फोटो सौजन्य: iStock
ग्राहक जेव्हा कार खरेदी करायला जातात, तेव्हा सर्वात पहिले ते कारची किंमत, मायलेज, सेफ्टी फीचर्स आणि अन्य गोष्टी बघतात. भारतीय ऑटो बाजारात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट बजेट फ्रेंडली कार ऑफर करत असतात. ग्राहकांकडून देखील या कार्सना चांगली मागणी मिळत आहे.
भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी Maruti Suzuki ने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. Wagon R ही त्यातीलच एक लोकप्रिय कार आहे, जी आता अधिक सुरक्षित बनली आहे. या कारच्या प्रत्येक व्हेरिएंटमध्ये आता 6 एअरबॅग्ज स्टॅंडर्ड म्हणून येतात, ज्यामुळे ती या सेगमेंटमधील सर्वात सुरक्षित कारपैकी एक बनते. यासोबतच, यात ABS, EBD, ESP, हिल होल्ड असिस्ट आणि रियर पार्किंग सेन्सर्स सारखी फीचर्स देखील आहेत. 6 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत इतकी सेफ्टी फीचर्स मिळणे ही कार खूप खास बनवते.
भारतातील ‘या’ 5 शहरात मिळतात सर्वात स्वस्त कार, हजारोंची होते बचत
Maruti Wagon R ची एक्स-शोरूम किंमत 5.79 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंट 8.50 लाख रुपयांपर्यंत जाते. याचा सीएनजी व्हेरिएंट 7.15 लाख रुपयांपासून सुरू होतो, जो मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक बजेट फ्रेंडली पर्याय आहे. शहर आणि व्हेरिएंटनुसार ऑन-रोड किमती बदलू शकतात, परंतु त्याची सुरुवातीची किंमत या कारला 2025 ची सर्वात स्वस्त आणि सुरक्षित हॅचबॅक बनवते.
Wagon R मध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले सपोर्टसह 7 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे. यासोबतच स्टीअरिंग माउंटेड कंट्रोल्स, पॉवर विंडो, कीलेस एंट्री, ऑटो एसी आणि हाइट ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट सारखी फीचर्स देण्यात आले आहेत.
Tata Nexon की Hyundai Venue, कोणती SUV ठरेल तुमच्यासाठी एकदम परफेक्ट
तीन वेगवेगळ्या पॉवरट्रेन पर्यायांसह Maruti Wagon R भारतीय बाजारात उपलब्ध आहे, ज्यामुळे ती प्रत्येक व्हेरिएंटच्या ग्राहकांच्या गरजांनुसार एक चांगली निवड बनते. पहिला पर्याय 1.०-लिटर पेट्रोल इंजिन आहे, जो 65.68 बीएचपी पॉवर आणि 89 एनएम टॉर्क निर्माण करतो. दुसरा पर्याय 1.2-लिटर पेट्रोल इंजिन आहे, जो 88.5 बीएचपी पॉवर आणि 113 एनएम टॉर्क निर्माण करतो. तिसरा पर्याय 1.0-लिटर सीएनजी इंजिन आहे, जो 88 पीएस पॉवर आणि 121.5 एनएम टॉर्क निर्माण करतो. दोन्ही पेट्रोल इंजिन पर्यायांमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशन पर्याय आहेत, तर सीएनजी व्हेरिएंट फक्त मॅन्युअल गिअरबॉक्स येतो. हे सर्व इंजिन पर्याय उत्तम परफॉर्मन्स व उत्कृष्ट फ्युएल एफिशियन्सी देते.