Who is Lee Jae-myung South Korea’s newly elected president
सियोल: नुकत्याच दक्षिण कोरियाच्या अध्यक्षीय निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीत दक्षिण कोरियाच्या विरोधी पक्षाच्या ली जे-म्युंग यांचा दणदणीत विजय झाला आहे. जनतेने ली जे-म्युंग यांची अध्यक्ष म्हणून निवड केले आहे. त्यांना दक्षिण कोरियात कोरियन डोनाल्ड ट्रम्प म्हणून पदवी दिली आहे.
गेल्या वर्षी दक्षिण कोरियात ३ डिसेंबर २०२४ रोजी सहा तासांसाठी मार्शल लॉ लागू करण्यात आला होता. यामुळे दक्षिण कोरियात मोठी खळबळ उडाली होती. तत्कालीन राष्ट्रपती (योन सुक योल) यांनी हा निर्णय लागू केला होता. त्यांच्या या निर्णयावर विरोधकांना जोरदार टीका केली होती. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली होती. देशात मोठ्या प्रमाणात राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती.
दरम्यान युन सोक योल यांच्या राजीनाम्यानंतर दक्षिण कोरियात नुकत्याच अध्यक्षीय निवडणुका पार पडल्या आहे. या निवडणुकीत विरोधी पक्ष सत्तेत आला आहे. युन सुक योल यांनी विरोधी पक्षावर उत्तर कोरियाशी हातमिळवणी केल्याचाही आरोप केला होता. या निवडणूकीत विरोधी डेमोक्रटिक पक्षाच्या ली यांना ४९ टक्के मते मिळाली आहेत. तर युन सुक योल यांच्या पक्षाच्या उमेदवार किम मून सू यांनी ४१ टक्के मते मिळाली आहे.
निवडणूकीपूर्वी ली यांच्यावर उत्तर कोरिाच्या सर्वोच्च न्यायासयामध्ये खटला सुरु होता. ली यांच्यावर फसवणुकीच्या प्रकरणात खटला सुरु होता. तसेच त्यांच्या २०१७-२२ च्या राष्ट्राध्यक्ष मून जे-उन यांच्या कार्यकाळात, चलन तस्करी, भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर, न्यायालयाचा अवमान आणि निवडणूक फसवणूकीचा आरोपांचा समावेश आहे. त्यावेळी मून जे-इन हे देखील ली यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाचे होते. सध्या ली हे मून जे-इनचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत.
ली यांच्याविरोधात साक्ष देणाऱ्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. यामुळे त्यांच्यावरील आरोप न्यायालयात सिद्ध होऊ शकले नाहीत. ली यांच्यावरील आरोपांमुळे त्यांना निवडणूक लढवण्यात अनेक समस्या आल्या असत्या. सध्या त्यांच्या सत्तेत येण्याने मोठी खळबळ उडाली आहे.
कोरियाचे ट्रम्प म्हणजे ली जे म्युंग आणि ट्रम्प यांची कहाणी काहीशी समान आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळचे मित्र एपस्टिन यांचाही तुरुंगात संशयास्प मृत्यू झाला होता. सध्या यावरुन ट्रम्प आणि मस्क यांच्या वद आहे. जेफ्री एपस्टिनच्या वेश्या व्यवसायाशी ट्रम्प यांचा देखील संबंध असल्याचे मस्क यांनी म्हटले आहे. परंतु तपासावेळी ट्रम्प यांच्याविरोधात कोणतेही पुरावे आढळले नाही. तसेच अमेरिका आणि दक्षिण कोरियाचा सर्वात मोठा शत्रू उत्तर कोरिया आहे.