'....तर गंभीर परिणाम भोगावे लागतील'; येमेनमधील हुथी बंडखोरांवर अमेरिकेचा मोठा हवाई हल्ला (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेने इराण समर्थित हुथी बंडकोरांविरोधात मोठी कारवाई केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या आदेशानुसार अमेरिकन सैन्याने हुथी बंडखोरांविरुद्ध हल्ले सुरु केले आहेत. लाल समुद्रात हुथी बंडखोरांनकडून व्यापारी जहाजांना सतत लक्ष्य केले जात होता. यामुळे अमेरिकेन शनिवारी येमेनच्या हुथी बंडखोरांवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात किमान 24 जण ठार झावे असून 9 जण जखमी झाल्याची माहिती हुथींच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
उत्तर सादा प्रांतात अमेरिकेचे हल्ले सुरुच
हुथी राजकीय ब्युरोने अमेरिकेच्या या हल्ल्यांना ‘युद्ध गुन्हे’ म्हणून संबोधले आहे. सध्या उत्तर सदा प्रांतात अमेरिकेचे हल्ले सुरुच आहेत. हुथींनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमचे येमेनी सशस्त्र दल या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यास तयार आहे. तर दुसरीकडे अमेरिकेने हुथी बंडखोरांना इशारा दिला आहे. अमेरिकेने म्हटले आहे की, “हुथी बंडखोरांनी त्यांचे हल्ले थांबवले नाही तर याचे त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील.” राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हुथी बंडखोरांना समर्थन करणाऱ्या इराणला इशारा दिला आहे की, विद्रोहींना पाठिंबा देणे थांबवावे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले हल्ल्याचे आदेश
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी येमेनची राजधानी साना येथे हवाई हल्ल्याचे आदेश दिले होते. त्यांनी म्हटले होती की, हुथी बंडखोरांनी सागरी मार्गांना लक्ष्य करणे थांबवले नाही, तर हल्ले सुरुच राहतील. कोणतीही दहशतवादी संघटना अमेरिकन व्यापारी आणि नौदल जहाजांना जगातील जलमार्गांवरुन मुक्तपणे जाण्यापासून रोखू शकत नाही.
येमेनचा बहुतांश भाग हुथी बंडखोरांच्या ताब्यात
गेल्या वर्षी येमेनचा बहुतांश भाग ताब्यात घेऊन हुथींच्या सशस्त्र दलांनी मोठ्या चळवळी सुरु केल्या होता. नोव्हेंबर 2023 पासून लाल समुद्रात 100 अधिक व्यापारी जहाजांवर हुथींनी हल्ले केले आहेत. यामुळे जागतिक व्यापर विस्कळीत झाला आहे. अमेरिकन सैन्यालाही मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. गेल्या वर्षी 2024 च्या ऑक्टोंबरमध्ये अमेरिकेने येमेनचे हुथी बंडखोरांवर हल्ला केला होता.
इस्त्रायलचाही हुथींविरोधी लढा
इस्त्रायलनेही अनेकवेळा इराण समर्थित हुथी बंडखोरांविरोधात मोठी कारवाई केली आहे. इस्त्रायलने इस्त्रायली नागरिकांच्या सुरक्षेसाठी हुथी बंडखोरांच्या अनेक तटीय आणि अंतर्देशीय ठिकाणांवर हल्ले केले होते. हुथी बंडखोर हा येमेनमधील शिया अल्पसंख्याकांचा एक सशस्त्र गट आहे, जो 1990 च्या दशकात तत्कालीन राष्ट्राध्यक्षांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी स्थापन झाला होता.