'या' 4 कारणांमुळे कारचा सस्पेन्शन अचानकच होते खराब (फोटो सौजन्य: iStock)
अनेकांचे कार खरेदी करण्याचे स्वप्न असते. मात्र कार खरेदी करण्यापेक्षा तिला मेंटेन ठेवणे फार महत्वाचे. अन्यथा नवीन कार सुद्धा जुनी होऊन जाते आणि तिचा परफॉर्मन्स सुद्धा कमी होतो. म्हणूनच कार नवीन असो की जुनी तिच्या पार्ट्सकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.
प्रवासादरम्यान, तुमची कार सर्व प्रकारच्या रस्त्यांवरून जाते, ज्याचा थेट परिणाम कारच्या सस्पेंशनवर होतो. देशातील काही रस्ते खूप चांगले आहेत, तर काही खूप खराब आहेत. चांगल्या रस्त्यांवर कार चालवल्याने कोणतेही नुकसान होत नाही, तर खराब रस्त्यांवर कार चालवल्याने सस्पेंशनचे खूप नुकसान होते. म्हणूनच आज आपण कारचे सस्पेन्शन कोणत्या कारणांनी खराब होते, त्याबद्दल जाणून घेऊयात.
ज्या रस्त्यावरुन तुमची कार जाणार आहे, त्याची जर तुम्हाला आधीच खराब परिस्तिथी ठाऊक असेल, तर तुम्ही दुसरा पर्याय निवडा. खराब रस्त्यावरून कार चालवल्याने सस्पेंशनवर खूप दबाव येतो आणि ते लवकर तुटण्याची शक्यता वाढते. खराब रस्त्यावर कार चालवल्याने अंडरबॉडीलाही मोठे नुकसान होऊ शकते.
कार निर्माता कंपन्या त्याच्या क्षमतेनुसार सस्पेंशन ट्यून करतात. जर तुम्ही तुमच्या कारमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन टाकले आणि ती चालवली तर यामुळे सस्पेंशनचेही नुकसान होऊ शकते. एकदा सस्पेंशन खराब झाले की, सामान्य रस्त्यावरही कार चालवणे कठीण होऊन बसते म्हणून, तुमच्या कारमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त सामान ठेवून ड्राईव्ह करणे टाळा.
अनेक लोकांना कार चालवताना अचानक आणि जोरदार ब्रेक लावण्याची सवय असते. जर तुम्हालाही ही सवय असेल तर तुम्ही ते ताबडतोब बदलले पाहिजे. खरंतर, वेगवान ब्रेक लावल्याने कार अचानक थांबते. असे केल्याने, कारचे संपूर्ण वजन समोरील सस्पेंशनवर येते. जर असे वारंवार केले तर, सस्पेंशन कमकुवत होते आणि परिणामी ते हळूहळू खराब होऊ शकते.
ग्राहकांचा ‘या’ कारला न भूतो न भविष्यति असा प्रतिसाद, कंपनीला 3 पटीने वाढवावे लागले उत्पादन
बरेच लोक त्यांची कार सुंदर आणि आर्कषक बनवण्यासाठी किंवा सुरक्षिततेसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त जड ॲक्सेसरीज बसवतात. यामुळे त्यांची ईच्छा जरी पूर्ण होत असली तरी त्याचा कारच्या सस्पेंशनवर विपरीत परिणाम होतो. कधीकधी हे ॲक्सेसरीज इतके जड असतात की कारचे एकूण वजन वाढते. यामुळे, सस्पेंशनवर जास्त दबाव येतो आणि ते खराब होऊ लागते.