फोटो सौजन्य: @SkodaIndia (X.com)
भारतात विविध सेगमेंटमध्ये अनेक कार्स ऑफर होत असतात. यातही एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सना चांगली मागणी मिळताना दिसते, ज्यामुळे अनेक कार उत्पादक कंपन्या चांगल्या परफॉर्मन्स देणाऱ्या एसयूव्ही उत्पादित करण्यावर जास्त लक्षकेंद्रित करत आहे. आता तर इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील मार्केटमध्ये लाँच होताना दिसत आहे.
भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक विदेशी कंपन्या आपल्या कार्स ऑफर करत असतात. यातीलच एक कंपनी म्हणजे स्कोडा. स्कोडाने देशात अनेक उत्तम कार्स ऑफर केल्या आहेत. आता कंपनी एसयूव्ही सेगमेंटमध्ये एक नवीन कार लाँच करत आहे.
Elon Musk ची Tesla भारतात एंट्री मारण्याच्या तयारीत ! टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली कार
आता स्कोडा आपली नवीन एसयूव्ही, Skoda Kodiaq लाँच करण्याची तयारी करत आहे. स्कोडाच्या नवीन एसयूव्हीमध्ये कोणत्या प्रकारचे फीचर्स दिले जाऊ शकतात? यात किती पॉवरफुल इंजिन मिळू शकते? ही एसयूव्ही कोणत्या किमतीत लाँच केली जाऊ शकते? या सर्व प्रश्नाची आपण उत्तरे जाणून घेऊया.
स्कोडा उद्या फुल्ल साइझ एसयूव्ही सेगमेंटमध्ये 2025 स्कोडा कोडियाक एसयूव्ही लाँच करणार आहे. जुन्या व्हर्जनच्या तुलनेत नवीन एसयूव्हीमध्ये अनेक उत्तम फीचर्स दिले जाऊ शकतात.
या नवीन कारच्या सर्व फीचर्सची आणि इंजिनची माहिती लाँच झाल्यानंतरच उपलब्ध होणार आहे. पण त्यात दोन लिटर क्षमतेचे इंजिन दिले जाऊ शकते. जे टर्बोसह आणता येते. या इंजिनसह, एसयूव्ही 201 बीएचपीची पॉवर आणि 320 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळवू शकते. यात 7 स्पीड डीसीटी ट्रान्समिशन दिले जाऊ शकते. यासोबतच, त्यात 4X4 देखील दिले जाऊ शकते.
आता ‘या’ कंपनीची टू व्हीलर खरेदी करण्यासाठी शोरूमला जाण्याची गरज नाही, घरबसल्या मिळेल डिलिव्हरी
Skoda Kodiaq एसयूव्हीमध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात येतील. यात एलईडी लाईट्स, एलईडी डीआरएल, एलईडी टेल लाईट्स, अँबियंट लाईट्स, ब्लॅक इंटीरियर, पॅनोरॅमिक सनरूफ, मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोल, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, की-लेस एंट्री, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, वायरलेस चार्जर, क्रूझ कंट्रोल, मल्टी-फंक्शन स्टीअरिंग व्हील, 360 डिग्री कॅमेरा, ड्रायव्हिंग मोड्स, एबीएस, ईबीडी, नऊ एअरबॅग्ज यांसारखे फीचर्स त्यात दिली जाऊ शकतात.
कोडियाक एसयूव्ही लाँच झाल्यानंतर स्कोडा या कारची किंमत जाहीर करणार आहे. परंतु अशी अपेक्षा आहे की ही एसयूव्ही भारतीय बाजारात अंदाजे 50 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच केली जाऊ शकते. ही एसयूव्ही भारतात दोन व्हेरियंटमध्ये लाँच केली जाऊ शकते ज्यामध्ये Sportline आणि L&K यांचा समावेश असू शकतो.
भारतीय मार्केटमध्ये, स्कोडा फुल साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये त्यांची नवीन एसयूव्ही सादर करणार आहे. या सेगमेंटमध्ये, ही कार Toyota Fortuner, MG Gloster, Volkswagen Tiguan R Line शी थेट स्पर्धा करेल.