Israel Iran War : मित्रानेच केला घात! पाकिस्तानच्या 'या' अधिकाऱ्याने इस्रायलला दिली इराणच्या सर्वोच्च कमांडरच्या ठिकाणांची माहिती (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Israel Iran War News Marathi : मध्य पूर्वेत सध्या इराण आणि इस्रायलमध्ये तीव्र संघर्ष सुरु आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर चिंता निर्माण झाली आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटनांचा खुलासा होत आहे. १३ जून रोजी इस्रायलने इराणवर हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तसेच इराणचे सर्वोच्च कमांडर मोहम्मद हुसेन बकरी यांची देखील हत्या करण्यात आली होती. दरम्यान या हत्येप्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांचे नाव सध्या या प्रकरणी चर्चेत येत आहे. असीम मुनीर यांनीच इस्रायलला मोहम्मद हुसेन यांच्या लपण्याच्या ठिकाणाची माहिती दिली असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. इराण आणि इस्रायलमध्ये पाकिस्तान दुहेरी खेळी खेळत असल्याचा दावा इराणच्या माध्यमांनी केला आहे. इराणच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इराण आणि पश्चिमेकडील संबंध चांगले ठेवण्यासाठी पाकिस्तानने डाव खेळला असल्याचे म्हटले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, असीम मुनीर यांनी मे महिन्याच्या अखेरीस मोहम्मद हुसेन यांच्या भेटीस गेले होते. यावेळी त्यांनी एक स्मार्टवॉच देखील हुसेन यांनी भेट म्हणून दिले होते. दरम्यान इराणी माध्यमांनी दावा केला आहे की, या स्मार्टवॉटमध्ये GPS ट्रॅकर बसवण्यात आला होता. यामुळे इस्रायली सैन्याला मोहम्मद हुसेन यांच्या ठिकाणाची माहिती मिळाली. यामुळे इस्रायल त्यांच्यावर अचूक हल्ला करण्यात यशस्वी झाले. १३ रोजी झालेल्या इस्रायलच्या हल्ल्यात मोहम्मद हुसेन आणि दोन डेप्युटी अधिकारी मारले देले. इराणी माध्यमांनी सूत्रांचा हवाला देत म्हटले आहे की, मोहम्मद हुसेन यांच्या भेटीनंतर असीम मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना भेट दिली होती.
“According to Iranian media reports, Pakistan’s Army Chief Asim Munir met with Iran’s top military commander, Mohammad Hossein Baqeri, at the end of May. Baqeri was killed in an Israeli strike on June 13. It is being speculated that following Baqeri’s death, Asim Munir also held… pic.twitter.com/k10dYoBjmh
— نقطةNUQTA (@NUQTA31) June 20, 2025
सध्या मध्य पूर्वेत गेल्या १० दिवसांपासून तीव्र संघर्ष सुरु आहे. यामद्ये आतापर्यंत शेकडो इराणी नागरिकांना आपला जीव गमवला आहे, तर ३,५०० हून अधिक जखमी झाले आहे. २२ जून रोजी अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात देखील इराणचे नुकसान झाले आहे. इराणच्या नतान्झ, फोर्डो, आणि इस्फाहन या तळांवर हल्ला केला होता. ही अणुतळे पूर्ण नष्ट झाले आहे. सध्या यामुळे इराणमध्ये संतापाचे वातावरण आहे.