Who will be the next pope after Francis The selection process
कॅथलिक ख्रिश्चन धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी वयाच्या 88 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे कॅथलिकांमध्ये दुख:चे वातावरण असून जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. व्हॅटिकनने त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. पोप फ्रान्सिस यांनी 12 वर्षे कॅथलिक चर्चेचा पदाभार संभाळला. त्यांनी 2013 मध्ये पोप बेनेडिक्ट सहावे यांच्या राजीनाम्यानंतर कॅथलिक चर्चचा पदाभार स्वीकारला होता. सध्या त्यांच्या मृत्यूनंतर आता पुढील धर्मगुरु कोण असतील असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचदरम्यान काही पाच नावे समोर आली आहे.
पोप धर्मगुरुची निवड अत्यंत गोपनीय आणि परंपरागत पद्धतीने करण्यात येते. याला पॅपल कॉन्क्लेव असे म्हटले जाते. जगभरातील कार्डिनल म्हणजे वरिष्ठ पाद्री एकत्र येतात आणि मदतदानाद्वारे नवीन पोपची निवड करतात. सध्या व्हॅटिकनमध्ये 235 कार्डिनल आहेत. यामध्ये 80 वर्षाखाली 138 कार्डिनला असून त्यांना मतदानाच हक्क आहे.
व्हॅटिकनच्या प्रशासनामध्ये 2013 पासून कार्डिनल पिएट्रो पॅरोलिन कार्य करत आहेत. ते पोप फ्रान्सिस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. सध्या त्यांच्या वयामुळे आणि अनुभवामुळे त्यांना पोप धर्मगुरुसाठी दावेदार म्हणून मानले जात आहे. परराष्ट्र सचिव म्हणून 2013 पासून त्यांनी व्हॅटिकनचे राजनैतिक आणि प्रशासनाचे कामकाज पाहिले आहे.
पीटर एर्डो यांनी रुढीवादी आणि पारंपारिक वाचारांसाठी ओळखले जाते. त्यांचे वय 72 असून त्यांनी युरोपियमध्ये बिशप म्हणून कॉन्फरन्स कौन्सिलचे माजी अध्यक्ष म्हणून कार्य केले आहे. पीटर एर्डो कॅथलिक धर्माचे कट्टरवादी आहेत. 2003 मध्ये त्यांना पोप जॉन पॉल दुसरे यांनी कार्डिनल बनवले होते.
कॅथलिक चर्चमधील सर्वात प्रभावशाली आणि प्रगतीशील व्यक्तीमत्व म्हणून कार्डिनल मॅटेओ झुप्पी यांनी ओळखले जाते. पोप फ्रान्सिस यांच्या आवडत्या नेत्यापैकी एक आहेत. त्याचे वय 69 असून त्यांनी 2022 पासून इटालियन एपिस्कोपल परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. 2019 मध्ये पोप फ्रान्सिस यांनी त्यांची कार्डिनल म्हणून निवड केली होती.
कॅथलिक चर्चमधील सर्वात रुढीवादी म्हणून कार्डिनल रेमंड बर्क आहेत. त्यांचे वय 70 आहे. 2010 मध्ये सोळावे पोप बेनेडिक्ट यांनी त्यांना कार्डिनल म्हणून नियुक्त केले होते. त्यांनी पोप फ्रान्सिस यांच्या सुधारवादी धोरणांना नेहमी विरोध केला.
लुईस अँटोनियो 67 वर्षांचे असून त्यांची पोप धर्मगुरु पदी निवड झाल्यास ते इतिहासातील पहिले आशियाई पोप बनतील. 2012 मध्ये पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी त्यांची कार्डिनल म्हणून नियुक्ती केली होती. चर्चमधील सर्वात प्रगतशील व्यक्तींमध्ये त्यांची ख्याती आहे. त्यांचे विचार पोप फ्रान्सिस यांच्या विचारसणीवर आधारित आहे.
तसेच, आफ्रिकेतूनही दोन नावे पुढे येत आहेत – पीटर टर्कसन (घाना) आणि फ्रीडोलिन अंबोंगो (कांगो) आफ्रिकेच्या प्रतिनिधित्वाचा विचार करताना त्यांची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवे पोप कोण होणार, हे लवकरच स्पष्ट होईल, पण या निवडीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे.