थाई बॉक्सिंगमध्ये पिंपरी-चिंचवड चॅम्पियन (फोटो- सोशल मिडिया)
महाराष्ट्र थाई बॉक्सिंग असोसिएशनच्या अधिकृत मान्यतेने, बीना इंग्लिश मीडियम स्कूल व बीना स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पिंपरी-चिंचवड थाई बॉक्सिंग असोसिएशनच्या सहकार्याने रविवारी (दि. २०) आकुर्डी येथील बीना स्पोर्ट्स क्लबच्या सभागृहात ही स्पर्धा उत्साहात पार पडली. पुणे विभागातील सात जिल्ह्यांतील मुला-मुलींनी विविध वयोगट आणि वजनगटांत सहभाग घेतला होता. रिंगमधील अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या लढतींमध्ये खेळाडूंनी कमालीचे तांत्रिक कौशल्य, चपळाई, जिद्द आणि उत्कृष्ट क्रीडाभावनेचे दर्शन घडविले.
Asian Games 2026 मध्ये साक्षी चौधरीचा श्रीगणेशा; ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्याचा 5-0 ने पराभव
स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या सर्व पदक विजेत्या खेळाडूंना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदके आणि प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच आगामी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या. थाई बॉक्सिंगसारख्या क्रीडाप्रकारातून युवकांमध्ये प्रचंड आत्मविश्वास, शिस्त, धैर्य आणि क्रीडावृत्तीची जोपासना होते, अशा स्पर्धा खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरतात, असा सूर पारितोषिक वितरणावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.
Hockey India स्पर्धेत ‘या’ चार संघाची सेमीफायनलमध्ये धडक; पिंपरीत पाहायला मिळतोय हॉकीचा संग्राम
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बीना स्कूलचे संस्थापक-अध्यक्ष अजहर खान, शहाजी आतार, पिंपरी-चिंचवड अल्पसंख्याक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष युसुफ कुरेशी, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा भारतीय थाई बॉक्सिंग महासंघाचे पी. वाय. आतार, बीना स्पोर्ट्स क्लबचे अखमल खान, पी. के. स्कूलचे स्पोर्ट्स प्रमुख राहुल कोरे यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण स्पर्धेचे तांत्रिक कामकाज पुणे विभाग थाई बॉक्सिंगच्या अध्यक्षा प्रियंका मट्टी यांच्या देखरेखीखाली पार पडले. राष्ट्रीय पंच नाझीम शेख, अरबाज शेख, किरण माने, गायकवाड कारभारी आणि स्वप्निल वारुळे यांनी मुख्य पंच म्हणून अचूक जबाबदारी सांभाळली. स्पर्धेच्या यशस्वी नियोजनात गणेश मांढरे व अभिषेक शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, तर रविराज गाढवे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.






