Women Health: मासिक पाळी आल्यानंतर योनीमार्गाचा pH बदलण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे पॅडवर किंवा मेंस्ट्रुअल अंडरवेअरमध्ये साचून राहिलेले रक्त हवेच्या संपर्कात आल्यावर वास विकसित होतो. याशिवाय बॅक्टेरियल व्हॅजिनायसिससारखे इन्फेक्शन वाढल्यामुळे सुद्धा मासिक पाळीच्या रक्ताला घाण वास येण्याची शक्यता असते.
गोंदियात प्रसूतीनंतर आधी नवजात बाळाचा आणि उपचारादरम्यान आईचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. महिलेचे हिमोग्लोबिन केवळ 5 ग्रॅम असल्याचे रुग्णालयाने सांगितले, तर नातेवाईकांनी उपचारातील कथित त्रुटींची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील करंबा परिसरात करपलेल्या आणि नुकसान झालेल्या पिकांची अधिकाऱ्यांनी रात्री पाहणी केली. मुख्यमंत्र्यांच्या संभाव्य पाहणीपूर्वी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. पिकांच्या नुकसानीनंतर आता शासनाकडून दुष्काळी मदत किंवा आर्थिक सहाय्याची घोषणा कधी होते,...
Ganesh Festival : सोलापूरातील कुंभारी येथे मानाचा राजा गणपती मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. अश्विनी हॉस्पिटलच्या सहकार्याने झालेल्या या उपक्रमात १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
IIT Bombay Student Suicide : IIT Bombay विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यू प्रकरणात त्याचे वडील रविंद्र वाकोडे यांनी पत्रकार परिषद घेतली. प्रा. सूर्यनारायण दुल्ला आणि संचालक शिरीष केदारे यांना अटक करण्याची मागणी करत त्यांनी जातीय छळ आणि मानसिक त्रासाचे आरोप केले.
महिंद्रा थार OG च्या नव्या अवतारात 160 hp पेट्रोल इंजिन, 2.2-लिटर डिझेल, 4WD आणि ऑफ-रोड मोड्स मिळतात. विशेष म्हणजे टॉप ZXT व्हेरिएंटमध्ये 6 एअरबॅग्स, 19-इंच अलॉय आणि अनेक प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत.
Sugar Price: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जागतिक बाजारपेठेतील सध्याच्या साखरेच्या किंमतीबाबत मोठे भाष्य केले आहे. ब्राझीलसारख्या देशातील मोठ्याप्रमाणात होणाऱ्या साखर उत्पादनाचा फटका भारतासारख्या देशांना बसत असल्याचे ते म्हणाले.
Boxing: स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या सर्व पदक विजेत्या खेळाडूंना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदके आणि प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच आगामी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.
Satara News : पुणे-बेंगळुरू महामार्गावरील लिंब गावच्या हद्दीतील उड्डाण पुलाचा चढ-उताराचा रस्ता अपघाताला निमंत्रण देत आहे. खराब सेवा रस्ता, बंद पथदिवे आणि सुरक्षेच्या अपुऱ्या उपाययोजनांमुळे वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे. नुकत्याच झालेल्या अपघातात प्रशांत बाबासो फरांदे यांचा मृत्यू झाला होता .
KDMC News : कल्याण पूर्वेतील शक्तीधाम रुग्णालयात प्रसूतीदरम्यान नवजात बाळाच्या मृत्यूनंतर KDMC प्रशासनाने कारवाई केली आहे. RMO डॉक्टरला कामावरून हटवण्यात आलं असून संबंधित कंत्राटदार कंपनीवरही आर्थिक दंडाची कारवाई करण्यात आली आहे.
Goa News : ‘गोय राखण यात्रा’च्या पार्श्वभूमीवर ‘खोका रन’ नावाचा उपरोधिक ऑनलाइन गेम चर्चेत आला आहे. गेममध्ये गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या व्यंगचित्रात्मक प्रतिमेचा वापर करण्यत आला असून राजकीय तिकीट वाटप आणि पैशांच्या राजकारणाशी संबंधित आरोपांवर उपरोध करण्यात आला आहे.
carrom tournament : गणाधीश शालेय एकेरी कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळेने अंतिम सामना जिंकून जेतेपद पटकावले. तर शारदाश्रम विद्यालयाच्या सोहम जाधवला उपविजेतेपदावर समाधान व्यक्त करावे लागले.
Rohit Pawar: विद्यार्थ्यांमध्ये कोणताही गट पडलेला नाही. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये काही क्लासचालक होते आणि त्यांना फसवून नेण्यात आले, असा आरोप पवार यांनी केला.