Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BYD India Deliveries: बीवायडीच्या 20,000 इलेक्ट्रिक कारची विक्री, 14 महिन्यांत आकडा दुप्पट! काय आहे कारण? जाणून घ्या!

भारतात बीवायडीने 20,000 इलेक्ट्रिक कार डिलिव्हरीचा टप्पा पार केला असून, सप्टेंबर 2025 मधील 10,000 चा आकडा कंपनीने 14 महिन्यांत दुप्पट केला आहे. अॅटो 3 आणि सीलायन 7 या मॉडेल्सना मिळालेला प्रतिसाद कंपनीच्या या यशामागे महत्त्वाचा ठरला आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 20, 2026 | 05:04 PM
BYD India Crosses 20,000 Electric Car Deliveries (फोटो सौजन्य-AI एआय)

BYD India Crosses 20,000 Electric Car Deliveries (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • बीवायडी इंडियाने 14 महिन्यांत इलेक्ट्रिक कार डिलिव्हरीचा आकडा 10,000 वरून 20,000 पर्यंत नेला.
  • अॅटो 3 च्या 9,000 पेक्षा जास्त आणि सीलायन 7 च्या 5,000 पेक्षा जास्त डिलिव्हरी झाल्या.
  • भारतातील 40 शहरांमध्ये 51 शोरूमच्या माध्यमातून कंपनी आपल्या इलेक्ट्रिक वाहनांची विक्री करत आहे.

भारतात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढत असताना बीवायडी इंडिया (BYD India Deliveries) या कंपनीने 20,000 वाहनांच्या डिलिव्हरीचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे, सप्टेंबर 2025 मध्ये कंपनीने 10,000 वाहनांच्या डिलिव्हरीचा आकडा गाठला होता. त्यानंतर अवघ्या 14 महिन्यांत हा आकडा दुप्पट झाला आहे. 20 नोव्हेंबर 2026 ला दिल्लीतील पीपीएस बीवायडी शोरूममध्ये कंपनीने 20,000 वी इलेक्ट्रिक कार कस्टमरला विकली.

या कार्यक्रमात बीवायडी इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून या विशेष डिलिव्हरीचा आनंद साजरा केला. कंपनीचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय विक्री प्रमुख श्रीरंग जोशी यांनी सांगितले की, 20,000 वाहनांच्या डिलिव्हरीचा टप्पा गाठणे हा कंपनीसाठी महत्त्वाचा क्षण आहे. भारतीय कस्टमर्सकडून BYDच्या गाड्या आणि त्यांच्या टेक्नोलॉजीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी खासकरून नमूद केले.

Mahindra Commercial Vehicles Price Hike: महिंद्राच्या इलेक्ट्रिक कमर्शियल वाहनांच्या किमती जानेवारीत वाढणार! जाणून घ्या डिटेल्स

BYDच्या या यशात कंपनीच्या एसयूव्ही मॉडेल्सचा मोठा वाटा आहे. BYD अॅटो 3 या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या 9,000 पेक्षा जास्त युनिट्सची डिलिव्हरी झाली आहे. तर बीवायडी सीलायन 7 या इलेक्ट्रिक एसयूव्हीने 5,000 कस्टमर डिलिव्हरीचा टप्पा ओलांडला आहे. या दोन्ही गाड्यांना भारतीय मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आकडेवारीतून दिसते.

सध्या भारतात बीवायडीच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या पोर्टफोलिओमध्ये चार मॉडेल्सचा समावेश आहे. यात BYD सीलायन 7 आणि अॅटो 3 या इलेक्ट्रिक एसयूव्ही, बीवायडी सील ही इलेक्ट्रिक सेडान आणि BYD ईमॅक्स 7 या इलेक्ट्रिक MPVचा समावेश आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांमुळे कंपनीला विविध कस्टमरच्या गरजा पूर्ण करता येत आहेत.

TVS Star City Plus Discontinued: टीव्हीएस स्टार सिटी प्लसची विक्री बंद; वेबसाइटवरूनही हटवली! जाणून घ्या कारण

कंपनीचे हे यश केवळ वाहनांच्या विक्रीपुरते मर्यादित नाही. देशातील 40 शहरांमध्ये पसरलेल्या 51 शोरूमच्या माध्यमातून BYD आपले नेटवर्क वाढवत आहे. इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढवण्यासाठी शोरूम नेटवर्क, विक्रीनंतरची सेवा आणि चार्जिंग सुविधांचे महत्त्वही वाढत आहे. येत्या काळात भारतीय ईव्ही मार्केटमध्ये BYDची उपस्थिती किती वेगाने वाढते, याकडे लक्ष असेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बीवायडी इंडियाने किती इलेक्ट्रिक कार डिलिव्हर केल्या आहेत?

    Ans: बीवायडी इंडियाने भारतात एकूण 20,000 इलेक्ट्रिक वाहनांच्या डिलिव्हरीचा टप्पा पार केला आहे.

  • Que: बीवायडीच्या कोणत्या मॉडेलची सर्वाधिक डिलिव्हरी झाली आहे?

    Ans: बीवायडी अॅटो 3 या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या 9,000 पेक्षा जास्त डिलिव्हरी झाल्या आहेत. सीलायन 7 ने 5,000 डिलिव्हरीचा टप्पा ओलांडला आहे.

  • Que: भारतात बीवायडीची किती शोरूम आहेत?

    Ans: बीवायडी इंडियाचे नेटवर्क देशातील 40 शहरांमध्ये पसरले असून, कंपनीची एकूण 51 शोरूम आहेत.

Web Title: Byd india deliveries cross 20000 electric vehicles auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • automobile
  • best suv cars
  • Electric Cars
  • Electric Vehicles
  • SUV cars

संबंधित बातम्या

Mahindra Commercial Vehicles Price Hike: महिंद्राच्या इलेक्ट्रिक कमर्शियल वाहनांच्या किमती जानेवारीत वाढणार! जाणून घ्या डिटेल्स
1

Mahindra Commercial Vehicles Price Hike: महिंद्राच्या इलेक्ट्रिक कमर्शियल वाहनांच्या किमती जानेवारीत वाढणार! जाणून घ्या डिटेल्स

TVS Star City Plus Discontinued: टीव्हीएस स्टार सिटी प्लसची विक्री बंद; वेबसाइटवरूनही हटवली! जाणून घ्या कारण
2

TVS Star City Plus Discontinued: टीव्हीएस स्टार सिटी प्लसची विक्री बंद; वेबसाइटवरूनही हटवली! जाणून घ्या कारण

Audi BMW Germany Strike: जर्मनीत ऑडी आणि बीएमडब्ल्यूच्या कारखान्यांमध्ये संप; वेतनवाढीसाठी कामगार आक्रमक!
3

Audi BMW Germany Strike: जर्मनीत ऑडी आणि बीएमडब्ल्यूच्या कारखान्यांमध्ये संप; वेतनवाढीसाठी कामगार आक्रमक!

VinFast Electric Scooters: व्हिएतनामची VinFast भारतात आणणार 3 इलेक्ट्रिक स्कूटर; 165 किमीपर्यंत मिळणार रेंज!
4

VinFast Electric Scooters: व्हिएतनामची VinFast भारतात आणणार 3 इलेक्ट्रिक स्कूटर; 165 किमीपर्यंत मिळणार रेंज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.