Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Bank : भारत ‘दक्षिण आशिया’चा केंद्रबिंदू! पाकिस्तानला जागतिक बँकेच्या यादीतून काढले बाहेर; पाकिस्तानी संतप्त

World Bank Pakistan MENAAP: जागतिक बँकेमुळे गरीब पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. वारंवार कर्जाची याचना करणाऱ्या पाकिस्तानला जागतिक बँकेने दक्षिण आशियाई प्रदेशातून वगळले आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये आंदोलने पेटली आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 10, 2026 | 01:47 PM
World Bank Pakistan South Asia removal World Bank MENAAP region Pakistan

World Bank Pakistan South Asia removal World Bank MENAAP region Pakistan

Follow Us
Follow Us:
  • दक्षिण आशिया गटातून पाकिस्तान बाहेर
  • पाकिस्तानी राजकीय व प्रसारमाध्यमांमध्ये संताप
  • आर्थिक तुलनेत मोठा फटका

जागतिक पातळीवर आधीच गंभीर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला जागतिक बँकेकडून (World Bank) आणखी एक मोठा आंतरराष्ट्रीय धक्का बसला आहे. जागतिक बँकेने आपल्या प्रादेशिक वर्गीकरणात (Regional Classification) मोठा बदल करत पाकिस्तानला ‘दक्षिण आशिया’ (South Asia) यादीतून पूर्णपणे वगळले आहे. या नव्या पुनर्रचनेनुसार दक्षिण आशियाई देशांच्या यादीत आता भारत, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि मालदीव यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानला अफगाणिस्तानसोबत मध्य पूर्व, उत्तर आफ्रिका आणि पाकिस्तान (MENAAP) या नव्या गटात वर्ग करण्यात आले आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या राजकीय आणि आर्थिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

पाकिस्तान ‘दक्षिण आशिया’ यादीतून बाहेर, भारताचा बोलबाला

हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर पाकिस्तानमधील आघाडीचे पत्रकार शहबाज राणा यांनी ‘एक्सप्रेस टीव्ही’वरील आपल्या विशेष विश्लेषणात्मक कार्यक्रमात यामागील पडद्यामागची कहाणी मांडली. त्यांच्या मते, जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा (Ajay Banga) हे भारतीय वंशाचे असून, जागतिक बँकेचे दक्षिण आशिया क्षेत्राचे मुख्य कार्यालय नवी दिल्लीत स्थापन करण्याची त्यांची योजना होती. भारत आणि पाकिस्तानमधील बिघडलेले राजनैतिक संबंध आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर, जर हे कार्यालय भारतात झाले असते तर पाकिस्तानी अधिकाऱ्यांना सातत्याने नवी दिल्लीचा दौरा करावा लागला असता, ज्यामुळे गंभीर व्हिसा आणि सुरक्षेचे प्रश्न निर्माण झाले असते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Starlink India: ‘प्रिय पंतप्रधान अंबानी…’; इलॉन मस्क यांनी Mukesh Ambaniना पुन्हा डिवचले; केंद्र सरकारनेही दिले चोख प्रत्युत्तर

पाकिस्तानी प्रशासनाची मोठी चूक आणि अंतर्गत असंतोष

या संभाव्य अडचणी आणि राजनैतिक पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी पाकिस्तान सरकारने जागतिक बँकेच्या या पुनर्रचनेला मुकाट्याने सहमती दर्शवली. परंतु, पाकिस्तानने घेतलेला हा निर्णय त्यांच्याच अंगाशी आला असून तिथे आता तीव्र आंदोलने आणि टीका सुरू झाली आहे. पाकिस्तानी तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानने या निर्णयाला मंजुरी देणे ही एक भयंकर रणनीतिक चूक होती. भारत-पाकिस्तान तणावामुळे भारतासोबत एकाच प्रादेशिक मंचावर राहणे टाळण्याच्या नादात पाकिस्तानने दक्षिण आशियातील आपले भौगोलिक आणि धोरणात्मक स्थान गमावले आहे.

ورلڈ بینک نے پاکستان کو جنوبی ایشیا سےنکال کر مشرقِ وسطیٰ، شمالی افریقہ کے خطے میں بھارت کی وجہ سے شامل کیاتھا۔ پاکستان کو مشرق وسطی کے خطے میں شامل ہونے سے کیا فوائدملے؟پاکستان کی معاشی خطے کی تبدیلی حکومتی رضا مندی سے ہوئی https://t.co/VZ7Q1b6N0j — Shahbaz Rana (@81ShahbazRana) October 9, 2026

credit – social media and Twitter

विश्लेषकांच्या मते, प्रादेशिक वर्गीकरण हे केवळ कागदोपत्री नसून जागतिक विकास निधी, निधीचे वाटप आणि धोरणात्मक निर्णयांवर याचा थेट परिणाम होतो. आतापर्यंत पाकिस्तानची तुलना भारत आणि बांगलादेशसारख्या विकसनशील अर्थव्यवस्थांशी केली जात होती, जिथे कृषी आणि सामाजिक विकासाचे मुद्दे समान होते. मात्र, आता पाकिस्तानचा समावेश MENAAP गटात झाल्यामुळे त्याची थेट तुलना सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि कतार यांसारख्या अतिश्रीमंत तेल उत्पादक देशांशी केली जाणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India at UN : ‘भारत पाकिस्तानच्या आण्विक धमकीला भीक नाही घालत…’, जिनिव्हा परिषदेत भारताची ठाम भूमिका

MENAAP गटातील वास्तव: गरिबीचे भयानक चित्र

जागतिक बँकेच्या ताज्या आर्थिक अहवालानुसार, MENAAP प्रदेशात गरिबीचे प्रमाण कोविड-पूर्व पातळीवर पोहोचले असून ते सातत्याने वाढत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण MENAAP प्रदेशातील एकूण अत्यंत गरीब लोकसंख्येपैकी जवळपास निम्मे गरीब लोक एकट्या पाकिस्तानात राहतात. सौदी अरेबिया आणि यूएई सारख्या उच्च उत्पन्न असलेल्या देशांच्या गटात पाकिस्तानला ठेवल्यामुळे जागतिक स्तरावर पाकिस्तानची आर्थिक दयनीय अवस्था अधिक ठळकपणे समोर येत आहे.

जरी पाकिस्तानी सरकारी अधिकाऱ्यांनी असा दावा केला आहे की या बदलामुळे देशाच्या भौगोलिक ओळखीवर किंवा थेट उत्पन्नाच्या स्थितीवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही, तरीही तज्ज्ञांच्या मते हा पाकिस्तानसाठी मोठा राजनैतिक पराभव आहे. दक्षिण आशियातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताचा वाढता प्रभाव आणि जागतिक बँकेतील भारताचे स्थान यामुळे पाकिस्तान प्रादेशिक समीकरणांमधून मागे पडत चालल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Web Title: World bank removes pakistan from south asia region includes in menaap hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • Pakistan News
  • World Bank
  • World news

संबंधित बातम्या

Starlink India: ‘प्रिय पंतप्रधान अंबानी…’; इलॉन मस्क यांनी Mukesh Ambaniना पुन्हा डिवचले; केंद्र सरकारनेही दिले चोख प्रत्युत्तर
1

Starlink India: ‘प्रिय पंतप्रधान अंबानी…’; इलॉन मस्क यांनी Mukesh Ambaniना पुन्हा डिवचले; केंद्र सरकारनेही दिले चोख प्रत्युत्तर

India at UN : ‘भारत पाकिस्तानच्या आण्विक धमकीला भीक नाही घालत…’, जिनिव्हा परिषदेत भारताची ठाम भूमिका
2

India at UN : ‘भारत पाकिस्तानच्या आण्विक धमकीला भीक नाही घालत…’, जिनिव्हा परिषदेत भारताची ठाम भूमिका

Przewalski Horse : कझाकस्तानमध्ये 200 वर्षांनंतर गवताळ प्रदेशात जन्मला दुर्मिळ घोडा; जागतिक पर्यावरण जगतात आनंद
3

Przewalski Horse : कझाकस्तानमध्ये 200 वर्षांनंतर गवताळ प्रदेशात जन्मला दुर्मिळ घोडा; जागतिक पर्यावरण जगतात आनंद

S. Jaishankar : UNSC सुधारणांवर डॉ. जयशंकर यांचा हल्लाबोल; आफ्रिकेच्या भूमीवरून महासत्तांना दिला गंभीर इशारा
4

S. Jaishankar : UNSC सुधारणांवर डॉ. जयशंकर यांचा हल्लाबोल; आफ्रिकेच्या भूमीवरून महासत्तांना दिला गंभीर इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.