लिमा: पेरूमध्ये सध्या आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य वार्षिक शिखर परिषदत पार पडली आहे. या परिषदेमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि चीनचे राष्ट्रध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाली. या भेटीदरम्यान, जिनपिंग यांनी अध्यक्ष जो बायडेन यांना ट्रम्प प्रशासनासोबत काम करण्याच्या बाबतीत प्रश्न विचारला. यावेळी बायडेन यांनी सकारात्मक उत्तर दिले. बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काम करण्याची तयारी दर्शवली.
दोन्ही देशांचे संबंध दृढ करण्यावर भर
बायडेन यांनी म्हटले की, ते अमेरिकेच्या नवीन प्रशासन म्हणजेच ट्रम्प टीमसोबत काम करण्यास तयार आहेत. चीन-अमेरिका संबंध केवळ दोन्ही देशांच्या संबंधासाठीच महत्त्वाचे नाहीत, तर मानवतेसाठी आणि सकारात्मक भविष्यासाठी महत्त्वाचे असल्याचे म्हटले जात आहे. दोन प्रमुख देशांत चांगले संबंध निर्माण कसे करता येतील यावर या भेटीदरम्यान चर्चा करण्यात आली. जिनपिंग यांनी देखील याकडे सकारात्म दृष्टीने पाहत आपले समर्थन दर्शवले.
जिनपिंग यांनी देखील ट्रम्प प्रशासनासोबत सहकार्य वाढवण्यासाठी तयारी दाखवली
याशिवाय शी जिनपिंग यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या निवडणुकी दरम्यान आयातीबाबत केलेल्या वक्तव्यावर नाराजी दर्शवली. यामुळे दोन्ही देशांच्या संबंधावर परिणाम होऊ शकतो अशी चिंता जिनपिंग यांनी व्यक्त केली. जिनपिंग यांनी म्हटले की, चीन दोन्ही देशाचे सहकार्य वाढवण्यासाठी आणि देशांतील मतभेद दूर करण्यासाठी तयार आहे, तसेच ते अमेरिकेच्या नवीन प्रशासनासोबत काम करण्यास तयार आहे.
यामुळे दोन्ही देशांच्या लोकांना त्याचा फायदा होईल. यावर बायडेन यांनी स्पष्ट केले की, आम्ही एकमेकांशी सलहमत नसतो, मात्र आमचे बोलणे नेहमीचे मूद्देसूद आणि स्पष्ट होते. आम्ही नक्कीच सर्व चुकीच्या गोष्टींना थांबवून आणि हे सुनिश्चित करू दोन्ही देश संघर्षात वाढ होणार नाही.
परिषदेचा उद्देश
लिमा येथे दोन दिवसांची आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन (APEC) फोरमची बैठक शांततेत पार पडली. मात्र आता आणखी चार वर्षे ही वार्षिक शिखर परिषद पुन्हा होणार नाही अशी तज्ञांची भिती आहे. या परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन तसेच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह पॅसिफिकच्या सीमेवरील 21 नेत्यांनी या आठवड्यात पेरूला भेट दिली.तसेच या सर्वांनी अध्यक्ष-निर्वाचित डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला जागतिक मुक्त व्यापार अजेंडाचे नेतृत्व करण्यापासून दूर करण्याचे वचन दिले आहे.