Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्बियामध्ये वाहू लागले क्रांतीचे वारे; विद्यार्थ्यांच्या बंडाने ‘राष्ट्राध्यक्ष वुचिक’ यांची सत्ता डळमळीत

Serbia student uprising : जगाचे लक्ष इस्रायल-इराण संघर्षाकडे वळले असतानाच एका शांतताप्रिय युरोपीय देशात जनआंदोलनाची ठिणगी पेटली आहे. वाचा याबाबत सविस्तर.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 30, 2025 | 03:02 PM
Winds of revolution in Serbia Student uprising shakes President Vucic's power

Winds of revolution in Serbia Student uprising shakes President Vucic's power

Follow Us
Close
Follow Us:

Serbia student uprising : जगाचे लक्ष इस्रायल-इराण संघर्षाकडे वळले असतानाच एका शांतताप्रिय युरोपीय देशात जनआंदोलनाची ठिणगी पेटली आहे. सर्बियात गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन आता राष्ट्रव्यापी बंडात रूपांतरित झाले असून, राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुचिक यांच्या १२ वर्षांच्या सत्तेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सर्बियाच्या नोव्ही सॅड शहरात १ नोव्हेंबर २०२४ रोजी रेल्वे स्टेशनचे छत कोसळून १६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेने सरकारच्या निष्काळजीपणाची पोलखोल झाली. त्या घटनेपासून सुरू झालेली संतप्त विद्यार्थ्यांची चळवळ आता संपूर्ण देशभर पसरली आहे. राजधानी बेलग्रेडच्या रस्त्यांवर हजारो विद्यार्थी उतरले असून, ‘स्वातंत्र्याची लढाई’ अशी घोषणा देत सरकारविरोधात तीव्र आवाज उठवला जात आहे.

विरोधात संतापाची लाट, रस्ते रणांगणात रूपांतरित

विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनाचे स्वरूप दिवसेंदिवस आक्रमक होत आहे. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर आणि अटकसत्र सुरू केल्याने बेलग्रेडचे रस्ते युद्धभूमीचे स्वरूप धारण करत आहेत. अनेक ठिकाणी पोलिस आणि आंदोलकांमध्ये थेट हिंसक चकमकी झाल्या आहेत. सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्धचा राग आणि लोकशाहीविरोधी धोरणांविरोधातील आक्रोश हे या आंदोलनामागील प्रमुख कारणे मानले जात आहेत. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, “हा लढा केवळ रेल्वे अपघातापुरता मर्यादित नाही, तर आमच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी आहे.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : हिमाचलमध्ये 72 तासांची गुप्त बैठक; चीनची अस्वस्थता वाढली, भारताचे धोरण ठाम

राष्ट्राध्यक्ष वुचिक यांची सत्ता संकटात

या आंदोलनामुळे सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुचिक, जे रशियन अध्यक्ष पुतिन यांचे जवळचे मित्र मानले जातात, त्यांच्या सत्तेवरही मोठा धक्का बसला आहे. वुचिक यांचे १२ वर्षांचे सत्ताकालातील अर्धहुकूमशाही धोरण आणि प्रशासनातील भ्रष्टाचार यांच्याविरोधात जनतेचा उद्रेक झाला आहे. या प्रचंड दबावामुळे सर्बियाचे पंतप्रधान मिलोस वुचिक यांनी नुकताच राजीनामा दिला आहे, परंतु राष्ट्राध्यक्ष वुचिक अजूनही सत्तेवर आहेत. आंदोलकांचा रोष मात्र ओसरलेला नाही. ‘वुचिक हटवा’च्या घोषणा आणि ‘नवीन सर्बिया’च्या मागण्या रस्त्यावर प्रतिध्वनित होत आहेत.

🚨🇷🇸 Serbia deserves freedom, not Vučić’s grip.
Belgrade erupts! Tens of thousands demand Vučić’s ouster after 12 years of corruption & authoritarian rule. Students lead the charge for snap elections, defying tear gas & arrests. Serbia deserves freedom, not Vučić’s grip.… pic.twitter.com/3LKLAVO7ap

— Terror Alarm (@Terror_Alarm) June 30, 2025

credit : social media

बांगलादेशशी तुलना, आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हायरल

या आंदोलनाची तुलना सध्या अनेक जण बांगलादेशातील अलीकडच्या विद्यार्थ्यांच्या क्रांतीशी करत आहेत. या चळवळीचे व्हिडिओ आणि संदेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, सर्बियातील तरुणाईचा हा उद्रेक आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तान पुन्हा एकदा बनला उपहासाचा विषय; ‘हिरो’ बनवलेला शेतकरी ठरला खोटा, पाक लष्कराची फजिती

 सर्बियामध्ये परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल

५,२५० किमी दूर असलेल्या या युरोपीय देशात सध्या जे घडते आहे ते केवळ सरकारविरोधी आंदोलन नसून एक नवसंघर्षाची सुरुवात आहे. सर्बियन तरुणाई आता भ्रष्टाचार, हुकूमशाही आणि निष्काळजीपणाच्या विरोधात निर्णायक पाऊल उचलत आहे. राष्ट्राध्यक्ष वुचिक यांच्यासाठी ही अंतिम आव्हानासारखी परिस्थिती आहे. जर त्यांनी लवकरच जनतेचा आवाज ऐकला नाही, तर सर्बियामध्ये राजकीय उलथापालथ निश्चित मानली जात आहे. सध्या तरी सर्बियातील ही चळवळ लोकशाहीसाठीचा लढा मानली जात असून, येत्या काही दिवसांत तिच्या यशस्वीतेने संपूर्ण युरोपात एक नवा संदेश दिला जाऊ शकतो.

Web Title: Winds of revolution in serbia student uprising shakes president vucics power

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 03:02 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Iran-Israel War

संबंधित बातम्या

Iran Vs Israel War: युद्धाचा भडका उडणार! इस्त्रायल इराणचा गेम करणार; ‘या’ धमकीने घाबरले खामेनी
1

Iran Vs Israel War: युद्धाचा भडका उडणार! इस्त्रायल इराणचा गेम करणार; ‘या’ धमकीने घाबरले खामेनी

SCO Summit Tianjin Proposal : इराणची ‘नवीन NATO’ रणनीती! चीन-रशियाच्या पाठिंब्याने इस्रायल-अमेरिकेला देणार टक्कर
2

SCO Summit Tianjin Proposal : इराणची ‘नवीन NATO’ रणनीती! चीन-रशियाच्या पाठिंब्याने इस्रायल-अमेरिकेला देणार टक्कर

पुन्हा युद्धाची ठिणगी पेटणार? बेंजामिन नेतन्याहूंचा गुप्त डाव उघड, इस्रायल-इराण युद्धावर सर्वात मोठा खुलासा
3

पुन्हा युद्धाची ठिणगी पेटणार? बेंजामिन नेतन्याहूंचा गुप्त डाव उघड, इस्रायल-इराण युद्धावर सर्वात मोठा खुलासा

आता पुन्हा खदखदू लागलं इराण-इस्रायल युद्ध! इस्रायली ब्लूप्रिंट तयार, काय असणार पहिले लक्ष्य?
4

आता पुन्हा खदखदू लागलं इराण-इस्रायल युद्ध! इस्रायली ब्लूप्रिंट तयार, काय असणार पहिले लक्ष्य?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.