Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संपूर्ण युरोपला तालावर नाचवणारी जगातील सर्वात खतरनाक ‘गुप्तहेर’, कोण होत्या माताहरी?

या हल्ल्यांनंतर इराणमध्ये तपास सुरू झाला तेव्हा इस्त्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादची सर्वात धोकादायक महिला गुप्तहेर ‘कॅथरीन पेरेझ शकेद’चे या महिलेचे नाव समोर आले

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 22, 2025 | 03:36 PM
संपूर्ण युरोपला तालावर नाचवणारी जगातील सर्वात खतरनाक ‘गुप्तहेर’, कोण होत्या माताहरी?
Follow Us
Close
Follow Us:

इस्रायलने १३ जून रोजी इराणविरुद्ध ऑपरेशन रायझिंग लायन सुरू केले. या ऑपरेशनचे लक्ष्य इराणची अणु सुविधा पूर्णपणे नष्ट करणे होते. इस्रायली लढाऊ विमानांनी केवळ अणु स्थळांनाच लक्ष्य केले नाही तर अणुशास्त्रज्ञ आणि उच्च लष्करी अधिकाऱ्यांवरही हल्ला करून त्यांना ठार मारले. इराणसाठी हा एक मोठा धक्का होता.  इस्रायलचे हल्ले इतके अचूक होते की त्यांना प्रत्येक अणुशास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकाऱ्याचे वास्तविक स्थानदेखील माहित होते.

या हल्ल्यांनंतर इराणमध्ये तपास सुरू झाला तेव्हा इस्त्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादची सर्वात धोकादायक महिला गुप्तहेर ‘कॅथरीन पेरेझ शकेद’चे या महिलेचे नाव समोर आले. फ्रेंच वंशाच्या या महिला गुप्तहेराने हे संपूर्ण ऑपरेशन इतक्या हुशारीने पार पाडले की तिला आता ‘ब्लॅक विडो’ अशी उपमा देण्यात आली आहे. ही ब्लॅक विडो आता मोसादची सर्वात यशस्वी आणि प्रसिद्ध गुप्तहेर बनली आहे.  पण एक काळ असाही होता, ज्यावेळी एका महिला गुप्तहेराने संपूर्ण युरोपला आपल्या तालावर नाचण्यास भाग पाडले होते. या महिला गुप्तहेराला  आजपर्यंत जगातील सर्वात धोकादायक गुप्तहेर मानले जाते.

Hindi Language News: हिंदी भाषा सक्तीबाबत खोटे विधान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस

माता हरीची कहाणी…

ही कहाणी आहे हेरगिरीच्या जगातली सर्वात रहस्यमय आणि प्रसिद्ध गुप्तहेर माता हरीची. १८७६ मध्ये नेदरलँड्समध्ये जन्मलेल्या ‘गर्ट्रूड मार्गारेथा जेले’ यांना हेरगिरीच्या जगात माता हरी म्हणून ओळखले जाते. माता हरी यांनी सुरूवातीला नृत्यांगना म्हणून आपले काम सुरू केले आणि हे काम करण्यासाठी त्या १९०५ मध्ये फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाल्या. संपूर्ण युरोप माता हरीच्या शैली आणि सौंदर्याने वेडा झाला होता.  फ्रेंच आणि जर्मन सैन्यातील अनेक उच्च अधिकारीही त्यांचे नृत्य पाहण्यासाठी येऊ लागले. इथूनच माता हरीवरचा हेरगिरीचा अध्याय सुरू झाला. आपल्या आकर्षक सौंदर्याचे वेड लावून माता हरीने जर्मन सैनिकांची अनेक गुपिते फ्रेंच सरकारला सांगितली. महत्त्वाची बाब म्हणजे, ती डबल एजंट होती आणि हिटलरच्या सैन्यासाठीदेखील हेरगिरी करत असल्याचे सांगण्यात येते.

Bihar Election 2025 : गरीब कुटुंबाना मिळणार 2 लाख रुपये; नितीश कुमारांची घोषणा, नक्की काय आहे योजना?

१९१७ मध्ये अटक

जर्मनीसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली माता हरीला १९१७ मध्ये अटक करण्यात आली. न्यायालयात एक सुनावणी झाली, मात्र गुप्तहेरी आरोप तिने फेटाळून लावला. ती कायम स्वत: ला एक नर्तकी म्हणूनच सादर करायची.  पण तिच्यावरील आरोप सिद्ध झाल्यानंतर तिला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. माता हरी यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. माता हरीच्या मृत्यूनंतर, ती फ्रान्ससाठी हेरगिरी करत होती की जर्मनीसाठी हे एक गूढच राहिले. पण फ्रेंच आणि जर्मन सैन्यातील जवळजवळ सर्व उच्च अधिकाऱ्यांनी त्यांची गुपिते माता हरी यांच्यासमोर उघड केल्याचेही सांगितले जाते.

Web Title: Who was matahari the worlds most dangerous spy of french descent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2025 | 03:36 PM

Topics:  

  • Donald Trump

संबंधित बातम्या

Russia Ukraine War :ट्रम्प-झेलेन्स्की बैठकीपूर्वीच रशियाचा युक्रेनवर हल्ला; खार्किव्ह प्रदेशात ड्रोन्सचा वर्षाव
1

Russia Ukraine War :ट्रम्प-झेलेन्स्की बैठकीपूर्वीच रशियाचा युक्रेनवर हल्ला; खार्किव्ह प्रदेशात ड्रोन्सचा वर्षाव

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी
2

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी

Russia Ukriane War : युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प यांचा पुन्हा एक प्रयत्न; आज झेलेन्स्की आणि युरोपीय नेत्यांशी करणार चर्चा
3

Russia Ukriane War : युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प यांचा पुन्हा एक प्रयत्न; आज झेलेन्स्की आणि युरोपीय नेत्यांशी करणार चर्चा

रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पुतिनने ट्रम्पसमोर ठेवली ‘ही’ अट; अलास्का भेटीवर मोठा खुलासा
4

रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पुतिनने ट्रम्पसमोर ठेवली ‘ही’ अट; अलास्का भेटीवर मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.