Yemen's Houthi rebels launch ballistic missile attacks on Israel
जेरुसेलम: इस्त्रायलवर येमेनच्या हुथी बंडखोरांना बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, इस्त्रायलतच्या हवाई दलाने ही क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्याचा दावा केला असल्याचे इस्त्रायलच्या सुरक्षा दलाने (IDF) ने म्हटले आहे. या हल्ल्यानंतर इस्त्रायलमध्ये आयर्न डोम डिफेन्स सिस्टम सक्रिय करण्यात आली आहे. देशभरात हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. अमेरिकेने येमेनच्या हुथी बंडखोरांवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला करण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे.
IDF ने दिलेल्या माहितीनुसार, येमेनेच्या बंडखोरांनी केलेल्या क्षेपणास्त्रांच्या या हल्ल्यामुळे शेरोन आणि जेरुसेलम प्रदेशात त्याच्या आसपासच्या भागांमध्ये हवाई हल्ल्याच्या सुटना जारी करण्यात आल्या आहे. इस्त्रायली हवाई हलाने क्षेफमास्त्रे नष्ट केली असली तरी पुन्हा हल्ला होण्याची शक्यता आहे. हुथी बंडखोरांचा हल्ला असल्याचे इस्त्रायलच्या सुरक्षा दलाने म्हटले आहे.
तसेच इस्त्रायलच्या सुरक्षा दलाने IDF ने या नष्ट केलेल्या मिलाइलचे तुकडे सौदी अरेबियाच्या सीमेजवळ कोसळले आहे. गेल्या काही दिवसांपासून हुथी बंडखोर इस्रायलवर सातत्याने हल्ले करत आहे. 20 मार्चपासून आतापर्यंत हा चौथा हल्ला होता. शनिवारी (22 मार्च) देखील येमेनहून तीन क्षेपणास्त्रे डागण्यात आली, मात्र इस्त्रायलच्या हवाई दलाने त्यातील एक हवेतच नष्ट केले, तर उर्वरित दोन ओपन एरियामध्ये पडले.
दुसरीकडे इस्त्रायल हमास मध्ये सुद्ध सुरु असून पुन्हा एकदा गाझामद्ये संघर्ष सुरु झाला आहे. इस्त्रायलचे गाझावर हल्ले सुरुच असून गाझापट्टीत ग्राउंड ऑपरेशनही सुरु केले आहे. या दरम्यान हुथी बंडकोरांनी लाल समुद्राच्या मार्गांवरुन जाणाऱ्या जहाजांवर हल्ल्याची धमकी दिली होती. यानंतर हुथींनी इस्त्रायलवर हल्ले सुरु केले.
काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी येमेनच्या हुथी बंडखोरांविरोधी हवाई हल्ल्याचे आदेश दिले होते. यानंतर हुथींच्या ठिकाणांवर जोरदार हवाई हल्वले करण्यात आले. येमेनची राजधानी सना आणि इतर हुथी नियंत्रित क्षेत्रांवर अमेरिकेने हवाई कारवाई केली. यामुळे हुथी आणि इस्त्रायलमधील वाढता संघर्ष अमेरिकेच्या हुथींवरल, इराणवरील कारवाया आणि इस्त्रायलच्या हमासवरील कारवायांमुळे होत असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे मोठ्या विनाश होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.