Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan Allegations: मध्यपूर्वेच्या युद्धाचा फायदा घेऊन भारत पाकिस्तानला संपवणार? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा गंभीर आरोप

Middle East Conflict : मध्य पूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी इस्रायल आणि भारतावर पाकिस्तानविरुद्ध कट रचल्याचा आरोप केला आहे. जाणून घ्या नेमक प्रकरण काय?

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 04, 2026 | 02:41 PM
pakistan defense minister khawaja asif allegation india israel conspiracy

pakistan defense minister khawaja asif allegation india israel conspiracy

Follow Us
Follow Us:
  • धक्कादायक आरोप
  • चतुर्भूज वेढा
  • अण्वस्त्रांचा इशारा

Khawaja Asif allegations against India and Israel : मध्यपूर्वेतील युद्ध आता केवळ पश्चिम आशियापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर त्याचे पडसाद आता दक्षिण आशियातील राजकारणातही उमटू लागले आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ (Pakistan’s Defense Minister Khawaja Asif)  यांनी भारत आणि इस्रायलवर अत्यंत गंभीर आणि चिथावणीखोर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, इस्रायल आणि भारत मिळून पाकिस्तानला सर्व बाजूंनी घेरण्यासाठी आणि अस्थिर करण्यासाठी एक छुपं युद्ध (Proxy War) लढत आहेत. इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने हा ‘व्हिक्टिम कार्ड’ पत्ता खेळल्याने राजनैतिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

इस्रायल-भारत युती आणि पाकिस्तानची भीती

मंगळवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून ख्वाजा आसिफ यांनी एक लांबलचक विधान प्रसिद्ध केले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “इस्रायलला पाकिस्तानला आपली ‘कठपुतळी’ बनवायचे आहे आणि या कामात भारताचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे.” आसिफ यांच्या मते, जर इस्रायल या युद्धात यशस्वी झाला, तर त्याचा पुढचा टप्पा पाकिस्तान असेल. भारत आणि इस्रायलची वाढती जवळीक ही पाकिस्तानच्या अस्तित्वासाठी सर्वात मोठा धोका असल्याचे त्यांनी नमूद केले. या विधानामुळे पाकिस्तानमधील कट्टरतावादी गटांमध्ये भारताविरुद्ध पुन्हा एकदा संतापाची लाट निर्माण झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Operation Epic Fury: PM मोदी भारतात पोहोचले अन् इराण झाला उद्ध्वस्त; इस्रायली राजदूताने उघड केलं ‘त्या’ टायमिंगचं रहस्य

शत्रू देशांच्या विळख्याची धास्ती

पाकिस्तानच्या संरक्षणाची चिंता व्यक्त करताना आसिफ यांनी एका नवीन ‘गटाची’ संकल्पना मांडली. त्यांच्या दाव्यानुसार, इस्रायल येत्या काळात भारत, अफगाणिस्तान आणि इराणला एकत्र करून पाकिस्तानविरुद्ध एक नवीन आघाडी उघडू शकतो. पाकिस्तानची इराणशी असलेली ९०० किलोमीटरची सीमा आणि अफगाणिस्तानसोबत सुरू असलेला सीमावाद यामुळे पाकिस्तानला सर्व बाजूंनी शत्रूने वेढले जाण्याची भीती सतावत आहे. विशेषतः मे २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या ४ दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर पाकिस्तानची ही भीती अधिक गडद झाली आहे.

झिओनिझम आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर टीका

ख्वाजा आसिफ यांनी १९४८ पासून मुस्लिम देशांमध्ये झालेल्या प्रत्येक संघर्षासाठी ‘झिओनिझम’ला (Zionism) जबाबदार धरले आहे. “जगातील बड्या शक्ती आणि जागतिक अर्थव्यवस्था या विशिष्ट विचारसरणीच्या प्रभावाखाली काम करत आहेत,” असा दावा त्यांनी केला. इराण वाटाघाटीसाठी तयार असतानाही त्यांच्यावर युद्ध लादले गेले, असे सांगून त्यांनी मुस्लिम देशांना एकत्र येण्याचे आवाहन केले. या विधानाला सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांचा किती पाठिंबा मिळेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel-Iran War: डोळे उघडे ठेवा, मृत्यू जवळ आहे! दातात बसवली चिप अन् झाला घात; खामेनींच्या हत्येमागील ‘सायबर स्ट्राईक’चा खुलासा

अण्वस्त्रांचे संरक्षण आणि अंतर्गत आव्हाने

पाकिस्तान सध्या बलुचिस्तानमधील बंडाळी आणि बिघडलेली अर्थव्यवस्था यांसारख्या अंतर्गत संकटांशी झुंजत आहे. अशा परिस्थितीत ख्वाजा आसिफ यांनी देशाच्या २५ कोटी जनतेला ‘कॉमन शत्रू’ ओळखून एकत्र येण्याचे आवाहन केले. “पाकिस्तानची अण्वस्त्र क्षमता आणि लष्करी ताकद हेच आमचे संरक्षण कवच आहे,” असे सांगून त्यांनी १९९८ च्या अणुचाचण्यांची आठवण करून दिली. “फ्री पॅलेस्टाईन”च्या घोषणा देत त्यांनी पाकिस्तानला इस्लामचा रक्षक म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानचे हे आरोप आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःच्या अपयशावरून लक्ष भरकटवण्यासाठी केले गेले असावेत. भारत आणि इस्रायलने या आरोपांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, पण यामुळे दक्षिण आशियातील तणाव मात्र नक्कीच वाढला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी भारतावर कोणता मुख्य आरोप केला आहे?

    Ans: भारताने इस्रायलसोबत हातमिळवणी करून पाकिस्तानला अस्थिर करण्यासाठी आणि सर्व बाजूंनी वेढण्यासाठी कट रचल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

  • Que: ख्वाजा आसिफ यांनी कोणत्या नवीन गटाची भीती व्यक्त केली आहे?

    Ans: भारत, इस्रायल, अफगाणिस्तान आणि इराण हे देश एकत्र येऊन पाकिस्तानच्या सुरक्षेला धोका निर्माण करू शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

  • Que: पाकिस्तानने या परिस्थितीत आपल्या सुरक्षेचा आधार काय सांगितला?

    Ans: पाकिस्तानची अण्वस्त्र क्षमता आणि लष्करी सामर्थ्य कोणत्याही बाह्य आक्रमणापासून देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेसे आहे, असे आसिफ यांनी म्हटले आहे.

Web Title: Pakistan defense minister khawaja asif allegation india israel conspiracy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • India-Pakistan Conflict
  • Israel
  • World War 3

संबंधित बातम्या

Russia Ukraine War: पुतिन यांनी चर्चेचा प्रस्ताव फेटाळताच युक्रेनचा थरकाप उडवणारा प्रहार; अझोव समुद्रात रशियाची 5 जहाजे उडवली
1

Russia Ukraine War: पुतिन यांनी चर्चेचा प्रस्ताव फेटाळताच युक्रेनचा थरकाप उडवणारा प्रहार; अझोव समुद्रात रशियाची 5 जहाजे उडवली

Joseph Aoun : ‘हा तुमचा देश नाही, आमचा आहे,’ क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर लेबनॉनचा संयम सुटला; इराणवर गंभीर आरोप
2

Joseph Aoun : ‘हा तुमचा देश नाही, आमचा आहे,’ क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर लेबनॉनचा संयम सुटला; इराणवर गंभीर आरोप

War Alert : आखातात संघर्ष ठळक! इराणने कुवेत आणि बहरीनवर डागली क्षेपणास्त्रे; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर तेहरानचेही प्रत्युत्तर
3

War Alert : आखातात संघर्ष ठळक! इराणने कुवेत आणि बहरीनवर डागली क्षेपणास्त्रे; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर तेहरानचेही प्रत्युत्तर

PoKIsIndia: ‘हा भाग आमचा आहे’, गिलगिट-बाल्टिस्तानमधील पाकिस्तानच्या निवडणुक खेळीमुळे भारत संतप्त; परराष्ट्र मंत्रालयाचा कडक इशारा
4

PoKIsIndia: ‘हा भाग आमचा आहे’, गिलगिट-बाल्टिस्तानमधील पाकिस्तानच्या निवडणुक खेळीमुळे भारत संतप्त; परराष्ट्र मंत्रालयाचा कडक इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.