या जलव्यवस्थापनामुळे नदी कोरडी पडत चालली आहे.

सुक्कुर बॅरेजवरील पाण्याच्या पातळीत 71 टक्के घट झाली असून, एकूण तीनही बॅरेजमधील पाणीपुरवठा ६५ टक्क्यांनी कमी झाला आहे. ही आकडेवारी धक्कादायक असून, जलस्रोत वाचवण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई न झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताने डाव टाकला, बांगलादेशची केली गळचेपी; आर्थिक नुकसान अनिवार्य

सध्याच्या व्यवस्थेवर टीका, जलस्रोतांची वळवण सुरूच

शेरी रहमान यांनी सरकारवर टीका करत सांगितले की, “पाणी संकट इतकं तीव्र असताना देखील सिंधू नदीतील पाणी कालव्यांत वळवण्याचे काम सुरूच आहे. जलस्रोतांचा नाश होत असताना सरकार नुसतं बघ्याची भूमिका घेत आहे.” त्यांनी असेही स्पष्ट केले की पाण्याच्या हक्कावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. “पीपीपी पक्ष नेहमी लोकांच्या मूलभूत हक्कांसाठी उभा राहिला आहे आणि या जलसंपत्तीवर सर्वांचा हक्क आहे. आम्ही पाणी अधिकाराच्या लढ्यात कोणतीही माघार घेणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

हवामान आणीबाणी जाहीर करण्याची मागणी

सिनेटच्या हवामान बदल आणि पर्यावरणविषयक स्थायी समितीच्या प्रमुख म्हणून रहमान यांनी पाणीटंचाईला “राष्ट्रीय हवामान आणीबाणी” म्हणून जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना तातडीने सीसीआय (Council of Common Interests) ची बैठक बोलावण्याचे आवाहन केले, जेणेकरून प्रांत आणि केंद्र सरकार यांच्यात समन्वय साधता येईल. “जर आता एकत्रित आणि निर्णायक कृती केली नाही, तर पाकिस्तान भविष्यात पिण्याच्या पाण्याविना तग धरू शकणार नाही. हे संकट राजकारणापलीकडे गेले आहे आणि यावर राष्ट्रीय पातळीवर निर्णय घ्यावा लागेल,” असे शेवटी त्यांनी बजावले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जपानी दणक्याने ट्रम्पची तंतरली; बाँडची विक्री सुरू झाल्याचे कळताच टॅरिफच्या अंमलबजावणीला ब्रेक

शाहबाज सरकारसाठी एक गंभीर इशारा

पाकिस्तानमधील सिंधू नदी कोरडी पडण्याच्या संकटामुळे संपूर्ण देशात चिंता वाढली आहे. शेरी रहमान यांचे वक्तव्य हे शाहबाज सरकारसाठी एक गंभीर इशारा असून, आता सरकारने जर पावले उचलली नाहीत, तर जलसंकट भयानक स्वरूप धारण करू शकते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून, देशाच्या भविष्यासाठी सर्वपक्षीय, सर्वस्तरीय आणि तातडीच्या कृतीची गरज आहे, हे या परिस्थितीतून स्पष्ट होते.

Web Title: Water crisis worsens in pakistan as indus river dries up sherry rehman blames shahbaz govt nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 10:22 PM

Topics:  

  • pakistan
  • Pakistan News
  • Pakistan PM Shahbaz Sharif

संबंधित बातम्या

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?
1

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’
2

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

‘अल्लाहने मला पाकिस्तानचा रक्षक बनवले…’ ; राष्ट्रपती-पंतप्रधानांना हटवण्याच्या आरोपांवर असीम मुनीर सोडले मौन
3

‘अल्लाहने मला पाकिस्तानचा रक्षक बनवले…’ ; राष्ट्रपती-पंतप्रधानांना हटवण्याच्या आरोपांवर असीम मुनीर सोडले मौन

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल
4

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.