पाकिस्तान पुन्हा एकदा बनला उपहासाचा ; 'हिरो' बनवलेला शेतकरी ठरला खोटा, पाक लष्कराची फजिती ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Pakistani farmer drone shootdown : पाकिस्तानला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर लाजिरवाण्या स्थितीचा सामना करावा लागला आहे. भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या अलीकडच्या संघर्षात, भारतीय ड्रोन पाडल्याचा दावा करत एका पाकिस्तानी शेतकऱ्याला ‘हिरो’ म्हणून गौरवण्यात आले होते. मात्र, सत्य समोर आल्यावर हा सगळा तमाशा पाकिस्तानच्या प्रतिमेसाठी निंदाजनक ठरला आहे. शेतकऱ्याने पाडलेला ड्रोन भारतीय नव्हे तर पाकिस्तानचाच असल्याचे तपासात उघड झाले आहे.
हा प्रकार पाकिस्तानमधील सियालकोट येथे घडला. मे महिन्यात भारत-पाकिस्तान सीमारेषेवर ७ ते १० मे दरम्यान चार दिवसांचा लष्करी संघर्ष घडून आला होता. यामध्ये दोन्ही देशांनी ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला होता. या काळात सुफियान नावाच्या शेतकऱ्याने एक ड्रोन पाहिले आणि ते भारतीय असल्याचे समजून, त्याने आपल्या रायफलने त्यावर गोळी झाडून ड्रोन खाली पाडले. nस्थानिक लोकांनी याला ‘भारताचा ड्रोन’ समजून जल्लोष केला. पाकिस्तानी सैन्य आणि स्थानिक प्रशासनाने सुफियानला देशभक्त, पराक्रमी नागरिक म्हणून सन्मानित केले. पाकिस्तानी माध्यमांनीही मोठ्या उत्साहात याची बातमी पसरवली आणि भारताची खिल्ली उडवली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘ग्रोसी’च ठरला इराणवर झालेल्या हल्ल्याचे कारण? डेली इराण मिलिटरीने केला अत्यंत ‘गंभीर’ आरोप
मात्र, काही दिवसांनंतर या घटनेची चौकशी करण्यात आली. तपासाअंती पाकिस्तानचाच ‘यिहा-III’ ड्रोन पाडण्यात आल्याचे स्पष्ट झाले. हा ड्रोन तुर्की आणि पाकिस्तानने संयुक्तपणे विकसित केला आहे. सिरीयल नंबर 24-043 असलेला हा ड्रोन भारताचा नव्हे, तर पाकिस्तानचा असल्याचे IDRW (Indian Defence Research Wing) च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
🇵🇰Pakistan-level comedy😂
A local farmer SHOT DOWN a drone with his rifle — Pakistan Army honoured him like a WAR HERO
Turns out, the drone was a Yiha-III (24-043) — their own military asset🤣
— You can WIN awards for friendly fire, only in Bhikaristan.#PakistanArmy #Pakistan pic.twitter.com/qRjXGI6mMI
— TIger NS (@TIgerNS3) June 30, 2025
credit : social media
सुफियानच्या ‘शौर्यगाथे’चे सगळे कौतुक एका क्षणात हवेत विरले. पाकिस्तानी सैन्याच्या गाफीलपणामुळे आपलाच ड्रोन भारतीय समजून पाडला गेला आणि त्याचा सन्मान केला गेला. ही गोष्ट समोर येताच, पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर थट्टा झाली. पाक माध्यमांनी देखील कोणतीही खात्री न करता बातमी पसरवली, यामुळे पत्रकारितेच्या विश्वसनीयतेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
या घटनेने पाकिस्तानी ड्रोन तंत्रज्ञानाची मर्यादा देखील उघड केली आहे. यिहा-III ड्रोन हे तुर्कीच्या अँटी-टँक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानावर आधारित असूनही, अनेक वेळा आपोआप कोसळल्याचे अहवालांमध्ये नमूद आहे. अनेक ड्रोन भारतीय सीमारेषा ओलांडून परत येण्यात अपयशी ठरले आणि काही आपोआप क्रॅश झाले.
या संपूर्ण घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर, भारताचे ऑपरेशन ‘सिंदूर’ अधिक प्रभावी आणि यशस्वी ठरले आहे. भारताने अनेक पाकिस्तानी ड्रोन पाडले, त्यांच्यावर लक्ष ठेवले आणि सीमारेषेवरील तणावाला शिस्तबद्ध प्रतिसाद दिला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : संयुक्त राष्ट्रात भारताची आक्रमक तयारी; पाकिस्तानचा डाव उधळण्याची रणनीती तयार
पाकिस्तानला पुन्हा एकदा जागतिक व्यासपीठावर लाजीरवाणी स्थितीला सामोरे जावे लागले आहे. स्वतःचाच ड्रोन भारतीय समजून पाडणे आणि त्या शेतकऱ्याला हिरो म्हणून सन्मानित करणे ही केवळ एक गोंधळाची नाही तर प्रशासनिक आणि लष्करी ढिसाळपणाची उदाहरणे आहेत. यामुळे पाकिस्तानची प्रतिमा आणि त्याच्या सैन्याच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.