
किया इंडिया देशातील लोकप्रिय कंपनी
किया इंडियाचे देशांतर्गत घाऊक विक्रीत सुमारे ४०% योगदान
कंपनीच्या गाड्यांना ग्राहकांचा मिळतोय भरघोस प्रतिसाद
मुंबई: किया इंडिया कंपनी भारतातील ऑटोमोबाइल क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी आहे. देशातील तंत्रज्ञानावर आधारित आणि कनेक्टेड मोबिलिटीच्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक म्हणून आपले स्थान अधिक दृढ करत किया इंडियाने आज भारतीय रस्त्यांवर ५००,००० पेक्षा जास्त कनेक्टेड कार्सचा टप्पा पार केल्याची एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. ही कामगिरी कियाच्या इंटेलिजेंट मोबिलिटी इकोसिस्टमला ग्राहकांकडून मिळालेला भरघोस प्रतिसाद दर्शवते. तिथे आता कनेक्टेड कार प्रकार कंपनीच्या देशांतर्गत घाऊक विक्रीत सुमारे ४०% योगदान देत आहेत. किया कनेक्ट २.० (सीसीएनसीसह)द्वारे शक्य झालेल्या या यशातून अखंड, डिजिटल-प्रथम मोबिलिटी अनुभव देण्यात किया इंडियाने आघाडी घेतल्याचे स्पष्ट होते.
किया सेल्टोस या महत्त्वाच्या टप्प्यात महत्त्वाची कामगिरी बजावत आहे. तिचा कियाच्या एकूण कनेक्टेड कार विक्रीत सुमारे ७०% वाटा आहे. सोनेट आणि कॅरेन्स देखील या यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून त्यांची विक्री सेल्टोसच्या अगदी जवळ आहे. त्या किया इंडियाच्या संपूर्ण पोर्टफोलिओत कनेक्टेड वैशिष्ट्यांसाठी असलेल्या व्यापक मागणीवर प्रकाश टाकतात.
Kia Seltos चा बाजारात धमाका! १०.९९ लाखांत लाँच झाली ऑल-न्यू जनरेशन SUV; पाहा जबरदस्त फीचर्स
ऑटोमोटिव्ह उद्योगातील कियाच्या तंत्रज्ञान नेतृत्वावर बोलताना किया इंडियाचे विक्री आणि मार्केटिंग विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अतुल सूद म्हणाले, “किया इंडियाने आपल्या वाहनांच्या उत्कृष्ट डिझाइन आणि तंत्रज्ञान नेतृत्वाद्वारे सातत्याने स्वतःला वेगळे सिद्ध केले आहे. कनेक्टेड वैशिष्ट्ये वाढवण्यावर आणि ‘किया ड्राइव्ह ग्रीन’ सारख्या ग्राहक सहभाग उपक्रमांवर आमचा सततचा भर यामुळे आमच्या कनेक्टेड इकोसिस्टममध्ये स्वीकारार्हता आणि संवाद वाढला आहे. मोफत सबस्क्रिप्शन कालावधीनंतरही ग्राहकांचे टिकून राहण्याचे प्रमाण, हे ‘किया कनेक्ट’चे शाश्वत महत्त्व आणि दीर्घकालीन मूल्य अधोरेखित करते.”
सध्याचा ग्राहक टिकवून ठेवण्याचा कल दर्शवतो की कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्यांच्या उत्कृष्ट अनुभवामुळे ग्राहक नूतनीकरणासाठी पुन्हा परत येत आहेत. कियाने प्रगत कनेक्टेड कार तंत्रज्ञान सादर करण्यात सातत्याने आघाडी घेतली असून, ग्राहकांकडून सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या अनेक लोकप्रिय वैशिष्ट्यांचा त्यात समावेश आहे. कनेक्टेड कार नेव्हिगेशन कॉकपिटमुळे सहज वापरता येणारे इंटरफेस, अखंड कनेक्टिव्हिटी आणि प्रगत ओटीए क्षमता मिळतात, ज्यामुळे वाहन नेहमीच नवनवीन सॉफ्टवेअर आणि ॲप्ससह अद्ययावत राहते व सुरक्षित, सुरळीत ड्रायव्हिंगचा अनुभव देते.
यासोबतच प्लांट ओव्हर-द-एअर (ओटीए) अपडेट्समुळे उत्पादन स्तरावरच वाहनाचे सॉफ्टवेअर अखंडपणे अपडेट केले जाते, त्यामुळे कनेक्टेड कार्स नवीन वैशिष्ट्यांसह वितरित होतात आणि पहिल्या दिवसापासूनच चालवण्यासाठी पूर्णपणे तयार असतात. किया रिमोट डायग्नोस्टिक्ससह ओव्हर-द-एअर सॉफ्टवेअर अपडेट्समुळे दूरस्थ वाहन निदान आणि अद्ययावत सुविधा उपलब्ध होतात, ज्यामुळे डीलरशिपला वारंवार भेट देण्याची गरज कमी होते.
Kia Seltos आणि Tata Sierra आमने सामने! कोणती कार तुमच्यासाठी एकदम भारी?
डिजिटल की २.० या वैशिष्ट्याद्वारे यूडब्ल्यूबी किंवा एनएफसी तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्टफोन किंवा स्मार्टवॉचच्या माध्यमातून वाहनात प्रवेश आणि ड्रायव्हिंग करता येते. सराउंड व्ह्यू मॉनिटर (एसव्हीएम) किया कनेक्ट ॲपद्वारे रिअल-टाइम ३६०-अंश वाहन दृश्य उपलब्ध करून देतो, ज्यामुळे वाहनापासून दूर असतानाही सुरक्षितता अधिक वाढते. तसेच, बहुभाषिक आवाज ओळखण्याच्या क्षमतेमुळे इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि बंगालीसह अनेक भाषांमध्ये व्हॉइस कमांड वापरून वाहनाच्या विविध कार्यांवर नियंत्रण ठेवता येते, आणि लवकरच आणखी नवीन कमांड्सही उपलब्ध होणार आहेत.
इलेक्ट्रिक वाहनांच्या आगमनामुळे किया इंडियाने आपली कनेक्टेड इकोसिस्टम अधिक भक्कम केली असून, ईव्ही सेगमेंटमध्ये १००% कनेक्टेड कार्सचा टप्पा गाठला आहे. ईव्ही ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या कनेक्टेड वैशिष्ट्यांमध्ये ड्राइव्ह ग्रीन या गेमिफाइड सहभाग मंचाचा समावेश आहे, जो व्हर्च्युअल पद्धतीने झाडांची वाढ दाखवून ग्राहकांच्या पर्यावरणीय परिणामाचे दृश्य स्वरूपात मांडणी करतो. यासोबतच, किया स्मार्ट कनेक्टेड होम चार्जर्स ७.४ किलोवॅट आणि ११ किलोवॅट अशा पर्यायांमध्ये उपलब्ध असून, ते वेगवान, स्मार्ट आणि कनेक्टेड होम चार्जिंग सोल्यूशन्स प्रदान करतात, ज्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अधिक सोयीस्कर आणि कार्यक्षम बनतो.