Why does Nepal print its currency in China who benefits the most
नेपाळकडे प्रगत सुरक्षा तंत्रज्ञान नसल्याने ते आपले चलन चीनसह इतर देशांमध्ये छापते.
चीनमध्ये नोटा छापल्याने नेपाळचे कोट्यवधी रुपये वाचतात, पण यामुळे चीनचा देशांतर्गत हस्तक्षेप वाढल्याची भीतीही आहे.
स्वतःचे प्रिंटिंग प्रेस उभारणे नेपाळसाठी महागडे असल्याने, लहान देशांप्रमाणेच त्यांना परदेशावर अवलंबून राहावे लागते.
Nepal News : काठमांडूच्या रस्त्यांवर आंदोलकांचा आवाज सतत घुमतो आहे. तरुण बेरोजगारीवर प्रश्न विचारत आहेत, संसदेत जाळपोळीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच दरम्यान एक मुद्दा पुन्हा पुढे आला आहे. नेपाळचे चलन छापण्याचा अधिकार चीनकडे का आहे? आज नेपाळची अर्थव्यवस्था मोठ्या संकटातून जात आहे. २०२३ मध्ये देशावर २४ लाख कोटी रुपयांचे कर्ज होते, जे २०२४ मध्ये २६ लाख कोटींवर गेले. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिल्यानंतरही लोकांचा राग शमलेला नाही. त्यातच जेव्हा लोकांना समजले की नेपाळचे पैसे चीनमध्ये छापले जातात, तेव्हा संताप अधिक वाढला.
नेपाळ राष्ट्र बँकेने अलीकडेच एका चिनी कंपनीला १०० रुपयांच्या नोटा छापण्याचे कंत्राट दिले होते. या नोटांमध्ये नेपाळचा नकाशा बदललेला दाखवण्यात आला लिपुलेख, कलापाणी आणि लिंपियाधुरा हे त्यात समाविष्ट केले होते. भारताने या पावलावर नाराजी व्यक्त केली कारण त्याला हा नकाशा वादग्रस्त वाटला.फक्त एवढेच नाही, तर २०१७ मध्येही चायना बँकनोट प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशनने (CBPM) २.४ कोटी १००० रु पयांच्या नोटा छापून नेपाळला दिल्या होत्या. त्या वेळी भूकंपग्रस्तांसाठी मदत म्हणून त्या नोटांचे वितरण महत्त्वाचे मानले गेले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : WeAreFire : ‘उत्कटतेच्या ज्वाला…’ ‘या’ नेपाळी विद्यार्थ्यांचे आक्रमक शब्द बनले जनतेचा गगनभेदी आवाज, प्रचंड VIRAL
हा प्रश्न अनेकांना पडतो. खरं सांगायचं तर, चलन छापणे म्हणजे फक्त कागदावर शाई लावणे नाही. नोटांमध्ये वॉटरमार्क, सुरक्षा धागा, मायक्रोप्रिंटिंग, होलोग्राम अशी अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये असतात. यासाठी अत्याधुनिक मशीनरी आणि उच्च तंत्रज्ञान आवश्यक आहे. नेपाळकडे अजूनही अशा दर्जेदार मशीन नाहीत. जर त्यांना स्वतःची प्रिंटिंग प्रेस उभारायची असेल तर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागेल, जी त्यांच्या अर्थव्यवस्थेला झेपणारी नाही. उलट, चीनसारख्या देशांनी कमी दरात नोटा छापून देण्याची ऑफर दिली. यामुळे नेपाळचे कोट्यवधी रुपये वाचले. याची पुष्टी स्वतः नेपाळ राष्ट्र बँकेचे माजी गव्हर्नर चिंतामणि शिवाकोटी यांनी केली होती. त्यांचा दावा होता की “चीनमध्ये छापल्यामुळे आमचा खर्च कमी झाला, इतर देशांच्या तुलनेत लाखो रुपये वाचले.”
इथेच खरी चर्चा सुरू होते. एका बाजूला नेपाळला कमी खर्चात नोटा मिळतात, पण दुसऱ्या बाजूला चीनचा देशांतर्गत हस्तक्षेप वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जाते. कारण, चलन म्हणजे देशाची ओळख, देशाचा आत्मसन्मान. जर त्याचं नियंत्रण परदेशात असेल, तर लोकांचा विश्वास ढळू शकतो. याच कारणामुळे काठमांडूमध्ये आंदोलनकर्त्यांनी चिनी नेत्यांचे पोस्टर फाडले. संदेश स्पष्ट होता “चीनचा हस्तक्षेप आम्हाला मान्य नाही.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : नेपाळला आगीच्या भट्टीत रूपांतरित करतानाचा ‘हा’ 51 सेकंदांचा ड्रोन VIDEO पहा; नेत्यांना एकामागून ‘असे’ फेकले नदीत
नेपाळच नव्हे तर भूतान, मालदीव, मॉरिशससारखे अनेक लहान देश परदेशातच आपले चलन छापतात. ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, भारत आणि चीन हे अशा प्रिंटिंगसाठी मोठे केंद्र मानले जातात. पण तरीही, नेपाळसारख्या लहान देशासाठी हे केवळ आर्थिक सोयीसाठी आहे की राजकीय दबावाखालील निर्णय, हा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. नेपाळ चीनमध्ये नोटा छापतो कारण ते स्वस्त, सोयीस्कर आणि तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित आहे. पण यामध्ये चीनचा प्रभाव वाढतोय हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे, नेपाळसमोर दोनच पर्याय आहेत किंवा स्वतःचं प्रिंटिंग प्रेस उभारणं, किंवा दुसऱ्यांच्या हातात आपली चलननीती सोपवणं.