फोटो सौजन्य: @FirstCNGBike (X.com)
भारतात पूर्वी फक्त इंधनावर चालणाऱ्या बाईक ऑफर होत होत्या. मात्र, आज ही स्थिती पूर्णपणे बदलताना दिसत आहे. भारतीय मार्केटमध्ये नवनवीन बाईक लाँच होत आहेत. यात इलेक्ट्रिक बाईक तर आहेतच, पण यासोबतच ऑटो मार्केटमध्ये एक क्रांती घडली जेव्हा पहिल्यांदाच CNG वर चालणारी बाईक लाँच झाली.
बजाजने 2024 मध्ये जगातील पहिलीच CNG बाईक लाँच करून आपली हवा केली होती. ही बाईक लाँच झाल्यानंतर ग्राहकांचा सुद्धा या बाईकला चांगला प्रतिसाद मिळाला. नुकतेच या बाईकच्या किमतीत कपात करण्यात आली आहे . चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
बजाज ऑटोने Freedom 125 सीएनजी बाईकवर 5000 रुपयांची सूट जाहीर केली आहे. आता ही नवीन रेंज 85,976 रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीपासून सुरू होते. कंपनीने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे ही माहिती दिली आहे. ही सूट फक्त बेस व्हेरिएंटवर म्हणजेच NGO4 ड्रम व्हेरिएंटवर उपलब्ध आहे. ही लिमिटेड पिरियड ऑफर आहे.
फक्त सब्सक्रिप्शन वर मिळेल Hero चा नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, पुढील महिन्यात होईल लाँच
फ्रीडम 125 एकूण 3 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. त्याच्या मिड-स्पेक NG04 ड्रम एलईडी आणि टॉप ऑफ द लाइन NG04 डिस्क ब्रेकमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. बजाज फ्रीडम बाईकला पॉवरफुल 125cc इंजिन मिळते, जे उत्तम पॉवर तसेच जबरदस्त मायलेज देते.
बजाज फ्रीडम 125 चे डिझाइन खूप आकर्षक आहे. ही बाईक तरुणांना तसेच कुटुंबाला लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे. या बाईकमध्ये तुम्हाला डिजिटल डिस्प्ले, एलईडी लाईट्स आणि आरामदायी सीटिंग सारख्या अनेक उत्तम फीचर्स मिळतात. या आरामदायी सीटिंग तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय बनतात.
ही बाईक परवडणाऱ्या किमतीत लाँच झाल्यामुळे ग्राहकांकडून खूप पसंत केली जात आहे. या बाईकबद्दल कंपनीचा दावा आहे की ही बाईक प्रति लिटर 60-65 किमी मायलेज देते, ज्यामुळे ही बाईक फ्युएल एफिशियंट देखील ठरते.
स्टार क्रिकेटर अजिंक्य रहाणेला Mercedes च्या ‘या’ कारने घातली भुरळ, किंमत 3 कोटींपेक्षा जास्त
या बाईकमध्ये डिजिटल डिस्प्ले, एलईडी लाईट्स आणि आरामदायी सीटिंग सुविधा आहेत, ज्यामुळे ती लांब पल्ल्यासाठी देखील एक उत्तम पर्याय बनते. पेट्रोल मोडमध्ये हे बाईक 130 किमीची रेंज देते. कंपनीचा दावा आहे की हे दोन्ही इंधन एकत्रितपणे 330 किमी पर्यंत एकूण मायलेज देतात.