टोयोटा इनोव्हाला भारतात 20 वर्ष पूर्ण
भारतात अनेक ऑटो कंपन्या नवनवीन कार ऑफर करत असतात. मात्र, असे जरी असले तरी काही कार्स अशा देखील आहेत, ज्या वर्षानुवर्षे भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) ने आज आपल्या प्रतिष्ठित MPV Innova च्या भारतातील 20 वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा गौरव साजरा केला. 2005 मध्ये लाँच झालेली इनोव्हा ही केवळ एक कार नाही, तर लाखो भारतीय कुटुंबांची आणि व्यवसायिकांची फमिली मेंबर बनली आहे. इनोव्हा, इनोव्हा क्रिस्टा आणि इनोव्हा हायक्रॉस या तीन व्हर्जनमध्ये मिळून 12 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाल्याने टोयोटासाठी हा अभिमानाचा क्षण ठरतो.
भारतात येऊ शकतो Hyundai चा खास लक्झरी ब्रँड, कोणत्या कारची होऊ शकते एंट्री?
या प्रवासाबद्दल बोलताना टोयोटा किर्लोस्कर मोटरचे सेल्स, सर्व्हिस आणि यूज्ड कार व्यवसायाचे उपाध्यक्ष वरिंदर वाधवा म्हणाले, “गेल्या दोन दशकांत इनोव्हाने भारतीय ग्राहकांशी एक दृढ भावनिक नाते निर्माण केले आहे. आरामदायी प्रवास, विश्वसनीयता आणि टिकाऊपणा यामुळे ती पिढ्यानपिढ्या पसंतीस उतरलेली कार आहे. ती केवळ दैनंदिन प्रवासाची नाही तर संस्मरणीय ट्रिप्सचीही महत्त्वाची भागीदार ठरली आहे.”
2005 मध्ये इनोव्हाची सुरुवात बॉडी-ऑन-फ्रेम रचनेच्या, एैसपैस इंटीरियर्स आणि प्रगत सुरक्षितता फीचर्सच्या माध्यमातून भारतीय ऑटो क्षेत्रात नवीन मानक प्रस्थापित करत झाली. 2016 मध्ये इनोव्हा क्रिस्टाच्या आगमनाने स्टाइलिश डिझाइन, शक्तिशाली इंजिन आणि प्रीमियम वैशिष्ट्यांचा समावेश करत एक नवा टप्पा गाठण्यात आला. त्यानंतर 2022 मध्ये सादर झालेली इनोव्हा हायक्रॉस ही सेल्फ-चार्जिंग हायब्रिड इलेक्ट्रिक तंत्रज्ञानाची क्रांतिकारी झेप ठरली.
हायक्रॉसमध्ये टोयोटाची फिफ्थ जनरेशन हायब्रिड सिस्टम आहे, ज्यात 2.0 लिटर गॅसोलिन इंजिन आणि ई-ड्राईव्ह ट्रान्समिशनचा समावेश आहे. यामुळे 186 पीएसचे कमाल पॉवर आउटपुट मिळते आणि ती विभागातील सर्वोत्तम इंधन कार्यक्षमतेची ऑफर करते. हायक्रॉसमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, ऑटो हाय बीम एलईडी हेडलॅम्प्स, गनमेटल फ्रंट ग्रिल आणि सेगमेंटमधील प्रथम ड्युअल फंक्शन DRLs यांसारखी प्रगत फीचर्स आहेत. नोव्हेंबर 2024 पर्यंत हायक्रॉसने 1 लाख युनिट्स विक्रीचा टप्पा गाठला आहे.
सतत ग्राहकांच्या अभिप्रायावर आधारित सुधारणा, वाढती कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षितता फीचर्स यामुळे इनोव्हा आजही भारतीय घरांमधील पहिली पसंती आहे. टोयोटाची दीर्घकालीन मालकी मूल्य आणि दर्जा कायम राखण्याची बांधिलकी, यामुळे इनोव्हा प्रत्येक टप्प्यावर विश्वासार्ह सोबती ठरली आहे.