सध्या देशात लोकसभा निवडणुकीची (Loksabh ELection 2024) धामधुम सुरू आहे. 19 एप्रिलपासून देशात सात टप्प्यांत लोकसभा निवडणूक होणार आहेत. निवडणुकीला कागी काही अवधी उरला असताना निवडणूक लढविणारे उमेदवार विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी आश्वासनं दिली जात आहेत. मात्र चंद्रपरूच्या चिमुर येथील एका अपक्ष उमेदवारानं दिलेलं आश्वासन इतर उमेदवारांपेक्षा जर हटके आहे. ज्याची सध्या पंचक्रोशीत चर्चा होत आहे. नेमकं काय म्हण्टलयं या उमेदवाराने तुम्हीही बघा.
[read_also content=”भर उन्हाळ्यात पश्चिम बंगालमध्ये वादळाचा कहर, जलपायगुडीमध्ये चार जणांचा मृत्यू, ७० हून अधिक जखमी! https://www.navarashtra.com/india/4-people-died-and-more-than-70-injured-in-strom-at-west-bengal-nrps-519431.html”]
चंद्रपूरच्या चिमूर गावातील अपक्ष उमेदवार वनिता राऊत (vanita raut ) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यास गरीब लोकांना स्वस्तात व्हिस्की आणि बिअर उपलब्ध करून देईन, असे म्हटलं आहे. गरीब मतदारांना आकर्षित करण्यासाठी वनिता राऊत यांनी एक विचित्र आश्वासन दिलं आहे की, मी प्रत्येक गावात फक्त बीअर बार उघडणार नाही तर खासदार निधीतून मतदारांना स्वस्तात व्हिस्की आणि बिअरही देणार आहे.
त्या म्हणाल्या, ‘जिथे गाव आहे, तिथे बिअर बार’. हे माझे मुद्दे आहेत. रेशनिंग प्रणालीद्वारे दारू आयात करण्याच्या आश्वासनावर त्या म्हणाल्या की, यासाठी दारू पिणारे आणि दारू विक्रेते दोघांकडे परवाना असणं आवश्यक आहे.
त्या म्हणाले की, जे लोक खूप गरीब आहेत आणि काबाडकष्ट करतात त्यांना दारू पिऊनच आराम मिळतो. पण त्यांना दर्जेदार व्हिस्की किंवा बिअर परवडत नाही. ते फक्त देशी दारू पितात आणि त्यांच्या सेवनावर कोणतीही मर्यादा नाही, त्यामुळे ते बेशुद्ध होतात. त्यांनी आयात केलेल्या दारूचा आस्वाद घ्यावा अशी माझी इच्छा आहे.
अतिमद्यपानामुळे कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याच्या प्रश्नावर वनिता म्हणाली की, या कारणासाठी लोकांना दारू पिण्याचा परवाना द्यावा, अशी तिची इच्छा आहे. वयाच्या १८ वर्षानंतरच लोकांना दारू पिण्याचा परवाना देण्यात यावा. वनिता निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.






