Will hold talks with 3 countries America may exempt India from tariffs Trump's changed tone
वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच भारत आणि जगभरातील इतर देशांवर टैरिफ लावण्याची घोषणा केली आहे. मात्र ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अमेरिकन बाजारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. बाजारात विक्री आणि कॉर्पोरेट अमेरिकनांमध्ये नाराजी वाढत आहे. ट्रम्प यांच्या घोषणेमुळे अमेरिका आणि इतर देशांमध्ये मंदी येऊ शकते, असे मानले जात आहे. अमेरिकन बाजारावर टॅरिफचा नकारात्मक परिणाम झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले सूर बदलले आहेत.
ते आता भारत, इस्त्रायल आणि व्हिएतनाम यांच्या संपकांत आहेत. टैरिफ लावण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी ट्रम्प या तिन्ही देशांसोबतचा वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. ट्रम्प प्रशासनाने सुरुवातीला अनेक देशांवर टॅरिफ लावला. आता त्यांना त्या देशांशी चर्चा करायची आहे. टॅरिफमध्ये अडकलेल्या देशांनी घाबरण्याऐवजी फोन उचलून चर्चेसाठी यावे, असे अमेरिकन प्रशासनाचे म्हणणे आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये ट्रम्प यांनी लिहिले की, व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस तो लाम यांनी एक प्रस्ताव ठेवला आहे, जर परस्पर करार झाला तर ते त्यांचा टॅरिफ शून्यावर आणतील.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘तो वेडा आहे…’ अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प विरोधात हजारो लोकांची निषेध रॅली, कारण काय?
चीनविरुद्ध अमेरिका संतप्त
अमेरिकेने चीनवर ३४ टक्के टॅरिफ लावला आहे. प्रत्युत्तरात चीननेही अमेरिकन वस्तूंवर ३४ टक्के टैरिफ लावण्याची घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी बीजिंगवर टीका केली आणि म्हणाले की, चिनी वस्तूंवर ३४ टक्के टैरिफ लावल्याने चीन घाबरला आहे. अमेरिकेने यापूर्वीही चीनवर २० टक्के टैरिफ लावला होता, याची आठवण करुन द्यायची झाल्यास चीनवर आता एकूण ५४ टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे.
विशेष करारांवर भर
काही देश टॅरिफवर चर्चा करत आहेत. ट्रम्प व्हिएतनाम, भारत आणि इस्रायल यांच्याशी नवीन टॅरिफच्या मुदतीपूर्वी विशेष व्यापार करारांवर सक्रियपणे चर्चा करत आहेत.
दोन्ही पक्षांची सहमती झाल्यास नवीन मार्ग खुला होऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २६%, व्हिएतनामवर ४६% आणि इस्रायलवर १७% टैरिफ लावला.
अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने; शेअर बाजारात पडझड ट्रम्प म्हणाले, श्रीमंत व्हायची वेळ आली
गेल्या काही दिवसांपासून अमेरिकन शेअर बाजारात गोंधळ सुरू आहे. प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाल्याने मंदीची भीती अधिकच वाढली आहे, ज्यामुळे जागतिक गुंतवणूकदार चिंतेत पडले आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता श्रीमंत होण्याची वेळ आली आहे असे वादग्रस्त विधान केले आहे, ज्यामुळे बाजारात आणखी अनिश्चितता निर्माण झाली आहे. ट्रम्प यांच्या २ एप्रिल रोजी रेसिप्रोकल टैरिफ (परस्पर शुल्क) जाहीर केल्यापासून अमेरिकेसह जगभरातील शेअर बाजारात भूकंप आला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : गुजरातमध्ये ‘वतन प्रेम योजने’अंतर्गत NRI भारतीयांनी खेड्यांचे चित्रच बदलले; निधीतून सर्वांगीण विकासाची योजना
ट्रम्प यांच्या ‘लिबरेशन डे टैरिफ्स’ नंतर बाजारात घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांना सुमारे ६ ट्रिलियन डॉलर्स (सुमारे ५०० लाख कोटी रुपये) नुकसान झाले. कोविड काळानंतरची ही सर्वात मोठी साप्ताहिक घसरण ठरली पण, ट्रम्प यांच्यावर बाजारातील गोंधळाचा परिणाम झालेला दिसत नाही आणि ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत. विश्लेषकांच्या मते, हे व्यापार युद्ध जागतिक अर्थव्यवस्थांना मंदीकडे ढकलू शकते. आर्थिक विध्वंसाकडे दुर्लक्ष करून, ट्रम्प यांनी टूथ सोशलवर श्रीमंत होण्याची सुवर्णसंधी म्हणून उल्लेख केला. त्यांनी लिहिले की, अमेरिकेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मी सांगू इच्छितो की माझ्या धोरणांमध्ये कधीही बदल होणार नाही. श्रीमंत होण्याची ही उत्तम वेळ आहे- पूर्वीपेक्षाही श्रीमंत