Will Trump get the Nobel Peace Prize Who is awarded this honor Find out
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाकिस्तानने नोबेल पुरस्कारासाठी नामांकित केले आहे. नुकतेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी ट्रम्प यांची भेट घेतली होती. या बैठकीत ट्रम्प यांनी स्वत:च पाकिस्तानला असे करण्यास सांगतिल्याचा सध्या चर्चा सुरु आहेत.
यामुळे पाकिस्तानच्या नामांकनना नंतर ट्रम्प यांना पुरस्कार मिळणार का? तसेच काय आहे हा पुरस्कार आणि कोणाला दिला जातो. तसेच पाकिस्तानला असे करुन ट्रम्प यांच्या नजरेच हिरो बनायचे आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. आजा आपण या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.
नोबेल शांती पुरस्कार हा जगातील सर्वाति प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे. हा पुरस्कार दरवर्षी नॉर्वेतील नार्वेजियन नोबेल समितीद्वारे प्रदान केला जातो. यासाठी नामांकन आणि निववड प्रक्रिया अत्यंत गुप्तपणे केली जाते. या पुरस्कारासाठी कोणालाही नामांकित करता येत नाही. यासाठी केवळ विशिष्ट व्यक्तींनाच अधिकार असतो. नामांकन करण्याचा अधिकार हा एखाद्या देशाचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष मंत्री आणि संसद सदस्याला असतो.
तसेच आंतरराष्ट्रीय न्यायालय व स्थायी मध्यस्थता न्यायालयाचे सदस्यही यासाठी नामांकन करु शकतात. विशिष्ट विद्यापीठांचे प्राध्यपकक, रेक्टर आणि संचालक, शांती संशोधन संस्था आणि परराष्ट्र धोरण संस्थांचे प्रमुख, नोबेल शांती पुरस्कार विजिते, प्रतिनीधी, तसेच नॉर्वेजियन नोबेल समितीचे सदस्य आणि सल्लागारांनाही हा अधिकार असतो.
सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार मिळणे शक्य नाही. कारण, सध्याच्या अध्यक्षीय कार्यकाळात युक्रेन, युरोप, हमास यांसारख्या मुद्द्यांवर घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे हा पुरस्कार त्यांना मिळणार नाही. सध्या त्यांच्या इराणविरोधी भूमिकेमुळेही मध्य पूर्वेत अस्थिता निर्माण झाली आहे.
Middle East Conflict : इराणने घेतला बदला; सीरियातील अमेरिकन लष्करी तळावर तेहरानचा पहिला हल्ला