Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

याला म्हणतात प्रॉपर जुगाड! पठ्ठ्याने फक्त 4 लाखांत Maruti 800 ला बनवलं थेट Lamborghini कार

भारतात जुगाडू लोकांची काही कमी नाही. झारखंडमधील अशाच एका जुगाडू व्यक्तीने थेट साध्या आणि सिम्पल लूक असणाऱ्या Maruti 800 ला थेट Lamborghini सारखा लूक दिला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 05, 2026 | 06:54 PM
फोटो सौजन्य: X.com/ @IndianTechGuide

फोटो सौजन्य: X.com/ @IndianTechGuide

Follow Us
Follow Us:
  • झारखंडच्या मेकॅनिकची वेगळीच जादू
  • फक्त 4 लाखात Maruti 800 ला दिला Lamborghini सारखा लूक
  • जाणून घ्या संपूर्ण बातमी
आपल्या देशात जुगाडू लोकं नेहमीच काहीतरी हटके जुगाड करत असतात. सोशल मीडियावर तर अनेक जुगाड व्हायरल देखील होताना दिसतात. असाच एक जुगाड झारखंडच्या मेकॅनिकने लावला आहे, ज्यामुळे सगळीकडून त्याचे कौतुक होताना दिसत आहे.

झारखंडमधील एका मेकॅनिकने आपल्या कौशल्याने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. झारखंडमधील चांडिल येथील रहिवासी मोहम्मद आरिफने जुन्या मारुती 800 ला लॅम्बोर्गिनीमध्ये रूपांतरित केले आहे. कारला नवीन लूक देण्यासाठी आरिफने अंदाजे 4 लाख रुपये खर्च केले, तर खऱ्या लॅम्बोर्गिनीची किंमत करोडो आहे.

किंमत स्वस्त आणि चालवण्यात मस्त! ‘या’ आहेत भारतातील Off-Road Bikes, किंमत फक्त 1.40 लाखांपासून सुरु

मोहम्मद आरिफने ते कसे केले?

नवीन लूक तयार करण्यासाठी, आरिफने रेडीमेड किट वापरला नाही; त्याऐवजी, त्याने स्वतः धातूचे पत्रे कापली आणि वेल्ड केली, त्यांना लॅम्बोर्गिनीसारखे आकार दिले. मारुती 800 ला लॅम्बोर्गिनीसारखी कमी आणि रुंद दिसावी यासाठी त्याने कारच्या संपूर्ण बॉडीमध्ये मोठे बदल केले.

काय केले बदल?

मोहम्मद आरिफ यांनी कारची जुनी उंच आणि चौकोनी बॉडी काढून ती हलकी बनवली आहे. तसेच कार अधिक रुंद दिसावी यासाठी चाकांजवळील भाग वाढवण्यात आला आहे. कारच्या मागील बाजूस रिअर विंग आणि पुढील बाजूस स्प्लिटर बसवण्यात आला आहे, ज्यामुळे तिला रेसिंगसारखा लुक मिळतो. याशिवाय कारला नियॉन ग्रीन रंग देण्यात आला असून कस्टम LED हेडलाईट्सही बसवण्यात आल्या आहेत.

🚨 Mohammad Arif, a mechanic from Jharkhand, transformed an old Maruti 800 into a stunning replica of the Lamborghini car by spending just Rs 4 lakh. 🙏 pic.twitter.com/CbvyXcy4vg — Indian Tech & Infra (@IndianTechGuide) March 4, 2026

पेट्रोल डिझेल महागणार? Israel – Iran War च्या पाश्वभूमीवर देशात कच्च्या तेलाचा किती साठा शिल्लक?

कारचे इंटीरियर कसे आहे?

आरिफ यांनी कारचे फक्त एक्सटिरिअर रूपच बदलले नाही, तर आतील भागातही मोठे बदल केले आहेत. कारच्या आत आता फक्त दोन जणांसाठी बसण्याची सोय ठेवण्यात आली असून ती 2-सीटर करण्यात आली आहे. त्यामुळे कार अधिक स्पोर्ट्स कारसारखी दिसते. जुन्या Maruti 800 मध्ये सनरूफ नव्हते, पण या कारमध्ये आरिफ यांनी सनरूफही बसवले आहे.

इंजिनमध्ये काही बदल केले का?

बाहेरून ही कार Lamborghini सारखी दिसत असली तरी तिच्यामध्ये अजूनही मूळ 796cc चे Maruti 800 चेच इंजिन आहे. हे इंजिन सुमारे 37 ते 40 हॉर्सपॉवरची ताकद निर्माण करते. त्यामुळे ती खऱ्या लॅम्बोर्गिनीप्रमाणे वेगाने धावू शकत नसली, तरी लुकच्या बाबतीत मात्र ती चांगली टक्कर देते.

Web Title: Mechanic mohammad arif transffered maruti 800 inot lamborghini car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 06:54 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

Maruti Suzuki Price Hike: Maruti Suzuki च्या ग्राहकांसाठी धक्कादायक बातमी! सप्टेंबरपासून गाड्यांसाठी मोजावे लागणार अधिक पैसे
1

Maruti Suzuki Price Hike: Maruti Suzuki च्या ग्राहकांसाठी धक्कादायक बातमी! सप्टेंबरपासून गाड्यांसाठी मोजावे लागणार अधिक पैसे

Suzuki Gixxer Range: सुजुकी गिक्सर रेंजला नवे ड्युअल-टोन रंग; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
2

Suzuki Gixxer Range: सुजुकी गिक्सर रेंजला नवे ड्युअल-टोन रंग; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Mahindra New SUVs: महिंद्राच्या अनेक नव्या एसयूव्ही लवकरच येणार; थारपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत मोठी रेंज
3

Mahindra New SUVs: महिंद्राच्या अनेक नव्या एसयूव्ही लवकरच येणार; थारपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत मोठी रेंज

New Hyundai Bayon: ह्युंदाई बायोनचे इंटीरियर झाले स्पाय; 360-डिग्री कॅमेरा आणि ड्युअल-टोन केबिनची झलक
4

New Hyundai Bayon: ह्युंदाई बायोनचे इंटीरियर झाले स्पाय; 360-डिग्री कॅमेरा आणि ड्युअल-टोन केबिनची झलक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.