
1.5L TSI इंजिनसाठी फक्त DSG गिअरबॉक्स
नवीन स्लाव्हियामधील मोठा बदल म्हणजे 1.0L TSI इंजिनसोबत मिळणारा नवीन 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स. हा ऑप्शन Classic+ पासून मिळतो आणि त्याची किंमत ₹12.49 लाखांपासून सुरू होते. 1.5L TSI इंजिन फक्त Prestige आणि Monte Carlo व्हेरिएंटमध्ये दिले असून त्यासोबत 7-स्पीड DSG गिअरबॉक्स मिळतो. हे इंजिन 150 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करते, तर 1.0L TSI 115 PS पॉवर आणि 178 Nm टॉर्क देते.
स्कोडाच्या कार 1 ऑक्टोबरपासून महागणार! किंमतीत 1.2% पर्यंत वाढ, ₹20,000 पर्यंत फटका
रियर सीटवर मसाज फंक्शन हे खास आकर्षण
Prestige व्हेरिएंटमध्ये केबिनला प्रीमियम टच देण्यात आला आहे. यात इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्ससोबत रियर सीट मसाज फंक्शन देण्यात आले आहे. याशिवाय 10.1-इंच टचस्क्रीन, 10.25-इंच व्हर्च्युअल कॉकपिट, 360-डिग्री कॅमेरा आणि 16-इंच Savio ड्युअल-टोन अलॉय व्हील्स मिळतात. Signatureमध्ये 25.6 सेमी स्क्रीन, Google Cloud आधारित AI Assistant, वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay मिळतात.
एक्स्टिरियरमध्येही मिळाले नवे बदल
फेसलिफ्टेड स्लाव्हियामध्ये नवीन LED हेडलॅम्प्स, अपडेटेड टेललॅम्प्स, सीक्वेन्शियल रियर इंडिकेटर्स आणि बदललेले फ्रंट-रियर सेक्शन देण्यात आले आहे. ग्रिलवर हॉरिझॉन्टल क्रोम स्ट्रिप असून नवीन अलॉय व्हील डिझाइन्सही मिळतात. Arctic Silver आणि Cappuccino Beige हे नवीन कलर ऑप्शन जोडले आहेत. सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्ससह 25 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स स्टँडर्ड आहेत, तर टॉप व्हेरिएंटमध्ये 40 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स मिळतात. स्लाव्हियाचे 5-स्टार Global NCAP सेफ्टी रेटिंग कायम आहे.