
Who are the two traitors in Bangladesh who sentenced Sheikh Hasina to death
बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणाने माजी पंतप्रधान शेख हसीनांना जुलै 2024 च्या उठावप्रकरणी मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.
हसीनांच्या दोन जवळच्या सहकाऱ्यांनी – लष्करप्रमुख वकार-उझ-जमान आणि माजी आयजी अल मामून – पुरावे देत न्यायालयात निर्णायक भूमिका बजावली.
इंटरपोल वॉरंटनंतर शेख हसीनांचे भवितव्य आता भारत आणि आगामी बांगलादेश निवडणुकांच्या घडामोडींवर अवलंबून राहणार आहे.
sheikh hasina Death Sentence : बांगलादेशच्या (Bangladesh) राजकारणात आजपर्यंत अनेक उलथापालथी पाहायला मिळाल्या, परंतु माजी पंतप्रधान शेख हसीना (sheikh hasina) यांना न्यायालयाने दिलेला मृत्युदंड (Death Sentence) हा देशाच्या इतिहासातील सर्वात धक्कादायक प्रसंग ठरत आहे. जुलै 2024 मधील विद्यार्थी उठाव, त्यानंतर झालेला पोलिस गोळीबार आणि 1,400 जणांचा मृत्यू या सर्वांची जबाबदारी ठपक्यात येताच आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणाने (ICT) कठोर निर्णय दिला. या प्रकरणातील सर्वात विशेष गोष्ट म्हणजे शेख हसीनांचे दोन ‘जवळचे’ मानले जाणारे सहकारीच त्यांच्यावर सर्वात घातक पुरावे सादर करणारे ठरले.
वकार-उझ-जमान हे बांगलादेशचे विद्यमान लष्करप्रमुख. त्यांची नियुक्ती स्वतः शेख हसीनांनी केली होती. अनेकजण तर त्यांना हसीनांचे ‘नातेवाईक’ मानतात.
मात्र, जुलै उठावादरम्यान परिस्थिती गंभीर होत असताना वकार यांनी अमेरिकन अधिकाऱ्यांशी गुप्त बैठक केल्याचा आरोप आहे.
माजी गृहमंत्र्यांच्या मते,
दंगलखोरांवर नियंत्रण आणण्यास वकार यांनी जाणीवपूर्वक उशीर केला.
परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतरच त्यांनी हसीनांना माहिती दिली.
वकार यांच्या सल्ल्यावरच हसीनांनी राजीनामा दिला, पण शांतता प्रस्थापित झाल्यावर परत बोलावू, असे सांगूनही त्यांनी हसीनांना देशाबाहेर गेल्यानंतर संपूर्ण खेळ बदलला आणि अंतरिम सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू केली.
हा घटनाक्रम हसीनांविरुद्धच्या खटल्यातील सर्वात मोठा ‘टर्निंग पॉईंट’ ठरला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sheikh Hasina Death Sentence : ‘ऑडिओ, साक्ष आणि पुरावे…’; अखेर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा
अल मामून हे जुलैच्या उठावात पोलिस दलाचे प्रमुख होते. सुरुवातीला त्यांच्यावरही कारवाईची तलवार होती, परंतु खटल्यादरम्यान त्यांनी सरकारी साक्षीदार बनण्याचा निर्णय घेतला. त्यांनी न्यायालयात दिलेली साक्ष अतिशय निर्णायक ठरली. मामून यांच्या वक्तव्यांनंतर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, ज्यात शेख हसीना पोलिसांना “गोळीबार करा” असे निर्देश देत असल्याचा दावा करण्यात आला.
या साक्षीचा फायदा मामून यांना झाला.
त्यांना फक्त 5 वर्षांची शिक्षा झाली असून ते आधीच 17 महिने तुरुंगात आहेत.
बांगलादेश सरकार इंटरपोलमार्फत आंतरराष्ट्रीय वॉरंट जारी करणार आहे. ते भारतासोबत शेअर केल्यानंतर हसीनांच्या प्रत्यर्पणाचा निर्णय पूर्णपणे भारताच्या हातात असेल. दरम्यान, पुढील सहा महिन्यांत बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. विरोधी पक्ष बीएनपीने हसीनांच्या प्रकरणात “सौम्य दृष्टीकोन” ठेवण्याचे संकेत दिले आहेत. बीएनपीचे सरचिटणीस मिर्झा फखरुल म्हणाले,
“आम्ही सूडाचे राजकारण करणार नाही. सत्तेत आलो तर काही खटले मागे घेऊ.”
मात्र कोणते खटले मागे घेतले जातील, हे अजूनही अस्पष्ट आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Masood Azhar : ‘जिहादसाठी…’ जैशचा दहशतवादी मसूद अझर गडगंज संपत्तीचा मालक; ‘एका’ ऑडिओने पाकिस्तानात मोठी खळबळ
हे प्रकरण फक्त एका नेत्याला झालेल्या शिक्षेचे नाही, हे राजकीय संबंध, सत्ता, विश्वासघात, परकीय हस्तक्षेप आणि बदलत्या निष्ठा यांची गुंतागुंत दाखवणारा वास्तवदर्शी आरसा आहे. बांगलादेशचे राजकारण आता एका निर्णायक टप्प्यावर आहे, आणि पुढील काही महिने संपूर्ण दक्षिण आशियाई राजकारणासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
Ans: जुलै 2024 मधील विद्यार्थी उठावातील पोलिस गोळीबारात 1,400 जणांचा मृत्यू; हसीनांना जबाबदार ठरवले.
Ans: लष्करप्रमुख वकार-उझ-जमान आणि माजी पोलिस प्रमुख अल मामून.
Ans: इंटरपोल वॉरंट भारताला पाठवला जाईल; प्रत्यर्पणाचा निर्णय भारतावर अवलंबून.