
टोयोटाची लोकप्रिय प्रीमियम एमपीव्ही ‘इनोव्हा हायक्रॉस’ लवकरच नव्या रूपामाध्ये बाजारात दाखल होण्यासाठी सज्ज होत आहे. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या स्पाय इमेजवरून असे दिसून येते की, कंपनी २०२२७ च्या सुरुवातीस या कारचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच करू शकते. या नवीन मॉडेलच्या डिझाईनमध्ये आणि केबिनमध्ये मोठे बदल पाहायला मिळणार आहेत.
एक्सटिरियर आणि डिझाईनमधील बदल
कारच्या पुढील भागात मोठे बदल करण्यात आले आहेत. यात एक ठळक मेश-पॅटर्न ग्रिल आणि बॉनेटच्या वरच्या भागात पसरलेली स्लीक एलईडी लायटिंग सिस्टीम दिली जाईल. याशिवाय हेडलाइट्स अधिक संकुचित आणि कोनीय असतील. नवीन बंपरमध्ये angle एअर इंटेक्स आणि फॉग-लॅम्प हाऊसिंग दिले गेले आहेत. मागील बाजूस फारसे मोठे बदल नसले, तरी टेललॅम्प्सचे एलईडी ग्राफिक्स थोडे बदलले असून टेलगेटवर काळ्या रंगाची ट्रिम लाईन दिली जाऊ शकते.
इंटीरियर आणि फीचर्स
गाडीच्या बाह्य भागापेक्षा आतील केबिनमध्ये अधिक प्रभावी अपडेट्स मिळण्याची शक्यता आहे. यात स्लिम बेझल्ससह येणारी मोठी फ्री-स्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जाईल. तसेच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचे ग्राफिक्स अपडेट केले जाण्याची आणि अधिक सुरक्षिततेसाठी अपग्रेडेड लेव्हल-२ ADAS पॅकेज मिळण्याची शक्यता आहे.
इंजिन आणि परफॉर्मन्स
या कारचे मेकॅनिकल पार्ट्स बहुतांश तसेच राहण्याची शक्यता आहे. सध्याच्या इनोव्हा हायक्रॉसमध्ये मिळणारे २.०-लिटर नॅचुरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह आणि २.०-लिटर स्ट्रॉन्ग हायब्रिड इंजिन ई-सीव्हीटी गिअरबॉक्ससह या नवीन मॉडेलमध्येही चालू ठेवले जाऊ शकतात. या सर्व बदलांमुळे कारच्या किंमतीत किंचित वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.