Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत-अमेरिका ट्रेड डील कधी होणार फाइनल? जाणून घ्या टॅरिफबाबत काय सांगतात तज्ज्ञ 

India US Trade Deal : भारत आणि अमेरिकेतील व्यापार तणाव अद्यापही कायम आहे. दोन्ही देशांतील व्यापार तणावाचा गंभीर परिणाम होत आहे. दरम्यान तज्ज्ञांनी याबाबत आणि टॅरिफबाबत मोठा दावा केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 07, 2026 | 11:23 PM
India US Trade War

India US Trade War

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत-अमेरिका ट्रेड डील कधी होणार फाइनल?
  • रशियाकडून तेल खरेदीमुळे भारतावर ५०% टॅरिफ
  • जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ
India US Trade Deal : नवी दिल्ली : गेल्या काही काळापासून भारत आणि अमेरिकेमध्ये प्रचंड व्यापार तणाव निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी व्यापारावर चर्चा केली होती. परंतु अद्यापही दोन्ही देशांत कोणताही अंतिम करार झालेला नाही. रशियाकडून तेल खरेदीमुळे अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावलेलेच आहे. याचा अमेरिका आणि भारताच्या व्यापारावर परिणाम होत आहे. दरम्यान एक मोठे वृत्त समोर आले आहे.

‘मोदींशी चांगले संबंध…’ ; ट्रम्प यांचे PM मोदींबाबत मोठे विधान, भारतावरील टॅरिफ कमी होणार?

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या अमेरिका आणि भारताच्या व्यापार समकक्षांमध्ये टॅरिफवर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुर आहे. तज्ज्ञांच्या मते भारत आणि अमेरिकेतील ही बहुप्रशिक्षित व्यापार चर्चा 2026 च्या सहा महिन्यांत अंतिम टप्प्यात पोहोचेल. यामुळे भारतावरील टॅरिफही कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काय सांगतात तज्ज्ञ?

युरेशियाचे प्रमुख आणि जगप्रसिद्ध व्यापार विश्लेषक इयान ब्रेमर सांगतात की, 2026 मध्ये भारतावरील टॅरिफचा धोका कमी होण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते, 2025 मध्ये दोन्ही देशात तणाव निर्माण झाला होता. परंतु 2026 मध्ये याचे महत्त्व अधिक वाढले असून भारतावरील टॅरिफ लक्षणीरित्या कमी होण्याची शक्यता आहे. माध्यमांनी दिलेल्या मुलाखतीत ब्रेमर यांनी हे विधाने केले आहे. मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले की, भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार हा 2026 च्या पहिल्या सहा महिन्यांत अंतिम होईल.

भारत अमेरिका व्यापार चर्चा

जुलै 2025 मध्ये ट्रम्प यांनी भारतावर रशियाकडून तेल खरेदीच्या कारणास्तवर 50% टक्के टॅरिफ लादले होते. तेव्हापासून दोन्ही देशांतील राजकीय आणि व्यापारात तणाव निर्माण झाला. भारताने अमेरिकेशी व्यापारावर चर्चाही सुरु केल्या होत्या. पण अजूनही टॅरिफवर कोणताही निश्चित निर्णय झालेला नाही. शिवाय ट्रम्प यांनी नुकतेच पंतप्रधान मोदींचे कौतुक करत भारताशी चांगले संबंध असल्याचा दावा केला होता. तसेच त्यांनी रशियाकडून तेल खरेदीमुळेच टॅरिफ लावल्याचे म्हटले होते. परंतु टॅरिफ कमी होणार का नाही यावर कोणतेही भाष्य केले नाही.

ट्रम्प-मोदी फोन कॉल

याच वेळी ट्रम्प यांनी 2025 च्या अखेरीस 11 डिसेंबरला पंतप्रधान मोदींशी फोनवरुन संवाद साधला होता. यावेळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या भेटीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. तसेच या फोनकॉलनंतर अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी भारताचे केंद्रिय वाणिज्या मंत्री पियुष्य गोयल यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत अमेरिकेसोबत व्यापार वाटाघाटीवर सविस्तर चर्चा करण्यात आली होती.

तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांच्या विधानाकडे पाहता अमेरिका आणि भारतातील संबंध अजूनही पूर्णपणे बिघडलेले नाही. परंतु दोन्ही देशांमध्ये व्यापार शुल्कावर मतभेद कायम आहेत. ट्रम्प पंतप्रधान मोदींवर रशियाकडून तेल खरेदी कमी केल्यामुळे खुश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र टॅरिफवर प्रश्नचिन्ह कायम आहे.

टॅरिफचा अमेरिकेला सर्वाधिक फटका

सध्या टॅरिफचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेलाच बसला आहे. यामुळे चामडे, रसायने, पादत्राणे, रत्ने आणि दागिने, कापड आणि कोळंबीसह अनेक उद्योंवर परिणाम झाला आहे. भारताच्या निर्यातदारांवरही मोठा दबाव वाढत आहे. परंतु तज्ज्ञांच्या मते येत्या काळात या क्षेत्रांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

ट्रम्प यांचे टॅरिफ प्रयोग अपयशी? अमेरिकन कंपन्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत अमेरिका ट्रेड डील कधी होणार अंतिम?

    Ans: भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार हा 2026 च्या पहिल्या सहा महिन्यांत अंतिम होईल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

  • Que: अमेरिकेने भारतावर का आणि किती टॅरिफ लावले आहे?

    Ans: अमेरिकेने भारतावर रशियाकडून तेल खरेदीमुळे ५०% टॅरिफ लावले होते.

  • Que: टॅरिफबाबत तज्ज्ञांनी काय म्हटले आहे?

    Ans: 2026 मध्ये भारतावरील टॅरिफचा धोका कमी होण्याची शक्यता असल्याचे युरेशियाचे प्रमुख आणि जगप्रसिद्ध व्यापार विश्लेषक इयान ब्रेमर यांनी म्हटले आहे.

Web Title: When will india us trade deal be finalized know what experts say about tariffs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 11:23 PM

Topics:  

  • America
  • Tarrif

संबंधित बातम्या

Donald Trump: ‘जर आपण हरलो, तर ते मला सोडणार नाहीत!’; अमेरिकन रिपब्लिकन खासदार ‘असा’ करणार डोनाल्ड ट्रम्पचा गेम ओव्हर
1

Donald Trump: ‘जर आपण हरलो, तर ते मला सोडणार नाहीत!’; अमेरिकन रिपब्लिकन खासदार ‘असा’ करणार डोनाल्ड ट्रम्पचा गेम ओव्हर

Paris Summit 2026: Ukraine साठी ‘पॅरिस कवच’! रशियाचा पुढचा हल्ला रोखण्यासाठी 35 देश आले एकत्र, वाचा सविस्तर
2

Paris Summit 2026: Ukraine साठी ‘पॅरिस कवच’! रशियाचा पुढचा हल्ला रोखण्यासाठी 35 देश आले एकत्र, वाचा सविस्तर

Venezuela-US War Impact: अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या कारवाईचा शेअर बाजारावर होणार गंभीर परिणाम? मायकेल बरी यांची भविष्यवाणी
3

Venezuela-US War Impact: अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या कारवाईचा शेअर बाजारावर होणार गंभीर परिणाम? मायकेल बरी यांची भविष्यवाणी

War Alert: ‘Greenland विक्रीसाठी नाही!’ कॅनडियन परराष्ट्र मंत्री अनिता आनंद थेट राजधानीत उतरणार; अमेरिकेच्या विरोधात थोपटले दंड
4

War Alert: ‘Greenland विक्रीसाठी नाही!’ कॅनडियन परराष्ट्र मंत्री अनिता आनंद थेट राजधानीत उतरणार; अमेरिकेच्या विरोधात थोपटले दंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.