Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय आहे ईशनिंदा प्रकरण? ज्यावरुन पाकिस्तानात पेटला वाद; न्यायालयाचे शाहबाज सरकारला चौकशीचे आदेश

Pakistan's Blasphemy case : पाकिस्तानमध्ये सध्या ईशनिंदा प्रकरणावरुन मोठा वाद पेटला आहे. पाकिस्तानच्या न्यायालयाने शाहबाज सरकारला या प्रकरणांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 16, 2025 | 10:15 PM
What is the blasphemy case Which caused chaos in Pakistan's Shahbaz government, read in detail

What is the blasphemy case Which caused chaos in Pakistan's Shahbaz government, read in detail

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद : सध्या पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ उडला आहे. पाकिस्तानमध्ये ईशनिंदा कायद्यावरुन वाद सुरु असून इस्लामाबादच्या उच्च न्यायालयाने या कायद्यांच्या दुरुपयोगांच्या चौकशीचे आदेश शाहबाज सरकारला दिले आहेत. ३० दिवसांत चौकशी आयोग स्थापन करुन प्रकरण मिटवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हा आदेश इस्लामाबादच्या उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सरदार एजाज इशाक खान यांनी दिला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

पाकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षात अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत, ज्यामध्ये सरकारी अधिकारी, वकील, सामान्य निर्दोष नागरिकांना ईशनिंदा कायद्याच्या आरोपाखाली फसवत आहेत. नागरिकांवर खोटो गुन्हे दाखल केले जात आहेत. तसेच त्यांच्याकडून पैसे देखील उकळले जात आहे. कायदेशीर कारवाईची धमकी लोकांना दिली जात आहे. अशा अनेक प्रकरणे आतापर्यंत पाकिस्तानमध्ये समोर आली आहेत. यामुळे ईशनिंदा कायद्यांबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

ईशनिंदा म्हणजे काय?

ईशनिंदा म्हणजे एखाद्या पवित्र देवतेबद्दल, पवित्र व्यक्तींबद्दल तिरस्कार, अनादर करणे आहे. सध्या पाकिस्तानात सरकारी अधिकारी सामान्य नागरिकांना या आरोपात शिक्षा देत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- गाझात पुन्हा मृत्यूचा तांडव! अन्न केंद्रात झालेल्या चेंगराचेंगरी ४३ जणांचा मृत्यू; इस्रायली सैन्यावर नरसंहाराचा आरोप

न्यायालयाचे चौकशीचे आदेश

आतापर्यंत या प्रकरणांतर्गत ४२ सुनावण्या गेल्या वर्षी २०२४ सप्टेंबर पासून झाल्या आहेत. दरम्यान या आकड्यात वाढ होत आहे. यामुळेच १५ जुलै २०२५ रोजी इस्लामाबादच्या उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एजाज इशाक खान यांनी चौकशी आयोग स्थापन करण्याचे आदेश शाहबाज सरकारला दिली आहे. तसेच चार महिन्यात ही चौकशी पूर्ण करण्याची अट ठेवली आहे.

कायद्याचा इतिहास

मिळालेल्या माहितीनुसार, १९८० च्या दशकात पाकिस्तानमध्ये लष्करी शासक झियाउल हक यांनी हा कायदा लागू केला होता. कुराणच्या पावित्र्याचे रक्षण करण्यासाठी त्यांनी ईशनिंदा कायदे अधिक कठोर केले होते. १९८६ नंतर यामध्ये मृत्यूदंडाची तरतूद करण्यात आली. तेव्हापासून या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. थिंक टॅंक CRSS ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानमध्ये १९४७ ते २०२१ च्या काळात ७०१ प्रकरणांमध्ये १४१५ आरोपींची नोंद करण्यात आली होती. यातील ८९ जणांना ठार करण्यात आले आहे.

सध्या या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून पाकिस्तानच्या न्यायव्यवस्था आणि धार्मिक सहिष्णुतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. पाकिस्तानमध्ये सध्या दहशतदीचे वातावरण आहे. लोकांमध्ये पाकिस्तान शाहबाज सरकारविरोधा अविश्वास निर्माण होत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिकेत भारतीय महिलेला अटक; १ लाखांच्या चोरीप्रकरणी पोलिसांची कारवाई

Web Title: What is the blasphemy case which caused chaos in pakistans shahbaz government read in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2025 | 10:15 PM

Topics:  

  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

अमेरिकेने ‘या’ देशाच्या प्रमुखांना उचललं? भीषण Air Strike नं हादरवलं; लवकरच होणार मोठा गेम
1

अमेरिकेने ‘या’ देशाच्या प्रमुखांना उचललं? भीषण Air Strike नं हादरवलं; लवकरच होणार मोठा गेम

Venezuelan Govt On Blast: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हवाई हल्ला, अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट, सरकारकडून आणीबाणी जाहीर
2

Venezuelan Govt On Blast: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हवाई हल्ला, अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट, सरकारकडून आणीबाणी जाहीर

धर्म बदलून घेतली होती कुराणवर शपथ; Joharan Mamdani पूर्वी ‘या’ नेत्याने रचला इतिहास
3

धर्म बदलून घेतली होती कुराणवर शपथ; Joharan Mamdani पूर्वी ‘या’ नेत्याने रचला इतिहास

IND vs PAK: २०२६ मध्ये पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! ‘या’ दिवशी येणार आमनेसामने
4

IND vs PAK: २०२६ मध्ये पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! ‘या’ दिवशी येणार आमनेसामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.