Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahindra Commercial Vehicles Price Hike: महिंद्राच्या इलेक्ट्रिक कमर्शियल वाहनांच्या किमती जानेवारीत वाढणार! जाणून घ्या डिटेल्स

इलेक्ट्रिक 3-चाकी वाहनांची मागणी 4 महिन्यांत 30 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यंत गेल्याचे महिंद्राचे म्हणणे आहे. नवीन प्लांट, चार्जिंग सुविधा आणि IPO च्या तयारीदरम्यान कंपनी वाहनांच्या किमती किती वाढवणार, याकडे व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 20, 2026 | 04:34 PM
Mahindra Electric Commercial Vehicles Price Hike (फोटो सौजन्य-AI एआय)

Mahindra Electric Commercial Vehicles Price Hike (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटी जानेवारी 2027 मध्ये इलेक्ट्रिक कमर्शियल वाहनांच्या किमती पुन्हा वाढवण्याच्या तयारीत आहे.
  • आधीच्या 2 दरवाढींमुळे वाहनांच्या किरकोळ किमती एकूण 5 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
  • वाढती इलेक्ट्रिक वाहनांची मागणी पाहून कंपनी नवीन असेंब्ली प्लांट आणि चार्जिंग सुविधांचे नियोजन करत आहे.

Mahindra LMM Price Hike संदर्भात महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटीने जानेवारी 2027 पासून आपल्या इलेक्ट्रिक कमर्शियल वाहनांच्या किमती वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. कच्च्या मालाच्या किमतीत झालेली दुहेरी आकड्यांतील वाढ आणि अचानक वाढलेली मागणी यामुळे कंपनीवर खर्चाचा दबाव आहे. याआधी कंपनीने 2 वेळा दरवाढ केली असून, त्यामुळे वाहनांच्या किरकोळ किमती एकूण 5 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळीही दरवाढ टप्प्याटप्प्याने केली जाईल. वारंवार किमती वाढवणे आणि नंतर सवलती देणे, अशी पद्धत कंपनीला टाळायची आहे. महिंद्रा ऑटो आणि फार्म सेक्टरचे प्रमुख राजेश जेजुरिकर यांनी आखलेल्या धोरणानुसार, छोट्या प्रमाणात पण कायमस्वरूपी दरवाढ करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे कमर्शियल वाहन वापरणाऱ्या कस्टमर्सना अचानक मोठा आर्थिक फटका बसणार नाही, असा कंपनीचा प्रयत्न आहे.

महिंद्रा XEV 9S ची BNCAP क्रॅश टेस्टमध्ये बाजी! 5-स्टार सेफ्टी रेटिंगसह मिळवले 31.15 गुण

दरम्यान, इराणमधील संघर्षामुळे फ्युलच्या किमतींमध्ये चढ-उतार झाले. परिणामी ट्रेडीशनल फ्युल वर चालणाऱ्या प्रवासी 3-चाकी वाहनांचा खर्च वाढला आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वेगाने वाढला. भारतात प्रवासी 3-चाकी वाहनांमधील इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा अवघ्या 4 महिन्यांत सुमारे 30 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे कंपनीने नमूद केले. या अचानक वाढलेल्या मागणीमुळे महिंद्राच्या असेंब्ली प्रोडक्शनवर ताण आला आहे. त्यामुळे कंपनी आता पूर्ण इलेक्ट्रिक सेगमेंटच्या गरजा लक्षात घेऊन नवीन प्लांट उभारण्याचे नियोजन करत आहे.

महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटीला 2026 चा अर्थशॉट पुरस्कार ‘क्लीन अवर एअर’ विभागात मिळाला असून, त्यासोबत 1 मिलियन पौंडचे बक्षीस मिळाले आहे. या निधीपैकी सुमारे 70 टक्के रक्कम महिलांना ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण आणि डीलरशिप सर्व्हिस टेक्निशियन तयार करण्यासाठी वापरली जाणार आहे. बाकी 30 टक्के निधी मुंबईसारख्या शहरांमध्ये पब्लिक चार्जिंग सुविधा उभारण्यासाठी वापरण्याची योजना आहे.

महिंद्रा रेसिंगची मोठी घोषणा! फॉर्म्युला ई Gen4 सीझनसाठी M13Electro कार सादर

कंपनी नेपाळ, श्रीलंका आणि फिलिपिन्समध्ये निर्यात करते. आफ्रिका आणि दक्षिण-पूर्व आशियातूनही नव्या चौकशा मिळत आहेत. दरम्यान, महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटी पुढील 12 ते 18 महिन्यांत IPO आणण्याच्या तयारीत आहे. पण त्याआधी प्रोडक्शन क्षमता वाढवणे आणि प्रॉफीटचे प्रमाण स्टेबल करणे कंपनीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: महिंद्रा इलेक्ट्रिक कमर्शियल वाहनांच्या किमती कधी वाढवणार आहे?

    Ans: महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटी जानेवारी 2027 पासून आपल्या इलेक्ट्रिक कमर्शियल वाहनांच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहे.

  • Que: महिंद्राने याआधी किती दरवाढ केली आहे?

    Ans: कंपनीने याआधी 2 वेळा दरवाढ केली असून, या दोन्ही वाढींमुळे वाहनांच्या किरकोळ किमती एकूण 5 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

  • Que: महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटीचा IPO कधी येऊ शकतो?

    Ans: कंपनी पुढील 12 ते 18 महिन्यांत IPO आणण्याच्या तयारीत आहे. पण त्यासाठी प्रोडक्शन क्षमता वाढवणे आणि उत्पादन खर्च व नफ्याचे प्रमाण स्थिर करणे आवश्यक ठरणार आहे.

Web Title: Mahindra lmm price hike january electric commercial vehicles auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • automobile
  • Mahindra
  • Price Hike
  • SUV cars

संबंधित बातम्या

TVS Star City Plus Discontinued: टीव्हीएस स्टार सिटी प्लसची विक्री बंद; वेबसाइटवरूनही हटवली! जाणून घ्या कारण
1

TVS Star City Plus Discontinued: टीव्हीएस स्टार सिटी प्लसची विक्री बंद; वेबसाइटवरूनही हटवली! जाणून घ्या कारण

Audi BMW Germany Strike: जर्मनीत ऑडी आणि बीएमडब्ल्यूच्या कारखान्यांमध्ये संप; वेतनवाढीसाठी कामगार आक्रमक!
2

Audi BMW Germany Strike: जर्मनीत ऑडी आणि बीएमडब्ल्यूच्या कारखान्यांमध्ये संप; वेतनवाढीसाठी कामगार आक्रमक!

VinFast Electric Scooters: व्हिएतनामची VinFast भारतात आणणार 3 इलेक्ट्रिक स्कूटर; 165 किमीपर्यंत मिळणार रेंज!
3

VinFast Electric Scooters: व्हिएतनामची VinFast भारतात आणणार 3 इलेक्ट्रिक स्कूटर; 165 किमीपर्यंत मिळणार रेंज!

Kia Carens CNG आणि Clavis CNG ची विक्री 2 महिन्यांत 6,200 पार!  ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद!
4

Kia Carens CNG आणि Clavis CNG ची विक्री 2 महिन्यांत 6,200 पार!  ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.