फोटो सौजन्य: Freepik
भारतात अनेक पॉवरफुल बाईक्स लाँच होताना दिसत आहे. याच स्टाइलिश बाईक्समध्ये कावासाकी कंपनीचा सुद्धा समावेश आहे. कावासाकी बाईक फक्त किंमतीत दमदार नसून इंजिन आणि फीचर्स मध्ये सुद्धा दमदार आहे. सध्या कावासाकी कंपनीची एक बाईकबद्दल अनेक चर्चा होताना दिसत आहे. कावासाकी निंजा ZX 10R असे या बाईक मॉडेलचे नाव आहे. या बाईकच्या किंमतीत तुम्ही एक नाही दोन नाही तर तब्बल चार कार विकत घेऊ शकता.
कावासाकी निंजा ZX 10R (Kawasaki Ninja ZX 10R)
या बाईकमध्ये लिक्विड-कूल्ड, 4-स्ट्रोक इन-लाइन फोर इंजिन आहे. या बाईकमध्ये फ्युएल इंजेक्शन सिस्टिमही देण्यात आली आहे. तसेच यात बसवलेले इंजिन 13,200 rpm वर 149.3 kW ची शक्ती देते आणि 11,400 rpm वर 114.9 Nm टॉर्क जनरेट करते. या बाइकमधील टाकीची इंधन क्षमता १७ लीटर आहे.
फीचर्स
ही कावासाकी बाईक इलेक्ट्रिक स्टार्टरने सुरू करता येते. तसेच या मध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीची सुविधाही देण्यात आली आहे. या बाईकमध्ये नवीन 4.3-इंच पूर्णतः डिजिटल TFT कलर इन्स्ट्रुमेंटेशन आहे, ज्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त सुसज्ज कॉकपिट आहे. या बाईकचे नवीन मॉडेल सर्व अत्याधुनिक फीचर्सनी भरलेले आहे.
किंमत अशी कि ज्यात 4 कार्स विकत घेता येतील
कावासाकी निंजा ZX 10R ही एक दमदार बाईक आहे. या बाइकची किंमत 16.79 लाख रुपये आहे. ही किमंत वेगवेगळ्या राज्यांमधील कर पद्धतीमुळे बदलू शकते. आश्चर्य म्हणजे या बाईकच्या एकाच किमतीत चार मारुती सुझुकी अल्टो K10 खरेदी करता येतील. Maruti Alto K10 ची एक्स-शोरूम किंमत 3.99 लाख रुपयांपासून सुरू होते.