अमेरिकेची येमेनच्या हुथी बंडखोरांवर कारवाई सुरुच; सानावरील हल्ल्यात 9 जण जखमी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेने इराण समर्थित हुथी बंडकोरांविरोधात मोठी कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या आदेशानुसार सैन्याने हुथी बंडखोरांविरुद्ध हल्ले सुरु केले होते. दरम्यान अमेरिकेने पुन्हा एकदा येमेनच्या हुथी बंडखोरांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे.
अमेरिकेने येमेनची राजधानी साना येथे हवाऊ हल्ले केले असून या मध्ये 9 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींमध्ये सात महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्यनुसार, साना येथील गेराफ भागातील सुरु असलेल्या बांधकाम इरमारतीला लक्ष्य करण्यात आले आहे. या हल्ल्यांमुळे जवळपासच्या घरांचे नुकसान झाले आहे.
हुथी नियंत्रित क्षेत्रांवर अमेरिकेचे हल्ले
हुथींच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, अमेरिकेचा हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी देखील सानामध्ये अमेरिकेने हल्ला केला होता. या हल्ल्यांत 53 जणांचा मृत्यू झाला होता आणि 98 जण जखमी झाले होते.यात महिला आणि मुलांचाही समावेश होता. बुधवारी (19 मार्च) अमेरिकेने केवळ साना शहरावरच नाही तर सादा, अल-बायदा, होदेदाह आणि अल-जॉफ प्रांततील हुथी नियंत्रित भागांवरही बॉम्बहल्ले केले होते.
हुथींचा दावा
उत्तर येमेनमधील हुथींनी दावा केला आहे की, त्यांनी लाल समुद्रात अमेरिकेच्या युद्धनौका, USA हॅरी ट्रुममवर क्रूझ क्षेफणास्त्रे डागली आहेत. त्यांनी 72 तासांत चार वेळा हल्ले केले आहेत. एका निवेदनानुसार, हुथी लष्कराचे प्रवक्ते याह्या सरिया यांनी लाल समुद्रातील कारवाई ही अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर आहे, आणि आम्ही यामध्ये यशस्वी झालो आहोत.
हुथींच्या गटाने असाही दावा केला आहे की, त्यांनी फक्त इस्त्रायलच्या जहाजांना यापूर्वी लक्ष्य केले होते. त्यांचा उद्देश इस्त्रायलचे गाझावरील हल्ले थांबवण्याचा होता आणि हमासला मदत करण्याचा होता. मात्र अमेरिकेने हल्ला केल्याने आम्ही त्यांच्या जहाजांनाही लक्ष्ये केले.
अमेरिकेचे म्हणणे-
अमेरिकेच्या म्हणण्यामनुसार, त्यांचे हल्ले आंतरराष्ट्रीय व्यापार मार्ग सुरक्षित करण्याच्या उद्देशाने आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी हुथी बंडखोरांना इशारा दिला की जर त्यांनी हल्ले थांबवले नाहीत तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. तो म्हणाला, “तुम्ही अशा आपत्तीला तोंड द्याल जी तुम्ही यापूर्वी कधीही पाहिली नसेल.”
डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले हल्ल्याचे आदेश
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी येमेनची राजधानी साना येथे हवाई हल्ल्याचे आदेश दिले होते. त्यांनी म्हटले होती की, हुथी बंडखोरांनी सागरी मार्गांना लक्ष्य करणे थांबवले नाही, तर हल्ले सुरुच राहतील. कोणतीही दहशतवादी संघटना अमेरिकन व्यापारी आणि नौदल जहाजांना जगातील जलमार्गांवरुन मुक्तपणे जाण्यापासून रोखू शकत नाही.