Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयटी हब, गॅस आणि बरंच काही… पंतप्रधान मोदींचा क्रोएशिया दौरा भारतासाठी का महत्वाचा?

सध्या पंतप्रधान नरेंदी मोदी तीन देशांच्या परराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी सायप्रसला भेट दिली आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडात सुरु असलेल्या G7 शिखर परिषदेत सहभागी झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 17, 2025 | 10:00 PM
मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर; दोन महिन्यांपेक्षा जुन्या फायली तात्काळ निकाली काढण्याचे आदेश

मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर; दोन महिन्यांपेक्षा जुन्या फायली तात्काळ निकाली काढण्याचे आदेश

Follow Us
Close
Follow Us:

PM Modi Croatia Visit : नवी दिल्ली : सध्या पंतप्रधान नरेंदी मोदी तीन देशांच्या परराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी सायप्रसला भेट दिली. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संबंध, व्यापार, आणि गुंतवणूक वाढी आणि धोरणात्मक सहकार्यावर चर्चा करण्यात आली. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडामध्ये आहेत. कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या आमंत्रणावरुन पंतप्रधान मोदी कॅनडात सुरु असलेल्या G7 शिखर परिषदेत सहभागी झाले आहेत.

पंतप्रधान मोदी त्यांच्या पुढी दौऱ्याच्या टप्प्यात युरोपीय देश क्रोएशियाला भेट देणार आहेत. या दौऱ्याचा उद्देश भारत आणि क्रोएशियामध्ये ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान (IT), व्यापार आणि सांस्कृतिक सहकार्य अधिक मजबूत करणे आहे. भारतासाठी पंतप्रधान मोदींचा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

G -7 Summit : काय आहे G-7? कसं चालतं काम? भारत सदस्य नसताना दरवेळी आमंत्रण का? वाचा सविस्तर

भारतासाठी क्रोएशियाचा दौरा इतका महत्वाचा का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदींचा हा दौरा ऐतिहासिक दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. क्रोएशियाला भारताच्या पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे. क्रोएशिया हा देश युरोप खंडातील उर्जी स्रोतांचा केंद्रबिंदू आहे. क्रोएशियात नैसर्गिक वायूचा मोठा साठा आहे. हा देश युरोपसह, कतार आणि अमेरिकाला नैसर्गिक वायूचा पुरवठा करतो. पंतप्रधान मोदींचा हा दौरा भारताच्या परराष्ट्र धोरणासाठी अतिशय महत्वाचा आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये उर्जा क्षेत्रात दृढ संबंध प्रस्थापित होतील.

तसेच गेल्या काही काळात दोन्ही देशातील संबंधांमध्ये चांगली प्रगती झाली आहे. जागतिक भू-राजकीय परिस्थितीत सध्या अनेक बदल घडून येत आहेत. अशा परिस्थिती पंतप्रधान मोदींचा हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

तेल व्यापारासाठी नवीन बाजारपेठांच्या शोधात भारत

रशिया-युक्रेन आणि इराण इस्रायल युद्धामुळे जगातिक तेल बाजारपेठेवर गंभीर परिणाम होत आहे. अशातच भारताला नैसर्गिक वायूसाठी दुसऱ्या विकल्पाची गरज आहे. भारत हा रशिया आणि इराणकडून सर्वात जास्त कच्चे तेल आयात करणारा देश आहे. परंतु सध्या दोन्ही देश युद्धात गुंतलले आहे, अशातच क्रोएशियाशी ही भागीदारी अत्यंत महत्वाची मानली जात आहे. युरोपीय बाजारपेठांमध्ये यामुळे भारतासाठी सोपा मार्ग उपल्बध होईल.

सध्या गेल ( GAIL) व इंडियन ऑईल कॉर्पोरेशन सारख्या भारतातील ऊर्जा कंपन्या नैसर्गिक वायूसाठी नवीन उत्पादकांच्या शोधात आहेत. क्रोएशिया युरोपियन संघाचा सदस्य असून भारत EU-FTA करारा संदर्भात चर्चा वाढवत आहे. यामुळे भारतासाठी हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

क्रोएशियाचे आय टी क्षेत्र

शिवाय क्रोएशियाच्या आय टी क्षेत्रामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. ही भारतासाठीही एक चांगली संधी आहे. भारताच्या आयटी कंपन्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही भेट अत्यंत महत्वाची ठरेल. यामुळे भारताचे क्रोएशियाशी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सायबर सिक्युरिटी व आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात संबंध अधिक मजबूत होतील.

तसेच क्रोएशियातील उच्चशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ भारताच्या आयटी कंपन्यांसाठी फायद्याचे ठरतील. गेल्या काही काळात दोन्ही देशांमध्ये आर्थिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठी अनेक करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. २०२० मधील डिजिटल परिवर्तन आणि स्टार्टअप सहकार्यावर चर्चा करण्यात आली होती.

गेल्या वर्षी भारत आणि क्रोएशियामध्ये 306 मिलियन डॉलरचा द्विपक्षीय व्यापार झाला आहे. भारताकडून 250 मिलियन डॉलर ची निर्यात क्रोएशिया मध्ये झाली आहे. भारताच्या दृष्टीने ही क्रोएशिया भेट एक धोरणात्मक संबंध प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.

G-7 Summit : ‘हा केवळ पब्लिसिटी स्टंट ‘ ; फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनवर का भडकले ट्रम्प?

Web Title: Why is prime minister modis visit to croatia important for india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 10:00 PM

Topics:  

  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

अमेरिकेमध्ये EX- Girlfriend चा केला खून अन् आला भारतात पळून; तमिळनाडूत आवळल्या मुसक्या
1

अमेरिकेमध्ये EX- Girlfriend चा केला खून अन् आला भारतात पळून; तमिळनाडूत आवळल्या मुसक्या

Saudi Camel Fest: काय सांगता! उंट जिंकला आणि मालकाला मिळालं ‘अख्खं बेट’? वाचा सौदी अरेबियातील ‘या’ अजब बक्षिसाची रंजक कथा
2

Saudi Camel Fest: काय सांगता! उंट जिंकला आणि मालकाला मिळालं ‘अख्खं बेट’? वाचा सौदी अरेबियातील ‘या’ अजब बक्षिसाची रंजक कथा

Iran Protest : इराणमध्ये Gen Z आंदोलन उफाळलं; सुरक्षा दलाच्या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू
3

Iran Protest : इराणमध्ये Gen Z आंदोलन उफाळलं; सुरक्षा दलाच्या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू

व्हेनेझुएलावरील अमेरिकी हल्ल्याने उडाली Kim Jong UN ची घाबरगुंडी? केली हायपरसॉनिक क्षेपणास्त्र चाचणी
4

व्हेनेझुएलावरील अमेरिकी हल्ल्याने उडाली Kim Jong UN ची घाबरगुंडी? केली हायपरसॉनिक क्षेपणास्त्र चाचणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.