फोटो सौजन्य: @royalenfield (X.com)
भारतात अनेक उत्तम दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत. त्यातीलच एक आघाडीची बाईक उत्पादक कंपनी म्हणजे Royal Enfield. विशेषकरून तरुणांमध्ये रॉयल एन्फिल्डच्या बाईक्सना चांगली मागणी आहे. या दुचाकी उत्पादक कंपनीने देशात अनेक उत्तम बाईक ऑफर केल्या आहेत. Royal Enfield Hunter 350 हे त्यातीलच एक बाईक. जर तुम्ही सुद्धा ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचा पगार 25 हजार असेल तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
जर तुम्ही कॉलेज किंवा ऑफिसला जाण्यासाठी रॉयल एनफील्ड बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हंटर ३५० बाईक तुमच्यासाठी एक बेस्ट पर्याय ठरू शकते. ही कंपनीची सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय बाईक आहे, जी तरुण रायडर्सना खूप आवडते. आज आपण जाणून घेऊयात की फक्त 20000 रुपयांच्या डाउन पेमेंटसह ही बाईक घरी कशी आणता येईल.
रॉयल एनफील्ड हंटर 350 च्या बेस व्हेरिएंटची दिल्लीतील ऑन-रोड किंमत सुमारे 1.73 लाख रुपये आहे. यात 1.50 लाख रुपये एक्स-शोरूम किंमत, 12,000 रुपये आरटीओ शुल्क, 10,000 रुपये विमा आणि 9,000 रुपयांसारखे इतर खर्च समाविष्ट आहेत. ग्राहक ही एकूण रक्कम डाउन पेमेंट आणि ईएमआय पर्यायांद्वारे हप्त्यांमध्ये देऊ शकतात.
जर तुम्ही 20,000 रुपये डाउन पेमेंट केले तर तुम्हाला उर्वरित रकमेसाठी म्हणजेच 1.53 लाख रुपये लोन घ्यावे लागेल. समजा बँक तुम्हाला 9% वार्षिक व्याजदराने 3 वर्षांचे (36 महिने) कर्ज देते, तर तुमचा मासिक ईएमआय सुमारे 5,100 रुपये असेल. या लोनच्या कालावधीत, तुम्हाला एकूण 30,000 रुपये व्याज देखील द्यावे लागेल. म्हणजेच, बाईकची एकूण किंमत सुमारे 2 लाख रुपये असेल. लक्षात घ्या, लोनचा व्याजदर आणि EMI तुमच्या क्रेडिट स्कोअर आणि बँक पॉलिसीवर अवलंबून आहे.
रॉयल एनफील्ड हंटर 350 मध्ये 349 सीसी सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड आणि फ्युएल-इंजेक्टेड इंजिन आहे. हे इंजिन 20.4 पीएस पॉवर आणि 27 एनएम टॉर्क निर्माण करते. बाईकला 5-स्पीड गिअरबॉक्स मिळतो. हे मॉडेल शहरातील रहदारी आणि महामार्गांवर सुरळीत आणि मजबूत कामगिरी देण्यास सक्षम आहे.
Royal Enfield Hunter 350 चे मायलेज ARAI ने प्रमाणित 36 किमी प्रति लिटर आहे. त्यात 13-लिटर इंधन टाकी आहे. एकदा ही टाकी भरली की, ही बाईक 450 किमीपेक्षा जास्त अंतर कापू शकते. जर एखाद्या व्यक्तीने दररोज 30 ते 35 किमी बाईक चालवली तर त्याला सुमारे 12 ते 15 दिवस पुन्हा पेट्रोल भरण्याची आवश्यकता राहणार नाही.