हिमाचलमधील गुप्त ७२ तासांची बैठक आणि चीनची अस्वस्थता: दलाई लामांच्या उत्तराधिकारी निवडीवर निर्णायक चर्चा? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Dalai Lama reincarnation controversy : तिबेटी धर्मगुरू १४ वे दलाई लामा तेन्झिन ग्यात्सो यांच्या ६ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर धर्मशाळा येथे एक अत्यंत महत्त्वाची व गुप्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. तीन दिवसांच्या या ७२ तासांच्या बैठकीत जगभरातील १०० हून अधिक बौद्ध धार्मिक नेते सहभागी होत असून, या बैठकीत दलाई लामांच्या संभाव्य उत्तराधिकारी निवडीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. यामुळे चीनमध्ये मोठी अस्वस्थता आणि राजनैतिक हालचाल निर्माण झाली आहे.
प्रसिद्ध वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, ही बैठक २०१९ नंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात बोलावण्यात आली आहे, आणि तिची आखणी अत्यंत गोपनीयतेने करण्यात आली आहे. बौद्ध धर्मगुरूंच्या या उपस्थितीमुळे आणि संभाव्य उत्तराधिकारी निवडीच्या पार्श्वभूमीवर, ही बैठक जागतिक राजकारणातही चर्चेचा विषय बनली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘ग्रोसी’च ठरला इराणवर झालेल्या हल्ल्याचे कारण? डेली इराण मिलिटरीने केला अत्यंत ‘गंभीर’ आरोप
दलाई लामा हे बौद्ध धर्मातील सर्वोच्च गुरू मानले जातात. ब्रिटानिकाच्या माहितीनुसार, लामा हे आध्यात्मिक मार्गदर्शक असून ११ व्या शतकात या पदाची स्थापना झाली. १३ व्या दलाई लामांनी चिनी किंग साम्राज्याविरुद्ध तिबेटचे स्वातंत्र्य मिळवले होते. मात्र १९६० च्या सुमारास चीनने तिबेटवर आक्रमण केले आणि त्यानंतर १४ वे दलाई लामा निर्वासित जीवन जगण्यासाठी भारतातील धर्मशाळेत आले. तिथे त्यांनी तिबेटी निर्वासित सरकार स्थापन केली आणि आजही ते तिबेटी लोकांचे आध्यात्मिक व सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून जगभरात ओळखले जातात.
The geopolitical fight over the Dalai Lama’s successor is coming to a head, writes @KarishmaJourno (via @opinion) https://t.co/Irsz6vVGAv
— Bloomberg (@business) June 29, 2025
credit : social media
दलाई लामांच्या उत्तराधिकारी निवडीची प्रक्रिया बौद्ध परंपरेनुसार अतिशय बारकाईने केली जाते. तिबेटमध्ये जन्मलेल्या एखाद्या बालकात विद्यमान लामांचे आत्मिक लक्षण दिसले पाहिजे, अशी परंपरा आहे. मात्र यावेळी चर्चा आहे की नवीन दलाई लामा तिबेटमध्ये न जन्मता भारत किंवा इतर देशात जन्मलेला असू शकतो. हे घडल्यास पारंपरिक ३८५ वर्षांची परंपरा खंडित होऊ शकते, आणि याच मुद्द्यावरून चीनला तीव्र आक्षेप आहे. चीनने आधीच स्पष्ट केलं आहे की ते स्वतःच्या पद्धतीने नवा दलाई लामा नेमू इच्छितात. बीजिंगने मार्च २०२६ मध्ये एका निवेदनात म्हटलं होतं की, “तिबेटी लोक जर चीनचा भाग मानत असतील तरच दलाई लामा निवडीवर चर्चा होऊ शकते.”
ही बैठक भारताच्या धर्मशाळा येथे होत असल्याने चीन विशेषतः अस्वस्थ आहे. भारताने तिबेटप्रश्नी मोकळं समर्थन दिलं नसल्याचं जरी वारंवार सांगितलं असलं, तरी दलाई लामा आणि तिबेटी निर्वासितांना आश्रय दिला हेच बीजिंगसाठी सततचा अस्वस्थतेचा मुद्दा ठरत आला आहे. दलाई लामांच्या वाढदिवशी नव्या उत्तराधिकारीविषयी कोणतीही घोषणा झाली, तर त्याचा जागतिक आणि राजनैतिक परिणाम मोठा असेल. त्यामुळे चीन या हालचालींवर बारकाईने नजर ठेवून आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : संयुक्त राष्ट्रात भारताची आक्रमक तयारी; पाकिस्तानचा डाव उधळण्याची रणनीती तयार
धर्मशाळेतील ही तीन दिवसांची बैठक केवळ धार्मिक नव्हे, तर राजकीयदृष्ट्याही निर्णायक ठरणार आहे. दलाई लामांच्या उत्तराधिकारी निवडीची प्रक्रिया ही तिबेटच्या भविष्यासाठी तसेच भारत-चीन संबंधांसाठीही निर्णायक ठरू शकते. या बैठकीतील निर्णय तिबेटी जनतेच्या आत्म्याशी संबंधित असला, तरी जगातील दोन महासत्तांमधील तणावात नवे वळण आणू शकतो आणि म्हणूनच चीन ही बैठक अत्यंत अस्वस्थतेने पाहत आहे.